इंदिरा कॅन्टिनमधून १२ लाख रुपयांचे चमचे चोरीला…!!!

 

चमचाचोरी !!!

जागतिकरणाच्या रेट्यातील प्रमुख समस्या. देवळातले चप्पल चोरणे आणि हॉटेलमधून चमचे चोरणे हा लोकांचा प्रमुख छंद होऊ लागलाय. आमदार, खासदारच काय तर पत्रकार देखील या सवयीचे गुलाम. नुकतच काही पत्रकारांनी देखील अशाच एका मोठ्या हॉटेलमधून चमचे चोरण्याचा पराक्रम केला होता.

चमचाचोरीची ही अमेझिंग घटना आहे ती बंगलुरच्या इंदिरा कॅन्टिनची. इंदिरा कॅन्टिनची सुरवात १६ ऑगस्ट २०१७ ला करण्यात आली. सिद्धरामय्या सरकारनं चालू केलेल्या या कॅन्टिनमध्ये दहा ते पंधरा रुपयात लोकांना पोटभरुन जेवण दिलं जातं. निवडणुकीच्या धामधुमीत काही पत्रकारांनी या कॅन्टिनला भेट दिली. या भेटीत कॅन्टिन चालकाने सांगितल की आत्तापर्यन्त १२ लाख रुपयाचे चमचे चोरीला गेले आहेत.

इंदिरा कॅन्टिन कमी पैशात पोटभर जेवण मिळण्यासाठी सुरु करण्यात आलं. नवीन काही चालू झालं की त्याचा बाजार कसा उठवायचा याच्या चर्चा झडू लागल्या. लोकं हळुहळु इंदिरा कॅन्टिनला गर्दी करु लागले. कॅन्टिन चालकांना देखील नव्या रोजगाराबद्दल आत्मविश्वास तयार झाला. लोकं येऊ लागले, खाऊ लागले, कौतुक करु लागले आणि जाताना खिशात  चमचे घेऊन जाऊ लागले.

इंदिरा कॅन्टिनचे मॅनेंजिंग डायरेक्टर गोविंद बाबू पुजारी सांगतात की, “आत्तापर्यन्त आमचे ८० चमचे चोरीला गेले आहेत. बीबीएमपीनं प्रत्येक कॅन्टिनला ४०० चमचे पुरवले होते. पुढच्या आठवड्यातच त्यातले निम्मे चमचे चोरीला गेले.”

पुरवण्यात आलेल्या एका चमच्याची किंमत आहे १५ रुपये. आणि आत्तापर्यन्त चोरीला गेलेल्या चमच्यांची किंमत होते बारा लाख. स्टोरी चमच्याएवढीच आहे पण इंटरेस्टिंग आहे.

सुविचार – चमचा चोरीपेक्षा चमचेगिरी करणं चांगल असू शकतं. कंटेन्ट कॉपी करण्यापेक्षा लिंक शेअर करणं त्याहून चांगल असू शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.