आईच्या नशिबी जे दुःख आलं तेच दुःख कादर खानच्या वाट्याला सुद्धा आलं होतं!!

कादर खान मुळचा अफगाणिस्तानातला पठाण. आई वडिलांचा चवथा मुलगा. पहिली तिन्ही मुलं लहानपणीच वारल्यानंतर कादरखान कसाबसा जगला. त्याच्या जगण्याचा आईला केवढां मोठ्ठा अभिमान वाटायचा. पण आपला मुलगा या वातावरणात जगू शकणार नाही अस तिला वाटायचं.

त्यातूनच कादरखानचे आई वडिल छोट्या कादरखानला घेवून मुंबईतल्या कामाठीपुरा झोपडपट्टीत दाखल झाले.

कादरखानचे वडिल मुंबईत आल्यानंतर फकिर झाले. ते दिवसभर मशिदीमध्ये बसून असायचे. एक दिवस त्यांनी कादरखानच्या आईला तलाक दिला आणि कायमचे मशिदीमध्ये राहू लागले. तलाकची बातमी ऐकून कादरखानचे मामा आणि आजोबा पाकिस्तानातून मुंबईत आले.

कादरखान आणि त्याच्या आईला घेवून पाकिस्तानात जायचं ठरलं. एक पठाणी बाई आपल्या लहान मुलाला घेवून मुंबईच्या कामाठीपुऱ्यासारख्या भागात राहणं शक्य नव्हतं. पण कादरखानच्या आईने नकार दिला. तिच्या बापाने तिचं दूसरं लग्न लावून दिलं.

कादर खानच्या आयुष्यात दूसर कुटूंब आलं. आई, सावत्र बाप आणि कादरखान.

कादरखानचा सावत्र बाप त्याला फकिर झालेल्या वडिलांकडून पैसै आणायला लावायचा. छोटा कादरखानं पळत मशिदीत जायचा. तिथे थकलेला फकिर बाप भिक मागून पैसे द्यायचा.

त्याच्या आईला फक्त इतकच माहिती होतं पोरगं शिकल पाहीजे. कादर खानं शिकत होते. अशाच एका दिवशी कादरखान बाहेर पडले. मुलं म्हणाली. आई एकटी, सावत्र बाप असा. शिकू नको पैसे कमव. कादर खाननं ते मनावर घेतलं. आपल्या पाठीवर लादलेलं दप्तर टाकून काम करायचं म्हणून तो घरात शिरलां. त्यानं दप्तर फेकलं. त्याच्या आईला ते लक्षात आलं. ती म्हणाली,

“बच्चे मैं जानती हूं तू कहां जा रहां जा रहा हैं. तू सोचता हैं तू रुपय कमाऐंगा तो ये दर्द कम होगा. पर तू पढं…”

कादर खान एका मुलाखतीत सांगतात आईचा पढं हा शब्द असा डोक्यात घुसला होता की मी, सिव्हिल इंजिनियर झालो. फक्त पढं इतकच ऐकू येत होतं.

कादरखान पुढे नाटकात काम करु लागला, दिलीप कुमार एक नाटक पहायला आला आणि त्याला चान्स मिळाला. नंतर बच्चनने त्याला चान्स दिला. तो लेखक होता. मुक्कदर का सिंकदर मधला स्मशानातला डॉयलॉग त्याने फक्त लिहला नव्हता तर तो जगला देखील होता.

कारण नाटक कळत नव्हतं तेव्हा तो स्मशानभूमीत मिमिक्री करत बसायचा. एका रात्री इथेच त्याचा खेळ पाहून त्याला नाटकाची पहिली ऑफर आली होती.

कादर खान स्ट्रगल करत होता. एक दिवस तो घरी आला तर त्याची आई मोरीत उलट्या करत होती. उलटीतून रक्त येत होतं. कादर खान ने आईला विचारलं हे कधीपासून होतय. आई म्हणाली काळजी करु नको खूप दिवसापासून होतय. अस म्हणून त्याच्या आईने जीव टाकलां. कादर खान पळत डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने नाही म्हणताच त्यानं डॉक्टरला उचलून आणलं आणि खोलीत टाकलं. डॉक्टरने सांगितलं आणि गेली.

शेजारच्या घरात जावून तो ओळखीच्या लोकांना फोन करुन आई गेल्याचं सांगत राहिला. तेव्हा प्रत्येकजण त्याला म्हणायचा, पोरा कसलिही चेष्टा कर पण कोणाच्या मृत्यूची चेष्टा करु नको. तो दिवस होता एक एप्रिलचा. प्रत्येकाला वाटत राहिलं कादरखान चेष्टा करतोय पण तो जीव तोडून सांगत राहिला आई गेली…

नशीब इतकं वाईट हेच दुःख कादरखानच्या वाट्याला देखील आलं.

गेली अनेकवर्ष ते आपल्या लाडक्या फिल्मइंडस्ट्रीपासून दूर होते. अनेकांना ठाऊक देखील नव्हत की ते जिवंत आहेत. कनडामध्ये एका दुर्धर रोगाशी सामना करत आहेत. अधून मधून त्यांच्या निधनाच्या अफवा पसरायच्या, लोक RIP लिहून मोकळे व्हायचे.

अखेर ३१ डिसेंबर २०१८ रोजी ती बातमी आलीच. जगाला हसवणारे, आपल्या कॉमेडी डायलॉगमध्ये हळूच प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारे अभिनेता, स्क्रीनप्ले रायटर, दिग्दर्शक, इंजिनियर कादरखान आपल्या अंतिम यात्रेला निघून गेले होते.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.