घरातल्या मृत सदस्याला जिवंत समजून दिड वर्ष सोबत राहत होतं कुटूंब..

गेल्या दिड वर्षांपासून घरातल्या कर्त्या मुलाचा मृतदेह खोलीत होता. त्याचं अंग रोज डेटॉलने स्वच्छ केल जायचं. एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे त्यांची तेलाने मालीश व्हायची. त्याच्यासाठी घरातला AC चोवीस तास सुरू असायचा. त्याला रोज नवीन कपडे घातले जायचे.

पण तो गेल्या दीड वर्षांपासून मृत होता. घरातले मात्र त्याला जिवंत समजून रोज त्याची सेवा करायचे.

दिड वर्षात त्याचं शरीर सुकून एखाद्या ममी सारखं झालं होतं. पण शरीर कुजलं नव्हतं. कारण रोज डेटॉल लावल्याने बॅक्टेरिया होण्याची, कुजण्याची प्रक्रियाच झाली नव्हती. माणूस मेल्यानंतर काही दिवसात आतले भाग सडायला सुरवात होतात. त्यातून पाणी सुटतं व शरीरातून बाहेर येवू लागतं. पण हे कुटूंब ते स्वच्छ करायचं.. 

या कुटूंबात एकूण 10 जण होते. सगळेच शिकलेले. आई वडिल त्यांची तीन मुलं, तीन सुना सोबत लहान मुलं. स्वत: वडील ऑडिनन्स फॅक्टरीत कामाला होते. एक मुलगा वीज मंडळात, दूसरा सिंचन विभागात हेड असिस्टंट तर तिसरा इन्कम टॅक्स विभागात अधिकारी. सुना देखील बॅंकेत, पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होत्या.  

पण या सगळ्या कुटूंबाने आपल्याचं इन्कम टॅक्स मध्ये काम करणाऱ्या मुलाचा मृतदेह दिड वर्ष घरात जपून ठेवला होता.. 

नेमकं प्रकरण काय होतं.. 

कानपूरच्या कृष्णापुरी भागात विमलेश कुमार राहत होते. विमलेश इन्कम टॅक्स विभागात चांगल्या पदावर नोकरीला होते. पण त्यांना कोरोना झाला. कानपूरच्या एका रुग्णालयात त्यांना ॲडमीट करण्यात आलं. 22 एप्रिल 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने डेथ सर्टिफिकीट दिलं. आणि सोबत मृतदेह देखील. 

कोरोनाच्या काळात अंत्यविधीसाठी कोण येत नव्हतं. घरातले काही सदस्यचं अत्यंसंस्कारासाठी मृतदेह घेवून स्मशानात गेले. पण तिथे गेल्यानंतर मृतदेहाचा श्वास सुरू असल्याचं त्यांना जाणवलं. वडिलांनी तिथेच मृतदेहाला ऑक्सिमिटर लावला. त्यावर हर्ट्बीट आणि ऑक्सिजनचं रिडींग आल्याने कुटूंबाचा समज ते जिवंत असल्याचा झाला. कुटूंब हा मृतदेह घेवून पुन्हा रुग्णालयात गेले. पण यावेळी त्यांना कुठेच ॲडमीट करुन घेतलं नाही, कारण रुग्णालयात प्रचंड गर्दी होती. कुटूंबाने मग मृतदेह घरून घ्यायचा निर्णय घेतला. 

गेल्या दिड वर्षांपासून ते जिवंत आहेत व कोमात आहेत असा समज कुटूंबाचा होता. विमलेश यांच्या पत्नी बॅंकेत नोकरीला होत्या. त्याच मृतदेहाला रोज डेटॉलने पुसून घेत. तेलाने मालीश करत.. 

रोज डेटॉलने पुसल्यामुळे मृतदेह सडण्यापासून वाचला पण तो ममी सारखा झाला. विमलेश हे जिवंत नाहीत याची कल्पना त्यांच्या पत्नीला आली होती पण कुटूंबाच्या प्रेशरमधून त्या देखील विमलेश कोमात आहेत असच म्हणू लागल्या. मृतदेहासाठी स्वतंत्र खोली करण्यात आली. इथे चोवीस तास एसी ठेवण्यात आला.. 

आजूबाजूच्या लोकांनी विमलेश ची चौकशी केली तर विमलेश हे कोमामध्ये असल्याचं कुटूंब सांगू लागलं. अशाच प्रकारे ती गेले दिड वर्ष एका मृतदेहासोबत राहत होते. मात्र विमलेश जिथे काम करत होते त्या इन्कम टॅक्स खात्यामध्ये दिड वर्ष गैरहजर असल्याबाबत चौकशी सुरू झाली. अधिकाऱ्यांनी फोनवर विमलेश यांच्या पत्नीकडे चौकशी करण्यास सुरवात केली. तेव्हा पत्नीनेच सर्व प्रकार या अधिकाऱ्यांना सांगितला. 

अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. त्यानंतर पोलीसांची टिम, खात्यातले कर्मचारी व डॉक्टरांच एक पथक विमलेश यांच्या घरी आलं. विमलेशच्या कुटूंबाने विमलेश जिवंत असल्याच घोषा सुरू ठेवला. त्यावेळी डॉक्टर हा मृतदेह हॉस्पीटलला घेवून गेले व तिथे विमलेश मृत असल्याचं घोषीत केलं. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे संपुर्ण कुटूंब शेअर्ड डिल्यूजन डिसऑर्डरचे शिकार झाले होते. एका सदस्याचा विश्वास बसल्यानंतर सर्वच कुटूंबाच ते मत झालं व त्यांच्या मनात विमलेश जिवंत असल्याचा पक्का समज होत गेला. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.