कोथरूडचा केदार जाधव वर्ल्डकप मध्ये पुणेरी झटका दाखवणार का?

एकेकाळी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडूलकर, झहीर खान अजित आगरकर अशा मराठी खेळाडूनी निम्मी टीम भरलेली असायची.

पण सध्याच्या टीम मध्ये एकमेव मराठी नाव दिसतंय केदार जाधव.

पुण्याच्या कोथरूडमध्ये परमहंस नगर इथे लहानाचा मोठा झालेला केदार. त्याच्या घराजवळच जीत ग्राउंड नावाच एक मैदान आहे. याच ग्राउंडवर केदारने अनेक रबरी बॉल आपल्या बॅटने फोडले होते. इथेच पाच ओव्हर दहा ओव्हर पंचवीस ओव्हरच्या टेनिस बोल टूर्नामेंट  त्याने गाजवल्या. परमहंस नगरचा छोटा पोरगा पण आपल्या केदार दादाने कुठल्या खिडकीची काच कशी फोडली होती ते सांगतो.

याच टेनिस बोल क्रिकेटने त्याच्यातला खेळाडू घडवला. आज कधी वारजे तर कधी पौड तर कधी येरवडा अशा ठिकाणी त्यांची टीम स्पर्धेत उतरायची. या स्पर्धा तिथल्या कुठल्यातरी गावच्या दादाने किंवा एखाद्या गुंठामंत्र्याने आयोजित केलेल्या असायच्या. अशा स्पर्धांचे निकाल आधी ठरलेले असायचे, अंपायरच्या निर्णयावर भांडणंसुद्धा हमखास व्हायची. पण यामुळे काय झालं केदारच्या खेळत एक राउडीनेस आला. अरे ला कारे करायची हिमंत आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्लेजिंग वगैरेनी कधी त्याच्यावर फरकचं नाही पडला.

शिवाय कोथरूड पुण्यात राहत असल्यामुळे अपमान काय असतो याच बाळकडूचं मिळालेलं होतं, त्यापुढे ऑस्ट्रेलियन स्लेजिंग म्हणजे त्याला छान छान गोष्टी वाटत असतील. 

स्ट्रीट स्मार्टनेस हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. आजही तो खेळताना टेक्स्टबुक शॉट वगैरे च्या भानगडीत पडत नाही, बॉलिंग करताना देखील प्रत्येक बॉल टाकताना त्याची अक्शन बदलते, बॉल पण वेगळा पडतो. त्याच्या खेळाचा समोरच्याला अंदाजचं येत नाही. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग विकेटकीपिंग सगळ्यामध्ये स्वतःची स्टाईल डेव्हलप झाली आहे. ही सगळी त्या टेनिस बॉल क्रिकेटची कृपा.

केदारला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नाव गाजवूनही त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर चान्स मिळायला बरीच वर्षे गेली. वयाच्या 29 व्या वर्षी त्याला श्रीलंकाविरुद्धचा एक सामना खेळायला मिळाला. तेव्हा त्याला काही कमाल करता आली नव्हती. त्यामुळे बाहेर पडला. जवळपास करीयर संपल्यात जमा झालं .

Screenshot 2019 05 31 at 2.34.16 PM

पण त्याच्या नशिबाने आणि मेहनतीने साथ दिली. २०१५ सालच्या झिम्बाब्वे दौऱ्या मध्ये मुख्य खेळाडू खेळणार नव्हते. नवीन खेळाडूना चान्स द्यायच ठरलं होत, यातूनच केदार जाधवचंही सिलेक्शन झालं,आयपीएल मुळे सगळ्यांच्या तोंडात हे नाव होतचं. पहिले दोन सामने केदारला आपल्या टलेंट प्रमाणे परफॉर्म करायला जमलं नाही. 

आता सिरीजचा फक्त एकच सामना उरला होता. तो हरारे मध्ये होणार होता. प्रॅक्टीससाठी ग्राउंडमध्ये उतरताना जिन्यापाशी केदारला एक बोर्ड दिसला. त्यावर त्या स्टेडियमच्या निर्मितीची तारीख लिहिली होती. मार्च १९८५. याच वेळी केदारचा जन्म देखील झाला होता. केदारच्या मनात विचार आला,

या ग्राउंडची आणि आपली जर्नी एकत्रच सुरु झाली आहे. हा आपला शेवटचा मौका आहे. अभी नही तो कभी नही.

डोक्यावर भल मोठ प्रेशर घेऊनचं केदार मैदानात उतरला. अजिंक्य रहाणे तेव्हा कॅप्टन होता. त्याने टॉसं जिंकून पहिली बॅटीन्ग निवडली. पण त्या दिवशी झिम्बाब्वेच्या फास्टर बॉलर्सनी भारतीय संघाला चांगलेच जखडून ठेवले होते. रहाणे, एमविजय मनोज तिवारी वगैरे खेळाडू काही प्रभाव न पाडता आउट झाले. मनिष पांडे आणि रॉबिन उत्ताप्पा यांची पार्टनरशिप चांगली जम बसवत होती तेव्हड्यात उत्ताप्पा देखील आउट झाला.

झिम्बाब्वेसमोर चार बाद ८२ अशी वेळ भारतावर आली होती. केदारचा नंबर आला.  भयानक दडपणाखाली खेळत असल्यामुळे त्याची सुरवात अडखळतचं झाली होती. अगदी १०-१५ रनवर असताना त्याने एक बॉल प्लेड करायचा प्रयत्न केला, तो त्याच्या बॅटच्या एजला लागून किपरच्या हातात गेला. कोणालाही काही कळाले नाही. फक्त किपरने आउट म्हणून अपीलही केली. केदारला ठाऊक होते आपण आउट आहे, तो अतिशय नर्व्हस झाला होता. पण त्याने ते चेहऱ्यावर दाखवले नाही. काही झालच नाही या अविर्भावात त्याने अंपायरकडे बघितले. अंपायरने त्याला नॉट आउट दिले. पुण्यात शिकलेला स्ट्रीट स्मार्टनेस इथे त्याला उपयोगी पडला.

परत थोड्यावेळात झिम्बाब्वेचा कॅप्टन ग्रहम क्रेमर जेव्हा बॉलिंगला आला, तेव्हा ४० वर खेळत असलेला केदार त्याच्या गुगली वर फसला. त्याने  कटमारायचा प्रयत्न केला, पण बॅटच्या हंडलला लागून बॉल पोईंटच्या दिशेने हवेत उंच उडाला. तिथे उभ्या असलेल्या खेळाडूसाठी अगदी सोपा सिम्पल कॅच होता. त्याच्या हातात बॉल जाई पर्यंतच्या दोनचार सेकंदात केदारला आपल पूर्ण क्रिकेट करीयर डोळ्यासमोर उभ राहिलं. त्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. बॉलरने सेलिब्रेशन सुरु सुद्धा केले होते.

Screenshot 2019 05 31 at 2.37.19 PM

पण त्या दिवशी केदारचं नशीब जोरावर होत. एकदम सोपा कॅच त्या झिम्बाब्वेच्या खेळाडूच्या हातात टप्पा खाऊन खाली पडला. देव सुद्धा त्याला म्हणत असावा की आता तरी खेळ. केदारला कळाल आज आपला दिवस आहे. काहीही झालं तरी आपण आउट होत नसतो. त्याने आपला नॅचरल गेम खेळायला सुरवात केली.

पन्नासाव्या ओव्हरचा पाचवा बॉल होता. केदार ९७ वर खेळत होता. आताचा बॉल ला बाउन्ड्री मारली नाही तर आपल शतक होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. बॉलरने बॉल टाकायच्या आधीच केदार बाउन्डरी मारायची म्हणून आपल्या क्रिज मधून शफल करून बाहेर आला. बॉलरने पनीक होऊन कंबरेच्या वर फुलटोस हाणला. केदारने सहज पूल करून सिक्स मारला.

त्याची पहिली सेंच्युरी थाटात पूर्ण झाली होती. केदार लहानपणापासून सलमान खानचा फन आहे. त्याने मैदानातच दबंग स्टाईल मध्ये डान्स सुरु केला. त्याचं ते सेलिब्रेशन बघून पॅव्हेलीयनमध्ये बसलेले हरभजन वगैरे त्याचे साथीदार देखील नाचू लागले.

त्यादिवशी केदारच्या करीयरची गाडी रुळावर आली. इंग्लंडला आपल्या पुण्याच्या घरच्या मैदानावर मारलेल शतक असो  किंवा त्याच सिरीज मध्ये मारलेल्या ९० धावा केदारने आपले महत्व भारतीय टीम सिलेक्टर्सन पटवून दिले आहे. त्याने शोधून काढलेला सरपटी बॉल, त्याची पार्टटाईम विकेटकीपिंग, त्याची धुंवाधार बॅटिंग या सगळ्यामुळे त्याच भारतीय संघातल स्थान पक्क झालं.

आणि आपल्या मराठमोळ्या जिद्दी चिकाटी मराठी गुणांमुळे त्याला इंग्लंड वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला रीप्रेजेंट करण्याचा मान मिळाला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.