चहा विकून मोठ्ठ होणाऱ्यांच्या यादीत एक नाव समाविष्ट केले पाहिजे, फुटबॉलचा देव पेले

फुटबॉल म्हणल्यावर दोन तीन नाव आपल्याला हमखास आठवतात ते म्हणजे रोनाल्डो, मेस्सी, नेमार वैगरे अजून थोडं पाठीमागे गेलं तर पेले आणि मॅरेडॉना. पण फुटबॉलचा देव असा दर्जा ज्याला मिळाला तो होता पेले. पेले काय साधासुधा गडी नव्हता तर त्याच्या तावडीतून बॉल मिळवणं म्हणजे एक मोठं दिव्य मानलं जायचं. अतिशय संघर्षमय परिस्थितीतुन आलेला पेले फुटबॉलचा देव कसा बनला त्याबद्दलचा हा त्याचा प्रवास जाणून घेऊया.

२३ ऑक्टोबर १९४० रोजी पेलेचा जन्म झाला.

पेलेचं नाव एडिसन एड्सन अरांटीस डो नैसीमेंटो आहे पण त्याला त्याच्या इतक्या भल्यामोठ्या नावामुळे सगळीकडे पेले याचं नावाने ओळखलं जाऊ लागलं. नैसर्गिक देणगी पेलेला होती त्यामुळे तो ब्राझीलच्या फुटबॉल टीमचं भविष्य बनला होता. पेलेचे वडील डॉनडीनहो हे सुद्धा एक फुटबॉलपटू होते त्यामुळे घरातूनच पेलेला फुटबॉलचं बाळकडू मिळालं.

लहानपणापासूनच पेलेला फुटबॉलचं भयंकर वेड होतं. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो चहाच्या दुकानात चहा विकण्याचं काम करत असे. पेलेच्या घरची गरिबी इतकी होती की त्याला फुटबॉल खरेदी करण्यासाठी पैसेसुद्धा नसायचे म्हणून तो सॉक्समध्ये कचरा भरून त्याने फुटबॉल खेळायचा.

पेलेवर आलेल्या सिनेमात बऱ्याच गोष्टी वगळल्या असल्या तरी त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये डिटेलमध्ये या गोष्टी आहेत.

पेलेचा फुटबॉलचा खेळ बघून तत्कालीन फुटबॉल सुपरस्टार वालडीमार डी ब्रेटोने जेव्हा पेलेचा खेळ बघितला तर तोही आश्चर्यचकित झाला होता. त्याने पेलेला पेशेवर क्लब, संटॉस एफसी क्लबमध्ये सामील केलं.१९५६ साली त्याने पेशेवर मॅच खेळला आणि आपलं टॅलेंट त्याने दाखवून दिलं. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सांटॉस क्लबसाठी पेलेने खेळायला सुरवात केली.

तिथला त्याचा खेळ बघून त्याची लगेचच ब्राझीलच्या नॅशनल फुटबॉल टीममध्ये निवड झाली. ७ जुलै १९५७ रोजी अर्जेंटिना विरुद्ध पेलेने पदार्पण केले आणि पहिला गोल नोंदवला. वयाच्या १६ व्या वर्षी आंतराष्ट्रीय फुटबॉल खेळताना पहिला वर्ल्डकप त्याने जिंकून दिला.

पेलेने १९५८ साली फिफा वर्ल्डकप मध्ये ब्राझीलकडून खेळताना क्वार्टर फायनल, सेमिफायनल आणि फायनलमध्ये योगदान देताना ४ मॅचमध्ये ६ गोल केले आणि बरेच रेकॉर्ड स्वतःच्या नावावर नोंदवले होते. १९६० च्या काळात पेलेचं फुटबॉल करिअर धोक्यात आलं होतं पण पूर्ण ताकदीनिशी त्याने परतावा केला होता.१९६२ साली त्याला भयंकर दुखापत झाली आणि पूर्ण वर्षभर तो संघाबाहेर राहिला. १६९४ ते १९६६ च्या काळात तेही वर्ल्डकपच्या काळात त्याला संघात घेतलचं नाही.

पण इतकं असूनही तो संघात परतला आणि १९६९ मध्ये वास्कोडीगामा विरुद्ध त्याने १००० वा गोल नोंदवत इतिहास रचला.

१९७० साली पेलेचा शेवटचा वर्ल्डकप होता. या वर्ल्डकपमध्ये सगळ्या मॅचेस पेले खेळला आणि ब्राझीलकडून त्याने १९ गोल केले होते. पेलेच्या दमदार कामगिरीने ब्राझील हा वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकपमधील चांगल्या कामगिरीमुळे प्लेअर ऑफ द टूर्रनामेंटचा अवॉर्ड त्याला देण्यात आला होता.1 ऑक्टोबर १९७७ साली पेलेने फुटबॉलची शेवटची मॅच खेळली. बरेच रेकॉर्ड पेलेने आपल्या नावावर केलेले आहेत म्हणून त्याला फुटबॉलचा देव मानलं जातं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.