आमच्या कोल्हापूरच्या मटण लोणच्याचा नाद करायचा नाय..!

मंडळी, लोनच्याचं नुस्त नाव जरी काड्ल तरी माज्या तोंडात रक्काळा फुटतोय आनी त्यात ते आमच्या कोल्हापूरचं मटनाचं लोनचं आसंल तर मग ईशय हार्डचं ओ. तसं मटनाचं लोनचं पार काश्मीरपास्न कन्याकुमारीपतूर समदीकडं करत्यात.

खरं आमच्या कोल्हापूरच्या लोन्च्याचा नादचं कराय्चा न्हाई !

तुमाला लोनचं म्हटलं की लई लांबड आस्नार आसं वाटनं साहजीक हाय खरं ह्यो ईशय तसा नस्तोयं आनी ते दोन्चार दिस टिकतयं बी. म्हनूनचं आमच्या आबा-आज्ज्याच्या जमान्यात लांब कुटतर जायाचं आस्लं की मान्सं हे संगट घिऊन जायाचीत.

म्या म्हन्ल तस हे लोनचं करायला लय आवगड न्हाई.

सगळ्यात आदी न्हेमीपरमानं तेल, आल्ल-लसून, हाळद, मीठ आनी मटन घालून परतून घ्याचं. मग त्यात धई (दही) आन पळीभर पानी घालून मटन शिजवून घ्याचं. मटन शिजूस्तवर तव्यात वाळ्ळ खोबरं, तीळ, खसखस, लवंग, वेलची आनी दालचीनी कोरडीच भाजून घ्या. ते गार झाल्याव खोबरं हातानचं कुस्करून घिऊन बाकी समदं खलबत्त्यात कुटून घ्याचं.

आता ह्या तीळ-खोब्र्यात कोल्हापूरी कांदा-लसून चटनी, वाईच गरम मसाला, मिरची पावडर आनी मीठ घालून चांगलं हालवून घ्याचं. दुसऱ्या एका कडईत तेल तापवून शिजवून घेतल्याल्या मटनाच्या फुडी त्यातलं पानी जाईस्तवर तळून घ्याच्या. आता हे तळून घेतल्यालं मटन वरच्या मसाल्यात घालून वरनं लिंबू पिळाय्चा आन् समदं हालवून घ्याचं की झालं मटनाचं फर्मास लोनचं तयार!

आसं हे कुरकुरीत, चरचरीत आन् आंबट चवीचं नाद खुळा मटनाचं लोनचं आटधा दिस टिकतयं आसं म्हंत्यात.

म्या म्हंतो तेव्डं ऱ्हाईना, दोन्चार दिस तरी टिकाय काय हारकत न्हाई. आमच्या घरात तर सक्काळी केल्यालं लोनचं सांच्याला बगाय घावत न्हाई. आस्स हे लोनचं तुमी येक्डाव खाल्लसा की तेनं तुमच्या जीबच्या सातबाराव तेजं नाव कायमचं लिवलचं म्हनून समजा!

  • शिवप्रसाद मेढे (९९२३७९७५७५ / ८१७७९९६८७९)

हे हि वाच भि़डू. 

Leave A Reply

Your email address will not be published.