नेत्यांची लाडकी लँड क्रुझर नव्या रूपात येतीय पण तिला आता ४ वर्षांचा वेटिंग पिरियड असणार

राजकारणात एक ट्रेंड असतो. तो ट्रेंड मग कार्यकर्त्यांपासून नेत्या पर्यंत सगळेच फॉलो करतात. मग तो कपड्यांचा असो, गाडी, कलरचा असं सगळं. आपला नेता का ट्रेंड फॉलो करतो  याकडे सगळेच लक्ष ठेऊन असतात. आणि त्याप्रमाणे फॉलो करायला सुरुवात करतात. मोदी वापरतात त्या जॅकेटच बघा ना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कपड्याच्या बाबतीत किती आग्रही असतात हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यात भर पडली ती जॅकेटमुळे. त्यांचे हे जॅकेट नेत्यांपासून ते बड्या बड्या नेते वापरते झाल्याचे पाहायला मिळते. आणि एक-एक करत सगळेच आपले नेते काय वापरतात त्याची कॉपी करत असतात.

तसेच आपले नेते कुठली गाडी वापरतात याकडे सगळ्यांचे आवर्जून लक्ष असते. टाटा सफारी नंतर सर्रास सर्वच नगरसेवकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत टोयोटाची फॉर्च्युनर वापरात येते. नंतर देश पातळीवर अनेक मोठ्या नेत्यांनी फॉर्च्युनरकडे असणारा मोर्चा लँड क्रुझरकडे वाळविल्याचे दिसून येते. 

 हि भारदस्त गाडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारीच आहे. 

नवीन-जनरेशन लँड क्रूझर गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली आहे आणि तिला ३०० सिरीज असं नाव देण्यात आलं आहे. या नव्या एसयूव्हीला जगभरात चांगलीच पसंती मिळत आहे. बाह्य तसेच आतील भागात मोठ्या सुधारणा करण्यात आल्याचे टोयोटाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

सामान्य नागरिक गाडी घेतांना एक विचार करतो की, गाडीला किती ऍव्हरेज आहे. मात्र नेते मंडळी, अति श्रीमंत व्यक्ती गाडी घेतांना पहिला विचार करतात तिच्या सुरक्षितेसंदर्भात मिळणारे फिचर. पण या नवीन लँड क्रुझर प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली आहे.

देशभरती मोठ्या नेत्यांच्या ताफ्यात लँड क्रुझर आपल्याला पाहायला मिळते.  

 देशपातळीवर विचार करायला गेलं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात अनेक वेळा लँड क्रुझर पाहायला मिळाली आहे. तसेच  काँगेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योत सिंग सिद्धू आदी नेत्यांची नवे आघाडीवर आहेत. 

राज्यात सुद्धा लँड क्रूझरची चांगलीच क्रेज असल्याचे पाहायला मिळते. विशेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडे हि गाडी आहे. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जितेंद्र आव्हाड,  राज्यमंत्री सतेज पाटील आदी नेते हि suv वापरत असल्याचे पाहायला मिळते.      

तर या गाडीत काय भारी आहे ते पाहुयात 

तर हि गाडी जगभर प्रसिद्ध आहे. या नवीन लँड क्रूसर गाडी मध्ये आपल्याला दोन इंजिन पर्याय दिले आहेत. त्यात ३.३ लिटर ट्विन टर्बो व्ही ६ पेट्रोल आणि ३.३ लिटर ट्विन टर्बो व्ही ६ डिझेल इंजिन असणार आहे. गैर ऑटोमॅटिक असणार आहे. या गाडीची किंमत १.५ कोटी ते १.८ कोटी असण्याची शक्यता आहे. 

या योटा सेफ्टी सेन्स अॅक्टिव्ह सेफ्टी पॅकेज देण्यात येणार असून यामध्ये प्री-कॉलिजन सिस्टिमसह अनेक फिचर्सचा समावेश असेल. हे वैशिष्ट्य अपघातात वेळी संरक्षणासाठी उपयुक्त असेल. याशिवाय पार्किंग सपोर्ट ब्रेक फीचरही देण्यात येणार आहे. ऑफ-रोडिंगच्या बाबतीत, यात E-KDSS (इलेक्ट्रॉनिक कायनेटिक डायनॅमिक सस्पेंशन सिस्टम), मल्टी-टेरेन मॉनिटर आणि मल्टी-टेरेन सिलेक्ट फीचर देखील मिळणार आहे. 

मात्र चर्चा होतीये ती गाडीच्या वेटिंग पिरियडची 

कंपनीने अमेरिकेत या एसयूव्हीची विक्री थांबवली आहे, त्यामुळे फक्त मध्य पूर्व देशांमध्ये हि गाडी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.  मागणीसह मोठा वेटिंग पिरियड असण्याचे मुख्य कारण म्हणजे मार्केटिंग चैन मध्ये आलेला व्यत्यय. तसेच विशेषत: सेमीकंडक्टर चिप्सचा व्यवस्थित पुरेसा पुरवठा होत नसल्याने वेटिंग असल्याचे सांगण्यात येत आहे.   

आता जर हि गाडी बुक केली तर साधारण २०२५ मध्ये मिळेल. 

 तसेच हि गाडी तुम्हाला कोणाला विकता येणार नाही 

 टोयोटाने गाडी मालकावर कडक अटी लादल्या आहेत. बुक केलेली लँड क्रूझर इतर कोणालाही विकण्याची ग्राहकाला परवानगी नसणारे. ग्राहकाची एका करारावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. . जर त्यांनी कराराच्या अटी व शर्तींचा भंग केला तर त्यांना दुसरे टोयोटा वाहन खरेदी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव असे करत असल्याचे टोयोटाने सांगितले. म्हणजे तुम्ही आज हि गाडी बुक केली आणि चार वर्षानंतर गाडी घेतांना तुमचा इरादा बद्दल तर तुम्हाला गाडी खरेदी करता येणार नाही.   

Leave A Reply

Your email address will not be published.