आता हळदही कॅन्सरला यशस्वीपणे मात देऊ शकते, हे एका भारतीय महिला वैज्ञानिकाने शोधून काढलंय

भारतामध्ये खूप पूर्वीपासून आयुर्वेदाला महत्त्व दिलं जातं. आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषध यांच्यासोबत आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी लोकांचा कल जास्त असतो. अशात या आयुर्वेदिक पदार्थांमध्ये अडुळसा, तुळस, कडुलिंब अशा वनस्पतींचा समावेश होतो. त्यातच हळदीचाही नंबर लागतो. हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म असल्याचं बोललं जातं. या हळदीत अनेक आरोग्याच्या समस्यांशी लढण्याची गुणधर्म आहेत.

त्वचा, पोट, रक्त अशा वेगवेगळ्या अवयवांतील रोगांशी लढण्यात फायदेशीर असलेल्या या हळदीचे गुण  आता मोठ्या रोगांशी लढण्यासही सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. हा रोग म्हणजेच ‘कर्करोग’, ‘कॅन्सर’. हो, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आणि अतिशय महागडे उपचार असणाऱ्या आणि उपचार घेतल्यानंतरही आयुष्याची गॅरंटी नसलेल्या या रोगाविरुद्ध लढण्यास हळद सक्षम आहे.

शिवाय ही गोष्ट कुणी परदेशी वैज्ञानिकाने नाही तर भारताच्या एका ‘महिला वैज्ञानिकाने’ सिद्ध करून दाखवली आहे. त्यांचं नाव म्हणजे ‘लेखा दिनेश कुमार

भारतीय परंपरेत औषधी गुणधर्मांसाठी हळदीला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. तसंच कर्करोग बरा करण्याच्या गुणधर्मांबद्दलही नेहमीच माहिती दिली जाते. आता केरळमधील एका शास्त्रज्ञाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. कॅन्सरच्या उपचारात मोठी प्रगती साधत, लेखा दिनेश कुमार यांनी आरएनए इंटरफेरेंस (RNAi) आणि नॅनोटेक्नॉलॉजी या दोन तंत्रांना एकत्र केलं आहे. 

ज्याद्वारे बिनविषारी (नॉन टॉक्सिक) आणि सेंद्रिय असे जैव औषध (बायोड्रग) बनवले जात आहे. हे औषध विशिष्ट ठिकाणी मोठे आतडे आणि स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर परिणाम करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.  

लेख सध्या सीएसआयआरच्या सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्यूलर बायोलॉजी-सीसीएमबी, हैद्राबाद इथे काम करतात. कॅन्सर बायोलॉजीसाठी प्रोजेक्ट लीडर म्हणून त्या काम पाहतात. 

त्यांनी त्यांच्या या शोधाबद्दल अधिकची माहिती दिलीये. हळदीबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, हळदीतील सक्रिय घटक कर्क्युमिनमध्ये (Curcumin) योग्य प्रमाणात एंटीकार्सिनोजेनिक (anticarcinogenic), एंटी-इंफ्लेमेटरी (anti-inflammatory) आणि एंटीऑक्सीडेंट (antioxidant) गुणधर्म असतात. ते कॅन्सर उपचार विज्ञानासाठी आदर्श आहेत.  इतर जैविक घटकांसह क्युरक्यूमिनचा उपयोग जैव औषधे पाठवण्यासाठी केला जातो.

या उपचारात ‘जीन-साइलेंसिंग अप्रोच’ (gene-silencing approach) किंवा आरएनएआय पद्धत वापरली जाते. RNAi हा कर्करोगासारख्या जुनाट आजारांसाठी टार्गेटेड आणि फोकस्ड थेरपीसाठी एक आशादायक उपचाराची पद्धत आहे. याला नॅनो टेक्नॉलॉजीची जोड दिली जाते. ज्याने नॅनो-वाहक विकसित होतात जे आरएनएला लक्ष्य करतात आणि अतिक्रियाशील जनुकांना शांत करतात. हे अतिक्रियाशील जीन्सचं ट्यूमर आणि कर्करोगासाठी जबाबदार असतात. हे तंत्रज्ञान निवडलेल्या जनुकांना शांत करते.

लेखा यांच्या म्हणण्यानुसार, आरएनएआय रेणूंसाठी सुरक्षित आणि प्रभावी वितरण पद्धतींचा अभाव हे एक मोठं आव्हान आहे. ज्याने RNAi-आधारित थेरपी वाढण्यापासून थांबवली आहे.

लेखाने विकसित केलेले बायोऔषध बिनविषारी आणि सेंद्रिय आहे. परिणामांनी सिद्ध केलं आहे ही, नॅनो-आरएनएआय बायोड्रग फॉर्म्युला टार्गेटेड जनुकांवर परिणाम करतात आणि ट्यूमरला प्रभावीपणे संपवतात. कोणत्याही शोधाची चाचणी आधी उंदरांवर केली जाते हे आपल्याला माहित आहे. जेव्हा याचा उंदरावर प्री-क्लिनिकल अभ्यास केला गेला तेव्हा असं दिसून आलं की, औषध दिल्यानंतर उंदरांचं आयुष्य एक चतुर्थांश वाढलं. 

जर याची तुलना माणसांशी केली गेली तर चांगलं आयुष्य लाभण्याची गॅरंटी हे देतं. जीवनात एक चतुर्थांश वाढ म्हणजे मानवांसाठी २० ते २५ वर्षांची वाढ. तर आता लेखा यांच्या या अभ्यासाची पुढच्या टप्प्यात  क्लिनिकल चाचणी मानवांवर केली जाणारेय. त्याचे परिणाम काय येतात याकडे संगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.