बाळासाहेब कायदा जाळा म्हणाले तेव्हा, शेजारीच मी आणि मुंडे कायदा सुव्यवस्थेवर बोलत होतो.

बाळासाहेब ठाकरेंची भाषा थेट. ठाकरे शैलीतलं उत्तर असा एक नवा वाक्यप्रचारच महाराष्ट्राच्या मातीला बाळासाहेबांमुळे मिळाला. तर दूसऱ्या बाजूला मनोहर जोशी हुशार पण मार्मिक बोलणारे. जस बाळासाहेबांनी एखाद वादग्रस्त वक्तव्य केल तर कितीही टिका झाली तरी बाळासाहेब ते मागे घेत नसत की त्यावर दिलगिरी व्यक्त करत नसत. तर दुसरीकडे मनोहर जोशी कधी चुकिच बोलले आहेत याचं उदाहरण मिळणं अवघडच. 

हा किस्सा बाळासाहेबांच्या थेटपणाचा आणि मनोहर जोशींच्या हुशारीचा?

राज्यात युतीचं शासन होतं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांच्याकडे कारभार होता तर गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे कारभार पाहत होते. 

अशाच एके दिवशी बाळासाहेबांच्या हस्ते वांद्रे कलानगर येथील प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपुलाचं उद्धाटन होतं. बाळासाहेबांसह मुख्यमंत्री या नात्याने मनोहर जोशी आणि गृहमंत्री या नात्याने गोपीनाथ मुंडे उपस्थित होते. 

उड्डाणपुलाच उद्धाटन झालं आणि बाळासाहेबांनी भाषणाला सुरवात केली, या भाषणात बाळासाहेब ठाकरे आपल्या शैलीप्रमाणे म्हणाले,

जर भारतीय घटनेचा उपयोग किंवा कायद्याचा उपयोग सामान्य माणसासाठी होणार नसेल तर ती घटना काय कामाची ? असले कायदे जाळुन टाका !

झालं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांनी केलेली टिका नक्कीच विरोध करण्यासारखी होती. हा विषय सभागृहात चर्चेला आला.

सभागृहातमध्ये व्यंकप्पा पत्की यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यांचा प्रश्न असा होता की, बाळासाहेब मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कायदा जाळुन टाकण्याची भाषा वापरतात तर मुख्यमंत्री त्यावर कारवाई का करत नाहीत ! 

या वेळी मनोहर जोशी अत्यंत गंभीरपणे म्हणाले,

“ज्या वेळी बाळासाहेबांनी असं वाक्य उचारलं, त्यावेळी मी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ कायदा व  सुव्यवस्थेची चर्चा करत होतो. म्हणून बाळासाहेबांच वाक्य मला ऐकू आलं नाही.”

मनोहर जोशींनी दिलेलं उत्तर हुशारपणाचं होतं की मुख्यमंत्र्यांनी काय ऐकावं काय नाही, यावर अनेकांनी त्या काळात लिहलं. गदारोळ झाला, चर्चा झाली. तेव्हाच्या वर्तनानपत्रात अग्रलेख देखील आले. महाराष्ट्र टाईम्सने तेव्हा चलाख उत्तर असा अग्रलेख देखील लिहला !

हे ही वाचा – 

 

Leave A Reply

Your email address will not be published.