IPC च्या या गुन्ह्यांद्वारे शाम्मीला होवू शकतोय १० वर्षांपर्यंतचा कारावास !!!

 

विवाहबाह्य संबधाचे चॅटिंग सापडल्यानंतर शाम्मीच्या पत्नीने सध्या दूर्गावतार धारण केला असून तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुरूष पोलिसांनी देखील कदाचीत मनावर दगड ठेवून हे गुन्हे नोंद केले असावेत. आत्ता या सगळ्यातून पुढील दोन चार महिन्यात पुर्वीसारखं नवरा बायकोचं प्रेम फुललं नाही तर शम्मीची अक्षरश: लागू शकते.

आम्ही हि कलम खास त्या वाचकांच्या माहितीसाठी आणली आहेत ज्यांना येणाऱ्या काळात आपले स्क्रिनशॉट पडण्याचा धोका जाणवत आहे.

IPC 376 – “बलात्कार” मोहम्मद शाम्मीच्या पत्नीमार्फत दाखल केलेल्या गुन्हांपैकी बलात्काराचा गुन्हा हा प्रमुख मानला जातोय. हा गुन्हा सिद्ध झाल्यास शाम्मीला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा होवू शकते.

IPC 307 – “खूनाचा प्रयत्न करणे” गंभीर स्वरुपाच्या या गुन्ह्यांत आरोप सिद्ध झाला तर किमान ७ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो.

IPC 498 A – “विवाहित स्रीस क्रुरपणे वागवणे, घरगुती हिंसाचार करणे” अस या कलमाचं स्वरुप असून हा आरोप सिद्ध झाल्यास किमान ३ वर्षांची शिक्षा शाम्मीस भोगावी लागेल.

IPC 327 – “संपत्ती अथवा किंमती वस्तू मिळवण्यासाठी आपखुषीने इजा करणं” अस या गुन्ह्यांच स्वरूप असून यात शम्मीला १० वर्षांची शिक्षा भोगावी लागू शकते.

IPC 506 – “धमकी देणं, दबाव निर्माण करणं” अस या गुन्ह्याच स्वरूप असून हा आरोप सिद्ध झाल्यास शाम्मीला किमान २ वर्षाचा कारावास भोगावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.