सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करु नये असा सल्ला शंकररावांनी इंदिरा गांधींना दिला होता

शंकरराव चव्हाणांची इंदिरा गांधींप्रती किती निष्ठा होती हे त्यांच्या आजवरच्या प्रवासातून दिसतं. याचमुळे त्यांच्यावर बऱ्याचदा टीका ही झाली होती. पण प्रसंगी शंकरराव इंदिरा गांधींना सुद्धा सल्ला द्यायला मागे पुढे पाहायचे नाहीत.

ऑपरेशन ब्लुस्टार करू नये असा सल्ला ही त्यांनी इंदिरा गांधींना दिला होता, त्याचाच हा किस्सा.

तर आणीबाणीच्या काळात शंकररावांनी मंत्रालयाच्या कारभारात शिस्त आणली होती. मात्र शंकरराव चव्हाणांच्या शिस्तीमुळे सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड निर्माण झाली. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून १९७७ च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला ४८ पैकी २८ जागा गमावाव्या लागल्या. याचा परिणाम पराभवाचं खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्यात आलं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं.

पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल.

पण त्याआधी…

ऐंशीच्या दशकात फुटीरतावादी खलिस्तान चळवळ सुरू झाली तेव्हा संपूर्ण देशाबरोबर पंजाबी जनताही भयचकीत झाली होती. भिंद्रानवाला खालिस्तानची घोषणा करणार होता. याची त्याने पूर्ण तयारी केली होती. त्याला पाकिस्तानचे प्रत्यक्ष पाठबळ होते. अमृतसरला खालिस्तानची राजधानी करण्याचा कट त्याने रचला होता. किमान चार-पाच वर्षे जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याचे साथीदार अमृतसरच्या हरमंदिर साहिब मंदिरात तळ ठोकून होते.

१९७८ ला निरंकारी विरुद्धच्या संघर्षाने सुरवात झालेल्या पंजाबमधील संघर्षाला बांगलादेशनिर्मितीच्या सूडाने पेटलेल्या पाकिस्तानने सक्रिय पाठिंबा दिला.

पाकिस्तान मधील पंजाबमध्ये शीख तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना भारताविरुद्ध भडकविण्यात येत होत. मार्च १९८१ मध्ये स्वायत्त खलिस्तानचा झेंडा आनंदपुर साहिब वर फडकवण्यात आला. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांनी जहाल भाषणे देण्यास सुरवात केली. डिसेंबर १९८३ मध्ये जर्नेल सिंह यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त साहिब मध्ये आश्रय घेतला. तेथेच आपले मुख्यालय स्थापन करून त्यांनी सुवर्णमंदिरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जमवला.

सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. पंजाबातील निरपराध शिखांचे शिरकाण करणे आणि आपली दहशत पसरवणे हाच एकमेव कार्यक्रम त्यांनी राबवला. स्वतंत्र खलिस्तान ही त्यांची मागणी होती आणि त्यासाठी देशविदेशातून मोठी रक्कम गोळा केली जात असे. भारतातील विघटनकारी शक्ती बळकट होत असतील तर बरेच याहेतूने पाकिस्तानी गुप्तचरांचेही खलिस्तानी चळवळीला छुपे प्रोत्साहन होते.

इंदिरा गांधी यांना लष्करी कारवाई टाळायची होती. चर्चेच्या माध्यमातून ही समस्या सोडवायची होती. 

ऑपरेशन ब्लू स्टार सुरु करण्यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवाल्याला पत्र लिहिले होते. शिरोमणि अकाली दलाचे तत्कालिन अध्यक्ष संत हरचंदसिंग लोंगोवाल यांनाही पत्र लिहिले होते. म्हणजेच एकिकडे लष्करी कारवाईची तयारी सुरु असताना चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविण्यास इंदिरा यांनी प्राथमिकता दिली होती.

शांततामय मार्गाने तोडगा निघत तर नाहीच पण परिस्थिती बिकट होत चालल्याचे बघितल्यावर इंदिरा गांधी यांनी भिद्रनवाले आणि त्यांच्या कंपूला तेथून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराकरवी ३ ते ६ जून १९८४ काळात ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम सुरु केली.

पण पंजाबच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवू नये, असं शंकरराव चव्हाण यांच मत होत. 

ऑपरेशन ब्लू स्टार सारखी घटना टाळण्यासाठी सध्याला कडाक्याचा उन्हाळा असून तापमानही ४५ सेल्सियस एवढे आहे, त्यामुळे सुवर्ण मंदिराचा विद्युत व पाणी पुरवठा बंद केल्यास भिंद्रानवाले व त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर पडावेच लागेल, ते बाहेर पडताच त्यांना अटक करावी असा सल्ला त्यांनी दिला होता.

परंतु इंदिरा गांधींनी त्यांचे ऐकले नाही आणि ऑपरेशन ब्लू स्टार झाले. तथापी पंजाब आणि काश्मीर या राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करुन तेथे लोकशाही मार्गाने निवडणुका घेण्यात आल्या, त्याचे सर्व श्रेय शंकररावांना जाते.

हे ही वाच भिडू.

English Summary :

Shankar Rao Chavan’s devotion to Indira Gandhi is evident from his journey so far. Because of this, he was often criticized. But on occasion, Shankar Rao does not want to look back to give advice to Indira Gandhi. He had advised Indira Gandhi not to carry out Operation Bluestar.

 

WebTitle: Operation blue star Shankar Rao Chavan had advised Indira Gandhi not to carry out Operation Bluestar in the golden temple.

Leave A Reply

Your email address will not be published.