जोशी सर समोर जावून वाद घालत होते तेवढ्यात मुंडेंनी डाव साधला….

राजकारणात कधी कोण डाव साधेल ते कोणाच्या बापाला सांगता येणार नाही. आत्ताच प्रसंग बघा की माणसं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणून झोपलेले आणि तिकड सकाळ सकाळी अजितदादा आणि फडणवीसांनी शपथविधी पण पार पाडला.

खटक्यावर बोट जाग्यावर पलटी झालं.

या एकमेव तत्वावर राजकारण चालतं. इथे कधीच कुणाचा शत्रू नसतो आणि कधीच कुणाचा मित्र नसतोय. एकाच पक्षात राहणारे एकमेकांविरोधात कुरघोड्या करण्याचं राजकारण करतात तस नसतं तर इलेक्शनच्या पूर्वीच विनोद तावडेंच्या पत्ता कट झाला नसता. तसेच विरोधात असले तरी कोणीच कोणाचा शत्रू देखील नसतो. तस नसतं तर अजितदादा आणि उद्धव ठाकरेंनी आज मांडीला मंडी लावून सरकार चालवलं असतं का..?

असो लांबड लावण्यात काही अर्थ नाही, आपण मुद्द्यात हात घालूया.

हा किस्सा आहे १९९१ ते १९९३ च्या सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्री कालावधी दरम्यानचा.

विधानसभेच्या नवव्या निवडणुका पार पडून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे विरोधीपक्ष नेतेपद होतं. या निवडणुका महत्वाच्या समजल्या जातात कारण याच निवडणुकांत भाजप व सेनेने मिळून आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे ९४ जागा मिळवल्या होत्या.

सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेतेपदाची जागा भाजप पेक्षा १० जागा अधिक असणाऱ्या शिवसेनेकडे आली होती. शिवसेनेमार्फत मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते करण्यात आलं.

याच दरम्यान म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये छगन भुजबळांनी त्यांच्या आयुष्यातले ऐतिहासिक बंड केले. आपल्या समर्थक आमदारांसह त्यांनी शिवसेनेला रामराम केला होता. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मुंबई तापली होती. शिवसैनिकांनी छगन भुजबळांना मुंबईत पाय ठेवून देणार नाही अशी शपथ घेतली होती.

याच वेळी विधानसभेत हा राडा झाला होता.

झालं असं की शिवसेनेतून छगन भुजबळ गेल्यामुळे त्यांच्या आमदारांची संख्या भाजप पेक्षा कमी झाली. साहजिकच आता भारतीय जनता पक्षाकडे विरोधी पक्षाची धुरा येणं  क्रमप्राप्त होतं. पण सेने सहजासहजी विरोधीपक्षावरचा दावा सोडणाऱ्यातलं नव्हतं. तेव्हा शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होता आणि चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या मनोहर जोशींकडे नेतृत्व होतं.

त्यावेळी विलासराव देशमुख संसदीय कार्यमंत्री होते.मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते. मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते.

इतक्यात विलासरावांनी गोपीनाथरावांचा हात पकडला आणि त्यांना विरोधी पक्षनेत्याच्या जागेवर अर्थात मनोहर जोशींच्या जागेवर नेवून बसवलं.

जोशी सर मागे पाहतात तोच मुंडे साहेबांनी डाव साधला होता.

त्यांचे मित्र विलासराव इथे त्यांच्या मदतीला आले होते. त्यानंतर मनोहर जोशींनी सभात्याग करून आपल्या संतापास वाट मोकळी करून दिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.