या पाच फोटोंनी गोव्याच्या राजकारणात “फोटो राजकारणाला” जन्म दिलाय.

फेब्रुवारी महिन्यापासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत, आणि तेव्हापासून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सध्या गोव्यातील राजकीय वातावरण काँग्रेसच्या टीका आणि त्यावर भाजपकडून पर्रीकरांचे,

‘फोटो प्रसिद्ध करुन दिले जाणारे उत्तर’ अशाच प्रकारचे आहे. 

गोव्यात सुरु असणाऱ्या या फोटोनामक राजकारणाची गोष्ट आज ‘बोल भिडू’ तुम्हाला पहिल्यापासून सांगणार आहे.

चालूवर्षी फेब्रुवारी महिन्यात पर्रीकरना साध्या पोटदुखीवरून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर काही दिवसातचं त्यांना मुंबईत आणि नंतर अमेरिकेत पुढील उपचारासाठी नेण्यात आले. येथे त्यांना किमोथेरपीचा उपचार देण्यात आल्याचे सांगण्यात येते. या काळात गोवा विधानसभा सुरू होती आणि पर्रीकरांच्या अनुपस्थिवर विरोधकांनी टीकेची झोड उडविली मात्र पर्रीकरांनी आजारी अवस्थेतही विधानसभेत याच महिन्यात दणदणीत हजेरी लावून विरोधकांना उत्तर दिले.

Screen Shot 2018 12 18 at 10.13.58 AM

पर्रीकारांचे असे येणे त्यांच्या समर्थकांना सुखावणारे असले तरी ते आजारी असल्याचे सरळसरळ त्यांच्या तब्येतीवरून दिसत होते. या विधानसभेतही त्यांनी लहानसे भाषण केले. त्यांनतर त्याच दिवशी त्यांना मुंबईला नेण्यात आले.

‘पर्रीकाराना तोंड दाखवण्यासाठी आणले होते का?’

अशी टीका यावेळी आप आणि काँग्रेसने केली होती. 

यानंतर काही काळाची विश्रांती घेऊन परतल्यांनंतर गोवेकरांचे भाई त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात दिसू लागले. या कालावधीत त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली होती. किमोचे परिणाम त्यांच्या चेहऱ्यासह थकलेल्या शरीरावरही दिसत असले तरी आपण कसे दिसतो याबाबत कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता अत्यंत आत्मविश्‍वासाने पर्रीकर चारचौघात मिसळताना दिसून आले.

Screen Shot 2018 12 18 at 10.18.17 AM

त्यानंतरही पर्रीकरांच्या तब्येतीबाबतच्या विरोधकांच्या टीका थांबल्या नाहीत आणि पर्रीकरांचे उत्तर देणेही थांबले नाही. त्यांना परत दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आणि ऑक्‍टोबर महिन्यात जेव्हा त्यांना स्ट्रेचरवरून गोव्यात आणण्यात आले तेव्हा त्यांची अवस्था पाहून काही दिवसात ते राजीनाम देतील असे विरोधकांना वाटू लागले पण पर्रीकरांनी राजीनामा दिला नाही.

Screen Shot 2018 12 18 at 10.16.01 AM

त्यानी अनेक सामाजिक कार्यक्रमांना इथपर्यंतकी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला स्वताचा संदेश डिजीटल स्वरूपात पाठवून विरोधकांना उत्तर दिले.

यानंतर आलेला सर्वात विरोध झालेला फोटो म्हणजे कॅबिनेट मिटटिंगचा फोटो. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ही कॅबिनेट मिटिंग त्यांच्या घरी घेण्यात आली होती. ‘पर्रीकराना केवळ फोटोसाठी बसविण्यात आले असून मीटिंग झालीच नसल्याची झोड विरोधकांनी उठवली. या टीका धुमसत असतानाच पर्रीकरांचे तीन फोटो गेल्या दोन दिवसात परत सोशल मिडीआवर त्यांचे आणखी फोटो आले आहेत. 

Screen Shot 2018 12 18 at 10.12.49 AM

एनआयटीचे उदघाटन त्यांनी घरी केले यासंदर्भातील फोटो आणि मांडवी नदीवर बांधण्यात येणाऱ्या तिसऱ्या पुलाचे फोटो. हे पाच फोटो आता चर्चेत आले आहेत.

मांडवी नदीवरील फोटोमध्ये पर्रीकर नाकात नळी असताना अभियंत्याशी बोलताना दिसून येत आहेत. त्यांचे समर्थक हे फोटो पाहून त्यांचे कौतुक करीत आहेत, काहीजण त्यांची तब्येत पाहून आता भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करीत आहेत. खरे पाहता पर्रीकर या पुलावर सुमारे तासाभरासाठी होते, या कालावधीत ते कारमधून चार ते पाच वेळा चढून उतरले, पुलाच्या त्या बाजूला उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्याना आणि चाहत्यांना त्यांनी हात दाखवून अभिवादनही केले…

Screen Shot 2018 12 18 at 10.06.16 AM
ANI

पर्रीकरांचे असे वागणे हे त्यांच्या विरोधकांसाठी उत्तरच होते.

दरम्यान गोव्यातील वकील आयरिश रॉड्रीगिज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सरकारने पर्रीकर यांच्या आजाराची माहिती उघड करावी अशा मागणीची याचिका दिली आहे. त्यावर मुख्य सचिवांनी सीलबंद अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याने केवळ ‘पर्रीकरांचे फोटो म्हणजे केवळ दिखावा’असल्याची टीका विरोधक करीत आहेत.

या टीकेला पर्रीकर कसे उत्तर देतात ते आता वेळच ठरवेल. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.