रेल्वेत लहान मुलांसाठी सीट तयार केली पण चांगलं करण्याच्या नादात एक घोळ करुन ठेवला

आपल्याकडे महिलांना आदर दाखवायच्या नादात सहज म्हणलं जातं…”लेडीज फर्स्ट”…असा आव आणत स्त्रियांना सर्वसमावेशक घटक आम्ही बनवलं याच समजुतीत धन्यता मानली जाते…अन मग ‘स्पेशल ट्रीटमेंट’ दिली जाते..

हे बोलण्याचं निमित्त म्हणजे अशीच काहीशी स्पेशल ट्रीटमेंट रेल्वे खातं महिलांना देतंय. झालं असं की, महिलांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रेल्वे मंत्रालयाने एक निर्णय घेतला. तोच निर्णय बघून काही महिला आपल्या रेल्वे खात्यावर भडकल्यात.

तो निर्णय म्हणजे महिलांना आता, आपल्याच सीटला लागूनच बाजूला छोट्या आकाराची सीट ‘बेबी बर्थ’ मिळणार आहे. म्हणजे त्या त्यांच्या लहान मुलांना घेऊन प्रवास करणं सोपं जावं हा त्यामागचा उद्देश आहे..आता चांगलं करण्याच्या नादात रेल्वेने एक घोळ करुन ठेवलाय..तो घोळ काय ते पुढे बघूया..

अनेक वर्षांनंतर भारतीय रेल्वेने असा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे, त्याचे कौतुक करायला हवे. 

तसेच लोकप्रिय उद्योजक आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत रेल्वे मंत्रालयाचे कौतुक केले आहे. ही ‘बेबी बर्थ’ सिटी कशी असणारे हे तुम्ही या व्हिडीओ मध्ये पाहू शकता..

आता कौतुक जरी वाटलं तरी त्याचवेळी हे विसरता कामा नये की, सोशल मीडियावर अनेक जण याला विरोध करत आहेत..पण का ?

त्या आधी हे समजून घेऊया कि हे ‘बेबी बर्थ’ सिस्टीम आहे काय? 

आता रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे मातांना त्यांच्या नवजात बालकांना रेल्वे प्रवासादरम्यान झोपायला मदत होईल.

त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणजे लखनऊ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या लखनऊ मेल ट्रेनच्या डब्यात लहान मुलांना झोपण्यासाठी वेगळी जागा देण्यात आली आहे. या जागेत थर्ड एसी ट्रेनच्या डब्यात सीट देण्यात आली आहे. ही बेबी बर्थ सीट सर्वात खालच्या सीटला जोडलेली आहे. 

यात वरच्या बाजूला एक लहान हँडल आहे आणि बाजूला रॉड देखील आहे, जेणेकरून मुलाचे पूर्णपणे संरक्षण होईल. चालत्या ट्रेनच्या वेगामुळे मूल पडू नये यासाठी सीटला बेल्टही देण्यात आला आहे. बाळाला दोन्ही बाजूला उशी ठेवून झोपता येते. त्या सीटची गरज नसल्यास ती फोल्डही करता येते. 

रेल्वेने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत १० मे पासून दिल्ली-लखनौ मेलच्या खालच्या मुख्य बर्थच्या बाजूला फोल्ड करण्यायोग्य “बेबी बर्थ” सीट फिट केले आहेत.

आता हा प्रयोग वास्तविकपणे कितपत यशस्वी होतो हे पाहावं लागेल. कारण गेल्या काही वर्षांत रेल्वेने अनेक नवनवे प्रयोग सुरू केले पण ते वास्तविक पातळीवर यशस्वी होऊ शकले नव्हते. 

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांचा या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

हा अनोखा बेबी बर्थ महाराष्ट्रातील नंदुरबार येथील रहिवासी नितीन देवडे यांनी डिझाइन केला आहे. जे  व्यवसायाने शिक्षक आहेत अशी बातम्यांद्वारे माहिती मिळतेय.

IRTS अधिकारी संजय कुमार यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली,

या निर्णयाला विरोध का होतोय ?

भारतीय रेलवे ने ट्रेन में लगाई ये खास तरह की सीट... क्या आप जानते हैं ये किस काम के लिए है

आता तुम्ही या फोटोत पाहिलं तर लक्षात येईल कि बेबी बर्थ सीट आहे ती मुख्य सीटच्या बाहेरच्या बाजूस आहे.

पण कोणतीही आई तिच्या मुलाला कायमच सीटच्या आतल्या बाजूला झोपवते. तेच आईला सेफ वाटतं. पण सीटच्या बाहेच्या बाजूला बेबी बर्थ असल्याने लोकांनी रेल्वेच्या बेबी बर्थवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

संजय कुमार यांच्या या ट्विटवर अनेकांनी रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचं कौतुक केलं, तर काहींनी प्रश्नही उपस्थित केले. 

पूनम नावाच्या एका युजरने ट्विट केले की, “आई आपल्या मुलाला नेहमी उजव्या बाजूला ठेवते. हेतू चांगला आहे परंतु त्याचा इतर प्रवाशांना त्रास होणार आहे. यावर रेल्वेला काम करण्याची गरज आहे”.

अधिकारी संजय कुमार यांनीही या युजरला सहमती दर्शवली. त्यांनी लिहिले की मुलाला नेहमी आत ठेवले जातं याशी पूर्णपणे सहमत आहोत. आता बाळासाठी बनवलेली एक्सट्रा जागा आईसाठी वापरात येईल  यावर आम्ही काम करू. जेणेकरून आई आपल्या मुलाला आतल्या बाजूला आरामात ठेवू शकेल.

असो…रेल्वेत लहान मुलांसाठी सीट तर तयार केली त्याचं आम्हाला कौतुकच आहे पण मुलांच्या आयांनाच विचारलंच नाही त्याचं काय? कारण महिलांची मतं विचारात न घेताच त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला म्हणूनच तर हा एवढा मोठ्ठा घोळ झालाय…

आणखी एक म्हणजे…..

अशी माहिती मिळतेय कि, रेल्वे विभागाने या बेबी बर्थची सुविधा याआधी ९५० हून अधिक गाड्यांमध्ये दिली होती मात्र कोविडमुळे ती योजना रखडली आता पुन्हा एकदा ही सुविधा चालू गेली आहे. पण सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये हि सुविधा उपलब्ध नाहीये.

जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा आहे आणि तुमच्या गाडीत त्याची सुविधा आहे कि नाही हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक प्रोसेस आहे. 

पण तुम्हाला तुमचं तिकीट IRCTC च्या या साईटवर ऑनलाईन बुक करायचं आहे.  तिकीट बुक केल्यानंतर, IRCTC तुमच्या मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवेल. त्या लिंकद्वारे तुम्ही प्रवास करणार असलेल्या ट्रेनमध्ये बेडरोल आहे की नाही याची माहिती देण्यात येईल. वर सांगितल्यानुसार रेल्वेने ९५० गाड्यांमध्ये हि सुविधा सुरु केली आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.