विराटला रनआउट करणार, अन मी शतक ठोकणार..

रोहित शर्माचा नवा ‘शतक फॉर्म्युला’.

विराट कोहलीच्या नेत्तृत्वाखालील भारतीय संघाने प्रथमच द. आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या सलग तीन मॅचेसमध्ये विजय मिळविल्यानंतर मालिका विजय ही खरं तर फक्त औपचारिकताच राहिली होती पण टीम इंडियाला खरी चिंता भेडसावत होती ती धडाकेबाज ओपनर रोहित शर्माच्या रुसून बसलेल्या फॉर्मची. पोर्ट एलिझाबेथ येथे खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिका तर खिशात घातलीच पण रोहित शर्माने त्याचा गमावलेला फॉर्म परत मिळवत दणदणीत शतक ठोकलं.

रोहित शर्माच्या या शतकानंतर क्रिकेटरसिकांना मात्र रोहितच्या शतक ठोकण्याचा एक मजेदार फॉर्म्युला सापडलाय. खरं तर क्रिकेटमध्ये रनआउट होणं ही आत्महत्या समजली जाते, मात्र रोहित जेव्हा कधी विराट कोहलीला रनआउट करतो तेव्हा विराटची विकेट त्याच्यासाठी संजीवनी ठरते. विराटला रनआउट केल्यानंतर रोहित शर्मा हमखास शतक ठोकतो, असा एक पॅटर्न आता दिसू लागलाय. पोर्ट एलिझाबेथ सामन्यात पण रोहितकडून विराट कोहली रनआउट झाला आणि रोहितने धडाक्यात शतक ठोकत भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत केली.

uy 2144110
Source- ICC

या आधीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता आपल्या असं लक्षात येतं की आत्तापर्यंत पाच वेळा असं घडलंय की रोहित शर्माकडून, विराट कोहली रनआउट झालाय आणि त्यातल्या चार वेळा रोहितने शतकीय इनिंग साकारलीये. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ठोकलेल्या ३ द्वीशतकांपैकी २ वेळा हाच पॅटर्न बघायला मिळालाय. कांगारूंविरुद्ध त्याने काढलेल्या २०९ रन्स आणि श्रीलंकेविरुद्ध फटकावलेल्या २६४ रन्स या दोन्ही वेळी रोहितकडून विराट रनआउट झाला होता.

भागीदारीतील एका जोडीदाराकडून दुसरा रनआउट होण्याच्या बाबतीत सचिन-गांगुली ही जोडी आघाडीवर आहे. सचिन आणि गांगुली यांनी खेळलेल्या १७६ डावांमध्ये ९ वेळा असं घडलंय की दोघांपैकी कुणीतरी रनआउट झालंय तर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे द्रविड आणि गांगुलीची जोडी. (गांगुली ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ असल्याने त्याला पिचवर पळायचा कंटाळा यायचा बहुतेक) त्यांनी सोबत खेळलेल्या ८७ डावांपैकी ८ डावांमध्ये दोघांपैकी एक जण रनआउट झालाय. रोहित-विराट जोडी या यादीत ७ वेळा दोघांपैकी एक जण रनआउट होऊन तिसऱ्या स्थानावर आहे.

ind vs sl 4th odi 24fb4e20 8f12 11e7 af36 115e347150c8
Source- ICC

रोहितने जर हा विक्रम मोडायचं मनावर घेतलं आणि त्याचा शतकीय फॉर्म्युला जर चालला तर आगे-मागे अजून रोहितचं अजून एक द्विशतक झालंच म्हणून समजा. हा आता तेवढ्यासाठी विराटचे फॅन रोहितला मोठ्या मनाने माफ करतील अशी अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.