कुस्तीच्या प्रेमापायी कोल्हापूरचा वाघ बिना पासपोर्ट पाकिस्तानात घुसला होता

कोल्हापूर म्हणजे मल्लांची नगरी. देश परदेशातून इथं कसलेले मल्ल येतात फक्त आणि फक्त कुस्तीसाठी. अशाच या मातीत नावाजलेले मल्ल होऊन गेले.

अशाच कुस्तीप्रेमापायी बिना पासपोर्ट पाकिस्तान गाठणाऱ्या मल्लाची गोष्ट…

आखाड्यात असताना करारी मल्ल बाहेर मात्र सर्वांशी अदबीने अन्‌ आपुलकीने वागायचे. आखाड्यात कडक शिस्तीचा वस्ताद आखाड्याबाहेर मल्लांचा प्रेमळ गुरु. सरावावेळी अंगाच सालटं निघेपर्यत शिक्षा करणारा वस्ताद थोड्या वेळाने पाठीवरुन मायेने हातही फिरवायचा. कडक शिस्तीने गंभीर झालेले वातावरण चेष्टा, मस्करी करत खुलवण्याचा प्रयत्न करणारे मल्ल आणि वस्ताद म्हणजे

पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे

कर्नाटकांतून महाराष्ट्रात येऊन कोल्हापूर नगरीला त्यांनी स्वतःला अर्पण केले. इथली तांबडी मातीच माझे जगणं सार्थकी लावणारं मूळ आहे, अस म्हणत ते म्हणतं. घरची चांगली शेतीवाडी, आर्थिक सुबत्ता असलेले आण्णा गावाकडे मौजमजेत रानावनात भटकायचे, मित्राच्या समवेत नदीला पोहणे इतकाच कार्यक्रम ठरलेला. वडील यल्लपा यांची मात्र श्रीपती आण्णांना मोठ्ठा पैलवान करण्याची इच्छा.

एके दिवशी अचानक वडिलांनी त्यांना शाळेतून काढलं आणि थेट तालमीत सरावासाठी पाठवलं. थोड्या कालावधीत चांगली चमक दाखवल्या नंतर कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत ते दाखल झाले. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी कोल्हापूरची माती अंगाला लावली. सुप्रसिध्द मल्ल विष्णू नागराळेच्या निगराणीखाली आण्णा घडत होते. त्याचबरोबर मल्लाप्पा तडाखेचं मार्गदर्शन त्यांना लाभत होते. त्या काळातल्या या तगड्या मल्लांच्या कुस्तीकलेचा प्रभाव आण्णांवर पडला आणि त्यांचा कुस्तीतला यशस्वी प्रवास. दरवेळी वेगळाच डाव.

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबीशी झालेली लढत गाजली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या लढतीत अखेरीस बरोबरी झाली.

१९५९ ला ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘हिंदकेसरी’ या मानाच्या किताबावर त्यांनी आपले नाव कोरले. भारताचे पहिले हिंदकेसरी ठरल्याने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी शब्बासकी देत ‘महाराष्ट्र का नाम रोशन किया अब देश का नाम रोशन करो’ अशा शुभेच्छा ही त्यावेळी दिल्या. कोल्हापूरच्या मातीतून तयार झालेल्या मल्लांने हा बहूमान पटकवल्यामुळे कोल्हापूरवासीयांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

भारतातली कुस्तीची मैदान गाजवून त्यांना परदेशी मैदान खुणावू लागली होती.

त्या काळात पाकिस्तानातील लाहोर, मुलतान इथं त्यावेळी कुस्तीच्या स्पर्धा भरत. दिल्लीतील एका सहकाऱ्यांने त्यांना पाकिस्तानाला जायची योजना सांगितली. पासपोर्ट तर नाही, तो कसा काढायचा हे ही माहित नसल्याने बिगर पासपोर्टचे ते पाकिस्तानात दाखल झाले.

तब्बल तीन महिने तिथे राहून त्यांनी पाकिस्तानी मैदानातील लढती जिंकल्या. आणि तिथल्या लोकांची मन पण जिंकली. फक्त पाकिस्तानचं नव्हे तर तिथून अरबस्तान, इराक, इराण अशा देशाचा दौरा करत त्यांनी तेथील कुस्तीची परंपरा पाहिली.

रशिया, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशात ही ते गेले आणि तब्बल पाच महिन्यांनी दिल्लीला सुखरुप परतले.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.