श्री रेड्डीने सचिनवर केलेला हा आरोप म्हणजे फक्त ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे का..?

सचिन तेंडूलकर म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी देव.

अगदीच देव्हाऱ्यात नाही पण अनेक क्रिकेट फॅन्सच्या मना-मनात सचिन  तेंडूलकरला पूजले जाते. अशा देवावर जर कोणी आरोप केले तर त्या व्यक्तीची खैर विचारू नकात. गल्लीतल्या कट्ट्यापासून ते सोशल मीडियावरच्या  कट्ट्यापर्यंत त्या व्यक्तीला ट्रोल करून करून हैराण केले जाते.

अशातच आता सचिनवर नवीन आरोप झालाय. तो देखील साधा सुधा आरोप नाही तर सचिनचे एका तेलुगु अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप. आपल्यापैकी कुणी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नसेल की सचिनवर कधी अशाप्रकारचा आरोप देखील केला जाईल.

सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि अनिल कुंबळे हे फक्त भारतीयच नाही तर जागतिक क्रिकेटमधील सभ्यतेचे मानदंड समजले जातात. त्यांनी देखील आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मैदानावर आणि मैदानाबाहेरही या समजुतीला तडा जाईल अशी वर्तवणूक केल्याची कुठलीही घटना इतिहासात सापडत नाही. पण अचानक उद्भवलेल्या या नव्या वादाने मात्र संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे.

सचिनवर नेमका काय आरोप झालाय ?

सचिन तेंडूलकरवर हा आरोप केलाय श्री रेड्डी या अभिनेत्रीने. ही तिचं श्री रेड्डी जिने काही महिन्यापूर्वी तेलुगु चित्रपटसृष्टीत चालणाऱ्या ‘कास्टिंग काउच’ विरुद्ध हैद्राबादमध्ये अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं होतं. तिने आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केली. ज्यात ती म्हणते,

“एक रोमँटिक पुरूष, ज्याला लोक ‘सचिन तेंडुलकर’ म्हणून ओळखतात, तो हैद्राबादेत आला असता एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला. महान व्यक्ती चांगलं ‘खेळू’ शकतात. मला असं म्हणायचंय की चांगला ‘रोमान्स’ करू शकतात. “

श्री रेड्डीची ही पोस्ट म्हणजे सरळ सरळ सचिन तेंडूलकरवर अनैतिक संबंधाचा आरोप आहे. या पोस्टमध्ये ज्या ‘चार्मिंग गर्ल’चा तीने उल्लेख केलाय ती म्हणजे सुप्रसिद्ध तेलगु अभिनेत्री ‘चार्मी कौर’. काही वर्षांपूर्वी ‘राउडी राठोड’ या चित्रपटात “गंदी बात” या गाण्यातील नृत्यात झळकलेली अभिनेत्री.

श्री रेड्डीने आपल्या पोस्टमध्ये चामुण्डेश्वर स्वामी नावाच्या मध्यस्थाचा देखील उल्लेख केलाय. तो पूर्व क्रिकेटर चामुण्डेश्वर असावा अशी शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट असल्याचं ती अप्रत्येक्षपणे सांगू पाहतेय.

‘कास्टिंग काउच’ संदर्भातील निषेध प्रदर्शनामुळे प्रसिद्धीच्या झोतात !

या वर्षीच्या एप्रिल महिन्यात हैद्राबादमधील ‘तेलगु फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’समोर अख्या मिडियासमोर आपले कपडे उतरवून ‘कास्टिंग काउच’ संदर्भातील आपली व्यथा तिने मांडली होती.

shri

चित्रपटात काम देतो म्हणून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक तरुणींचा गैर फायदा घेतात, असं सांगताना ‘रेड्डी डायरीज’ नावाने तिने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार पवन कल्याण पासून ते अभिराम द्ग्गुबत्तीपर्यंत अनेक बड्या नावांवर आरोप केला होता.

आपलं स्वतःच लैंगिक शोषण करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा त्यावेळी तिने केला होता. ‘कास्टिंग काउच’ विरोधात तिने उठवलेल्या आवाजाला अख्या देशभरातून पाठींबा मिळाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील या घटनेची दखल घेतली होती. या घटनेमुळे टॉलीवूडमध्ये ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून ती फेमस झाली होती.

मात्र आता तिने थेट सचिन तेंडूलकरवरच  केलेल्या आरोपामुळे तिच्या  विश्वासर्हतेवरच शंका उपस्थित करण्यात येऊ लागलीये. कोणत्याही पुराव्याशिवाय करण्यात आलेले हे आरोप एक ‘पब्लिसिटी स्टंट’ असण्याचीच शक्यता अनेक जन वर्तवताहेत.

सचिन तेंडूलकरने या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया न देणेच पसंत केले आहे. ‘चार्मी’ किंवा ‘चामुण्डेश्वर नाथ’ यांनी देखील कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी  श्री रेड्डीने मात्र आजही आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ फेसबुकवर आणखी एक पोस्ट टाकली आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.