एकेकाळी इंपालामधून फिरणाऱ्या तिचा देह पाच सहा जणांनी हातगाडीवरून ढकलत नेला.

एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर घेवून जाण्यासाठी हे वाक्य भारी असतं पण हे खर झालं तर. खरं होण्याबद्दल पण काही प्रोब्लेम नाही पण विचार करा तीच गोष्ट पुढे एका शोकांतिकेत तयार झाली तर.

“काय बेट्या भारी बायको पटवली आहेस. ही जर पिक्चरमध्ये आली ना तर कुठल्या कुठे जाईल.”

एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर घेवून जाण्यासाठी हे वाक्य भारी असतं पण हे खर झालं तर. खरं होण्याबद्दल पण काही प्रोब्लेम नाही पण विचार करा तीच गोष्ट पुढे एका शोकांतिकेत तयार झाली तर.

ही गोष्ट विमी या हिरोईनची.

विमी दिसायला सर्वात सुंदर होती. गोरिपान विमी एखाद्या बाहुलीसारखी दिसायची. ती जन्माने पंजाबी होती. आईबापाच्या विरोधात जावून अग्रवाल नावाच्या उद्योगपतीसोबत तिने लग्न केलेलं. हा अग्रवाल कलकत्तामध्ये रहायचा. विमीसोबत लग्न झाल्यानंतर त्याने पार्टी दिलेली.

या पार्टीत तेव्हाचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवी देखील आलेले. विमीचं कौतुक करताना ते म्हणाले ही जर फिल्मलाईनमध्ये आली तर आग लावून देईल आग. 

विमीने हीच गोष्ट मनावर घेतली. 

दिवसांमागून दिवस गेले. विमी दोन पोरांची आई झाली. तरिही विमीने हिरोईन होण्याच नाद सोडला नव्हता. संगीत दिग्दर्शक रवीचे शब्द तिच्या कानात आजही तसेच होते. याच दरम्यान एका पार्टीत संगीतकार रवी यांच्यासोबत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक बी.आर.चोप्रा आलेले होते.

विमीला पाहताच ते देखील चक्रावले. विमी त्या काळची ओरीजनल संतूर मॉम होती. त्यांनी तिथल्या तिथं विमीला फिल्मची ऑफर दिली. विमीला हेच पाहीजे होतं. एका पायावर ती सिनेमा करायला तयार झाली. पण प्रश्न होता घरातल्यांचा.

विमीचे सासर आणि माहेर दोन्हीकडच्या लोकांचा तिला विरोध होता. मध्यमवर्गीय समाजातून आलेल्या तिच्या आईवडिलांनी सिनेमात काम करणार असल्यास संबंध तोडून टाकण्याची भाषा केली. पुढे त्यांनी तस केलं देखील.

इकडे सासरच्या मंडळींनी देखील विमीला सिनेमात काम करण्यापासून परावृत्त केलं पण त्याचा फायदा झाला नाही.  बी.आर.चोप्रांनी तिची मुंबईतल्या ताजला राहण्याची सोय केली. तिची स्क्रिनटेस्ट घेण्यात आली. ठरल्याप्रमाणे ती पास देखील झाली.

आणि चोप्रांनी आपल्या नवीन सिनेमाची घोषणा केली.

त्या सिनेमाचं नाव होतं, हमराज. 

या पिक्चरमध्ये तिच्यासोबत राज कुमार आणि सुनील दत्त हे कलाकार होते. प्रत्यक्ष शूट सुरू झालं आणि विमीचा पिक्चर पडला. दिग्दर्शकांसहीत सर्वांना कळून आलं की विमी ही अभिनयात मोठा शून्य आहे.

बी.आर. चोप्रांनी विमीने अभिनय करावा म्हणून तिच्या तालमी घेण्यास सुरवात केलं. तिच्या शून्य एक्टिंगमध्येच कसातरी सिनेमाचं शुटिंग पार पडलं. हमराज रिलीज झाला. तो सुपरहिट ठरला आणि विमीच्या दारात निर्मात्यांच्या लाईन लागल्या. इतकं सगळं असूनही बी.आर. चोप्रा विमीला घेवून कोणताही पिक्चर करण्याच्या मनस्थितीत नव्हते.

विमीने या काळात वचन सिनेमा साईन केला.

झालं अस की विमी आत्ता स्वत:ला क्रमांक एकची अभिनेत्री समजू लागली. तिला सुनिल दत्त राज कुमार, राजेंद्र कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. ती स्वत:ची तुलना वैजंतीमालासोबत करु लागली. वचन सिनेमाचा हिरो होता शशी कपुर मात्र तिने हिरो बदलण्याची रिक्वेस्ट केली. निर्माते तयार नसल्याने आडेवेढे घेत तिने होकार दिला. 

वचन सिनेमा पुर्ण होण्यास तीन वर्षाचा काळ लागला. या वेळात तिला दूसरा कोणताच पिक्चर मिळाला नाही. वचन सिनेमाच्या शूटमध्ये ती एक्टिंगमध्ये काय आहे हे सगळ्या बॉलिवूडमध्ये झालं.

वचन तर पुर्णपणे आपटलाच पण त्यामागोमाग तिने केलेले पतंगा, आबरू हे सिनेमे देखील तुफान वेगाने पडले. एकामागून एक पिक्चर आपटत गेले तरी विमी विस्मृतीत जावू लागली.

या दरम्यानच्या काळात विमीच्या नवऱ्याला देखील घरातून बाहेर काढण्यात आलं होतं. विमीचा नवरा विमीच्या पैशावरच अवलंबून होता. हिरोईनची लाईफस्टाईल म्हणून विमि नवऱ्यासोबत जूहूला एका बंगल्यात रहायला आली होती. जूहूच्या बंगल्याचे भाडे देणं अशक्य झाल्यानंतर ते दोघं पाली हिलवरील एका बंगल्यात राहू लागले.

अस सांगण्यात येत की,

फक्त आपण इथे राहतो हे दाखवण्यासाठी ते भाडं भरत असत वास्तविक विमीला इथल्या लाईटचं बिल देखील भरता येत नव्हतं. पैशाकडून अवस्था खराब झाल्यानंतर नवरा तिला निर्मात्यांसोबत झोपण्याची विनंती करु लागला. अस केल्यानंतर तरी तिला काम मिळेल अस त्याला वाटतायचं. 

यानंतरच्या काळात जॉली नावाचा एक सिनेनिर्माता तिला गाठ पडला. तिला घेवून एक सिनेमा करण्याची कल्पना त्याने मांडली. इकडे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तिने नवऱ्याला सोडले. जॉलीसोबत लग्न केलं. मात्र जॉली देखील भुरटा निर्माता होता. जॉलीचे देखील पैसे संपत आले.

विमी आत्ता जुन्या दिवसांच्या आठवणीत फक्त दारू पिवून समाधान मानू लागली.

कधीकाळी सुखात रहाणारी दोन मुलांची आई विमी आत्ता एकटी पडली होती. विमीकडे पैसे नसतं म्हणून ती देशी हातभट्टीची दारू पित असे. तिच्याकडे रुपाया देखील शिल्लक राहिला नव्हता. दिवसभर ती नशेतच असायची. आज जॉली सोडला तर विमीसोबत एकही व्यक्ती नव्हता.

लिव्हर खराब झाल्याने तिला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच विमीने आपला प्राण सोडला.

दूर्देव अस की जेव्हा विमी गेली तेव्हा तिची मृतदेह हातगाडीवरून पाच ते सहा लोकांनी ढकलत नेला. बेवारस व्यक्तीसारखं तिचं मयत करण्यात आलं. ती तारिख होती २२ ऑगस्ट १९७७. एक वेळ होती जेव्हा विमीच्या इंपालाची वाट पहात गर्दी व्हायची. हमराजची हिरोईन हवा होती. पण तिचेच प्रेत हातगाडीवरून घेवून जाण्यात आलं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.