सनी लिओनी म्हणत असेल ‘हमेशा में ही क्यों फ़स जाती हूँ’

बॉलीवूडच्या ॲक्ट्रेसेस, नायिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत असतात. त्यांची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात म्हणून. पण भावांनो, यामध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी चर्चेत तर येतेच, पण फसवणूक झाल्याच्या घटनांनामध्ये तीचं नाव राहून राहून येत असतं. ही अभिनेत्री म्हणजे ‘सनी लिओनी’.

आपला डान्स, घायाळ करणाऱ्या तिच्या अदा, सेक्सी पोजेस, बोलण्याची शैली, फिटनेस आणि तिचं वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक सेवा अशा अनेक कारणांनी सनी नेहमीच प्रकाशझोतात असते. मात्र तिच्या सौंदर्याच्या पाशात अनेकांना फासणारी सनी सध्या स्वतः एका फसवणुकीची शिकार झाली आहे.

नुकतंच सनी लिओनीने म्हटलं आहे की, अलीकडेच फिनटेक प्लॅटफॉर्म असलेल्या ‘धनी स्टॉक्स लिमिटेड’वरून तिची फसवणूक झाली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली. तिच्या ट्विटरवरून तिने हे सांगितलं होतं. सनी लिओनने आरोप केला की, तिचं पॅन कार्ड फक्त २००० रुपयांचं कर्ज घेण्यासाठी वापरलं गेलं आहे, ज्यामुळे तिच्या क्रेडिटच्या सीबील स्कोअरवर परिणाम झाला आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीने तिच्या ट्विटमध्ये इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेड आणि इंडियाबुल्स होम लोनला टॅग केलं होतं. कारण धनी स्टॉक्स पूर्वी इंडियाबुल्स सिक्युरिटीज यांचं होतं. शिवाय कंपनीने या प्रकरणाचं निराकरण करण्यात मदत करण्यासाठी ‘काहीही केले नाही’ असा आरोप तिने केला. फसवणूकीचा दावा करणाऱ्याची लांबलचक यादी आहे, ज्यामध्ये आता सनीचा समावेश झाला आहे.

मात्र सनी ताई काही साधी सुधी व्यक्ती नाही. त्यामुळे तिने सोशल मोडियावर घटनेची माहिती दिल्यानंतर लगेच तिला मदत मिळाली.  तिच्या समस्येचं निराकरण झाल्यानंतर, सनीने परत याची माहिती ट्विटरवर दिली आणि ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानत आधीचं ट्विट डिलीट केलं.

पण भावांनो, ही काही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा बिचारी सनी अशा घटनांमध्ये अडकली आहे. अनेक हृदयांचे ठोके चुकवणारी, अनेकांना मोहित करत आपल्या प्रेमात पाडणारी सनी नेहमीच अशा घटनांमध्ये सापडत असते. 

सुरुवात करूया २०१८ पासून. २०१८ मध्ये सनी लिओनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील मतदार होती. कशी ? तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यात येत होती. या यादीमध्ये काही तरी गफलत झाली होती ज्याने जिल्ह्यातील मतदार यादीत परिसरातील रहिवाशांची नावं हरीण, हत्ती, उंदीर अशा प्राण्यांच्या चित्रांसोबत दाखवली होती. यातंच सनी लिओनीचं सुद्धा चित्र होतं. दुर्गावती नावाच्या एका ५१ वयाच्या महिलेच्या नावासमोर सनी लिओनीचं चित्र चिकटवलं होतं. 

मग आलं साल २०१९. घटना आहे बिहारची. यावेळी सनी तेव्हा चर्चेत अली जेव्हा तिने जुनिअर इंजिनीरिंग रिक्रुटर पदाच्या यादीत टॉप केलं होतं. बिहार सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने एक यादी जाहीर केली होती त्यात हे समोर आलं होतं. मग ही खरंच सनी होती का? तर नाही, नक्कीच नाही! नंतर समोर आलं की ती सनी नसून त्याच नावाची दुसरी मुलगी आहे. मात्र परत इतकं नाव कसं सारखं असू शकतं असा युक्तिवाद करत नावाची आणि त्या मुलीची तपासणी करण्यात आली होती. 

२०२० मध्ये तर कमालच झाली.

बिहारमध्ये सनीचा २० वर्षांचा मुलगा शिकत असल्याचं समोर आलं. म्हणजे झालं असं होतं एका मुलाने चक्क सनीला त्याची ‘आई’ बनवलं होतं. बीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने त्याच्या प्रवेशपत्रात आईचं नाव सनी केलं होतं ज्याने परत राडा झाला होता. मात्र लवकरच यावरही पडदा पडला.

आता २०२२ मध्ये हे पॅन कार्डचं नवं घोडं सनीच्या मागे लागलं.

मात्र त्यातूनही ती बाहेर आलीये. तेव्हा अशा सगळ्या घटनांमधून प्रश्न पडतो, काय राव नेहमी सनीचं कशी सापडते? आता याचं आम्हाला समजलेलं तर उत्तर हेच की सनी खूप फेमस असल्याने असं होत असेल. हो, पण अशा घटनांमध्ये सनी जेव्हा केव्हा सापडते तेव्हा कदाचित तिची रिअक्शन काहीशी धमाल चित्रपटाच्या ‘मानव’ सारखी होत असणार. “पता नहीं ऐसी सिचुएशन्स में हमेशा मैं ऑटोमॅटिकली कैसे आगे आ जाता हूँ ” वाली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.