सनी ताईंच्या ठेक्याने अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेमध्ये आग लागलीय

मधुबन में राधिका नाचे रे
गिरधर की मुरलिया बाजे रे
मधुबन में राधिका…

१९६० मध्ये आलेल्या दिलीपकुमार यांच्या कोहिनूर या चित्रपटात मोहम्मद रफींनी गायलेले आणि गाजलेलं गाणं.

आझाद आणि यहुदी मध्ये जोडीदार झालेले दिलीपकुमार आणि मीनाकुमारी १९६० साली कोहिनूर या चित्रपटानिमित्ताने पुन्हा एकत्र आले. कोहिनूर या चित्रपटातलं ‘मधुबन में राधिका नाचे रे, गिरिधर की चुनारियाँ बाजे रे’ हे दिलीपकुमारच्या तोंडचं सुमधुर गीत आजही कानावर पडलं की, आपला मनमयूर नाचू लागतो.

दो सितारों का जमीं पर हैं मिलन आज की रात, मुस्कुराता हैं उम्मीदों का चमन आज की रात हे रफी आणि लता यांच्या आवाजातलं दिलीपकुमार-मीनाकुमारी यांच्या तोंडी असलेलं मिठ्ठास युगुलगीत ऐकताना, पाहताना तर असं वाटत राहतं जणू काही गीतकार शकील बदायुनी यांनी हे केवळ याच जोडीसाठी रचलं आणि नौशाद अलींनी स्वरबद्ध केलं असावं!

पण हे आता नुसतंच आठवायचं. कारण आता जमाना बदललाय. म्हणजे, हेच शब्द असलेले एक मॉडर्न रिमिक्स गाणं नुकतच रीलिज झालयं. या नव्या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये आहे अभिनेत्री पॉर्न स्टार सनी लिओन.

हे नवं गाणं एवढं काही विशेष नाहीये. सन्नी ताईंच्या ठेक्याने या गाण्यात काय आग लागली नाही. वादाला मात्र तोंड फुटलंय.

सुमार नाच असलेलं सनीचं हे गाणं आपल्या ट्विटरवर शेअर करून चाहत्यांना ‘पाहिले का?’ असा प्रश्‍न विचारला होता. त्यावरून तिला ट्रोल करायला सुरुवात झाली. लोक म्हणायला लागले, राधा ही नर्तकी नव्हती आणि मधुबन हे एक शांत ठिकाण आहे. हा आमच्या आस्थेचा विषय आहे. कृष्ण-राधेची पूजा करायला शिक, असं ही काहींनी म्हटलं. या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका साधूंनी केलीय. वृंदावनचे संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की,

सरकारनं जर अभिनेत्री सनी लिओनीच्या विरोधात कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ.

व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की, जोवर तो सीन काढून सनी माफी मागत नाही तोवर तिला भारतात राहायला देऊ नये.

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी देखील सनी लिओनीच्या डान्स व्हिडीओचा निषेध केला आहे. लिओनीनं बृजभूमीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असल्याचं अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेनं म्हटलं आहे.

पण खरं सांगू का ‘गाण्यावर बंदीच काही माहीत नाही’ पण गाणं एवढं बेसूर म्हंटलय ना कनिका कपूरन काय विचारू नका. किरकिरा आवाज आणि सनीचा तो टुकार डान्स. गाणं बघितलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.