मुलगी गेल्याच्या दुःखात त्यांनी रचलेली रचना हि साहित्यातली पहिली ‘शोकरचना’ ठरली

वह तोड़ती पत्थर;

देखा मैंने उसे इलाहाबाद के पथ पर-

वह तोड़ती पत्थर।

ही रचना तुम्ही वाचली असेलच…कुणाची आहे ? हिंदी साहित्यातील महान कवी ‘निराला’ सूर्यकांत त्रीपाठी यांची…

निराला काय मुळमुळीत असणारे साहित्यिक नव्हते ना फक्त प्रेमभंग वैगेरे सारख्या विषयावर कविता करत नसत तर ते वृत्तीने बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी साहित्यिक होते. हे वह तोड़ती पत्थर हि कविता तुम्ही वाचली तर नक्कीच लक्षात येईल.

निरालाजी त्यांचा जन्म तसा बंगालचा पण त्यांचे मूळ घराणे उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातले. त्यांचे बालपण बंगालमध्ये गेल्यामुळे त्यांची मातृभाषा देखील बंगाली होती. काही काळाने त्यांनी  बंगाल सोडलं आणि आपल्या मूळ गावी परतले. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांचे शिक्षण दहावी-पर्यंत पूर्ण झाले. बालपणीचा आई वडील गेले पुढे पत्नी वारली त्यामुळे कुटुंबाचा सर्व भार त्यांच्यावर येऊन पडलं. मोठ्या मेहनतीने जिद्दीने ते हिंदी भाषा शिकले आणि हिंदी साहित्याकडे वळाले.

आर्थिक परिस्थिती कमकुवत का असेना पण निराला प्रचंड दानशूर म्हणून लोकप्रिय होते. आर्थिक संघर्ष जसा वाट्याला आला तसाच त्यांना त्यांच्या साहित्यिक मान्यतेसाठीही संघर्ष करावा लागला होता. आयुष्यभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे. 

काही जण तर असंही म्हणतात कि, वयाच्या अखेर त्यांचा मानसिक समतोल ढासळल्यामुळे त्यांचं वागणं-बोलणं च बदललं होतं. 

अशातच त्यांची मुलगी वारली. त्यांच्या मुलीची म्हणजेच सरोजचे निधन त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. या घटनेमुळे निराला संपूर्णपणे कोसळले होते. मुलीच्या आठवणीत त्यांनी एक अद्भुत रचना केली. भारतीय हिंदी साहित्य मधील ही रचना पहिली ‘शोकरचना’ ठरली. ती म्हणजे ‘सरोजस्मृती’ होय.

त्यांच्याबाबतीतला एक किस्सा म्हणजे, हिंदी भाषेबाबतच्या प्रेमाखातर त्यांनी महात्मा गांधीजींशी वाद घातला होता.

हिंदी भाषेचा दर्जा आणि हिंदीमधील साहित्यिक याबाबत महात्मा गांधी आणि निराला यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली होती. घेऊन महात्मा गांधी आणि निराला यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली होती. महात्मा गांधी यांची हिंदी भाषेवरील प्रेम आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 

पण हिंदीवरून दोघांमध्ये झालेल्या वादानंतर, गांधीजींना त्यांची चूक कळली होती तरीदेखील निरालाजी महात्मा गांधी यांच्यावर नाराज झाले होते….

तर किस्सा असा होता कि, हा तेव्हाचा प्रसंग आहे जेव्हा महात्मा गांधी यांना हिंदी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे सभापती म्हणून मंचावर भाषण प्रस्तुत करायचे होते. स्टोरी व्याख्यानाच्या दरम्यान ते म्हटले की, मी तुलसीदास यांचा पुजारी आहे त्यामुळे मला हिंदी भाषा विशेष करून त्यांच्याचमुळे आवडते.

पण पुढे गांधीजी जे काही बोलून गेले त्यामुळे खरा तर हा वाद सुरु झाला होता…गांधीजी आपल्या व्यख्यानात असं देखील म्हणाले कि, माझा प्रश्न हा आहे की या हिंदी भाषेत रवींद्रनाथ टागोर कुठे आहेत? हिंदी मध्ये कोणी जगदीश बोस आहेत का? गांधीजी इथेच थांबले नाही तर पुढे त्यांनी असे देखील बोलून दाखवलं की, कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यायचा असेल तर या महान व्यक्तीला त्या भाषेत शोधलं जाईल.

महात्मा गांधीजींनी केलेल्या या वक्तव्यानंतर सूर्यकांत त्रीपाठी निरालाजी अस्वस्थ झाले… या मताला सहमत नव्हते, त्यांनी नाराज होऊन या वक्तव्याबाबत चर्चा करण्यासाठी महात्मा गांधीजींना भेटायचे ठरवले. पण खूप दिवस झाले तरी त्यांना गांधीजींशी भेटीची वेळ मिळत नव्हती…अखेर खूप दिवसा नंतर त्यांना गांधीजींना भेटण्याची संधी मिळाली आणि या भेटीत निराला जी आणि गांधीजी यांच्यात त्यांच्या व्याख्यानात मुद्दे निरालाजींनी पुन्हा अधोरेखित करत त्यांना जाब विचारला. या चर्चेत देखील दोघांमधील वाद चालूच होते. 

निराला महात्मा गांधी यांना म्हणाले की, तुम्ही पंडित बनारसी दास चतुर्वेदी यांचे नाव कसे काय विसरलात?  त्यावर महात्मा गांधीजींनी उत्तर दिले की, मला हिंदी साहित्याबद्दल तितकंस माहिती नाहीं. यावर निरालाजींनी गांधींना सडेतोड उत्तर दिलं कि, ” जर तुम्ही हिंदी भाषा जाणत नाही मग तुम्हाला असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, कि हिंदी साहित्यामधील  रवींद्रनाथ ठाकूर  हे कोण आहेत? तुमच्या या वक्तव्याचा हिंदी साहित्यिकांवर काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार केला आहात का?

त्यावर गांधीजी उत्तरले कि, मी जे काही बोललो त्याचा अर्थ तुम्ही वेगळाच काढलाय. तरीदेखील रागात असलेले निराला जी पुढे बोलतच राहिले. त्याने धडधडीत गांधीजींना ऐकवले की, तुम्ही रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सारखे साहित्यिक हिंदीमध्ये आहेत हे तुम्हाला देखवत नाहीत. परंतु प्रिन्स द्वारकानाथ ठाकूर यांचे नातू किंवा नोबल पुरस्कारप्राप्त कुणी साहित्यिक तुम्हाला महत्त्वाचे वाटतात. 

बरं, या छोट्याश्या भेटीत गांधीजींसमोर बोलायला गेलेले निराला तिथून मोठ्या दुःखाने परतले. या वादविवादानंतर गांधीजींना त्यांची चुक उमगली होती तरी देखील निराला जी गांधीजींवर नाराज होते. परत आल्यावर त्यांनी बापूंच्या नावाने ही कविता लिहिली.

यावर निरलाजींनी लिहिलं कि- ‘’मैं हैरान होकर हिंदी-साहित्य-सम्मेलन के सभापति को देखता रहा, जो राजनीतिक रूप से देश के नेताओं को रास्ता बतलाता है, बेमतलब पहरों तकली चलाता है, प्रार्थना में मुर्दे गाने सुनता है, हिंदी-साहित्य-सम्मेलन का सभापति है, लेकिन हिंदी के कवि को आधा घंटा वक्त नहीं देता- अपरिणामदर्शी की तरह जो जी में आता है, खुली सभा में कह जाता है, सामने बगलें झांकता है!’’

बापू, तुम मुर्गी खाते यदि,

तो क्या भजते होते तुमको

ऐरे-गैरे नत्थू खैरे;

सर के बल खड़े हुए होते

हिंदी के इतने लेखक-कवि?

बापू, तुम मुर्गी खाते यदि,

तो लोकमान्य से क्या तुमने

लोहा भी कभी लिया होता,

दक्खिन में हिंदी चलवाकर

लखते हिंदुस्तानी की छवि?

बापू, तुम मुर्गी खाते यदि,

तो क्या अवतार हुये होते

कुल-के-कुल कायथ बनियों के?

दुनिया के सबसे बड़े पुरुष

आदम-भेड़ों के होते भी!

बापू, तुम मुर्गी खाते यदि,

तो क्या पटेल, राजन, टण्डन,

गोपालाचारी भी भजते?-

भजता होता तुमको मैं औ’

मेरी प्यारी अल्लारक्खी,

बापू, तुम मुर्गी खाते यदि?

त्या काळात गांधीजींना सडेतोड उत्तर देणारे, त्यांच्याशी वादविवाद करणारे साहित्यिक नीरलाजी यांची निडर साहित्यिक म्हणून चर्चा होत असत…

असणारे निराला जी हिंदी साहित्यात नवे नवे प्रयोग करणारे साहसी कवी होते.. छंदांच्या बंधनांना झुगारून हिंदीमध्ये मुक्तछंदात कविता लिहिण्याची प्रथा त्यांनी सुरू केली, त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांनामुळे हिंदी साहित्यात मुक्तछंद सुरु होण्यामध्ये निरालां यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्या मुक्तछंदातील काव्यात आशयाला धरून असणारी तसेच विशेषत्वाने लयबद्धता जाणवते. तसेच त्यांच्या लिखाणात बंगाली आणि इंग्रजी भाषेतील साहित्याचं प्रभाव देखील जाणवतो.

राम की शक्तिपूजासारख्या त्यांच्या काव्यरचनेत ‘पौरुष व ओज’यांचा प्रत्यय येतो. निसर्गप्रेम, सौंदर्याची आसक्ती, उत्तुंग कल्पनाशक्ती, चोखंदळ शब्दयोजना, सूक्ष्मता, शृंगार, कारूण्य, वात्सल्य, हास्य, उपरोध असे अनेक भाव त्यांच्या साहित्यात आढळतात.  याचबरोबर ते काळानुसार त्यांच्या साहित्यामध्ये वास्तवाचे परखडपणे चित्रण करीत. ‘भिक्षुक’, ‘वह तोडती पत्थर’, ‘बनबेला’, ‘कुकुरमुत्ता’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यांच्या विशेष गाजल्या. त्यांच्या अंगी असलेली सामाजिक संवेदनशीलता त्यांच्या कवितामध्ये उतरायची त्यामुळे त्यांच्या कविता आजही जिवंत वाटतात.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.