या चार टिसींनी मिळून एका वर्षात पाच कोटींचा दंड गोळा केला आहे.

चार टिसींनी मिळून गेल्या वर्षभरात पाच कोटींचा दंड वसूल केला. किती पाच कोटी.

आज मुंबई मिररला ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यात या टिसींचे एकसे एक कारनामे उघड करण्यात आलेले आहेत.

पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या टिसींनी १.५१ कोटी रुपये गोळा केले आहेत. दूसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या टिसींनी १.४५ कोटी रुपये गोळा केले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या टिसींनी अनुक्रमे १.१ कोटी आणि १.०२ कोटी गोळा केले आहेत आणि अशाप्रकारे या चौघांनी मिळून गेल्या एका वर्षात तब्बल 5.01 कोटी इतका दंड गोळा केला आहे.

टॉपला आहेत गलांडे साहेब.

गलांडे साहेबांनी २०१९ या एका वर्षात २२,६८० लोकांना पकडलं आहे. त्यांची दिवसाची सरासरी ७७ लोकं इतकी आहे. सर्वात जास्त लोक आणि सर्वात जास्त दंड गोळा कऱण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. त्याच्या या कामगिरीवर मिरर या वर्तमानपत्रात अस छापलं गेलय की, गलांडे साहेब रोज १२ ते १३ तास काम करतात. मागच्या वर्षात त्यांनी टोटल ३१५ दिवस काम केलय. त्यांच्या घरी त्यांची दोन मुल आणि विधवा आई आहे. गलांडे साहेब आपल्या यशाचं श्रेय आपल्या पत्नीला देतात. ते सांगतात की, माझी पत्नी सर्वकाही मॅनेज करते. ती मला कुठे आहात म्हणून सारखं विचारत नाही त्यामुळे मी न थकता कार्यरत राहतो.

गलांडे साहेबांच्या खालोखाल नंबर लागतो तो रवी कुमार यांचा.

रवी कुमार यांनी कलांडे साहेबांपेक्षा फक्त सहाच लाखांनी कमी दंड गोळा केला आहे. पण त्यांच कौतुक विशेष करुन केल जातं आहे की ते फक्त मुंबई क्षेत्रापुरते मर्यादीत आहेत. मुंबईत येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या आणि लोकल एवढ्यापुरतेच ते मर्यादीत आहेत.

अस का?

रवी कुमार साहेब मुंबई डिव्हीजनमध्ये कार्यरत आहेत तर उर्वरीत तीन टिसी हे PCCM प्रिन्सिपल चिफ कमर्शियल मॅन्जेअर फ्लाईंग स्कॉडचे सदस्य आहेत. या डिव्हीजनमध्ये टोटल २९ टिसी असून सेंन्ट्रल रेल्वेच्या अखत्यारित ते संपुर्ण ठिकाणी कारवाई करतात. थोडक्यात हे तीन टीसी मुंबईत तिकीट चेक करत पुण्यात येवू शकतात. मिरजेला जावून तिथे मस्तपैकी रहमैंतुल्लामध्ये बिर्याणी खावून पुन्हा तिकीट चेक करत रिटर्न मारू शकतात. पण रवी कुमार साहेब मुंबई डिव्हीजनच्या बाहेर जावू शकत नाही. त्यामुळे त्यांनी गोळा केलेल्या दंडाच्या रकमेचं विशेष कौतुक आहे.

आपल्या यशाचं श्रेय सांगताना रवी कुमार म्हणाले की माझं वय ५८ आहे. माझी दोन्ही मुलं चांगल्या पदावर कार्यरत आहेत. मुलगा नोएडा येथे चांगल्या कंपनीत उच्चपदावर आहे तर मुलगी बॅंकेत मॅनेंजर आहे. सर्व काही व्यवस्थित असल्याने मोकळ्या मनाने मी नोकरीकडे लक्ष देवू शकतो.

आत्ता राहिले एम.एम. शिंदे साहेब आणि डी कुमार साहेब. त्यांनी देखील त्यांच्या यशाच श्रेय आपले कुटूंब आणि परंपरेनुसार रेल्वे खात्यातील वरिष्ठांना देवून टाकलं आहे. शिंदे साहेबांनी गेल्या वर्षात १६ हजार लोकांना विनातिकीट पकडलं आहे. आणि त्यांच्याकडून १.१ कोटींचा दंड वसुल केला आहे.

डि शिवकुमार यांनी १ कोटी दोन लाख इतका दंड वसूल करुन थोडक्यात पण बहौत बढियां पद्धतीने एक कोटीच्या क्लबमध्ये स्थान पटकावलं आहे. सेंन्ट्रल रेल मार्फत या चारही जणांचा सत्कार करण्यात आला आहे. साधारण एक टिसी दिवसाला पाच ते सहा जणांना विदाऊट तिकीट पकडत असतात. दिवसांची दंडाची रक्कम सरासरी २००० इतकी गोळा करत असतात. टिसी या पदाची असणारा सर्वसाधारण स्ट्राईक रेट पार करुन या चारही जणांनी तबलातोड कामगिरी केली आहे.

बर इतका दंड गोळा करून शासनाचा फायदा करुन देणाऱ्या या माणसांचा पगार किती आहे हे देखील माहित असावं. तर याचा पगार आहे ५० ते ६० हजारांच्या दरम्यान.

असो आमच्या देखील या चौघांना शुभेच्छा !!!  

Leave A Reply

Your email address will not be published.