सरकारनं आत्मनिर्भर भारताची कन्सेप्ट आणली अनं या मित्रांनी थेट ट्विटरला टक्कर दिली

सोशल मीडिया आजकाल आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलयं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कित्येक वेळा आपण सोशल मीडिया चाळतचं असतो. कधी व्हाट्सअपवर कधी फेसबुक तर कधी इंस्टाग्रामवर.

पण जेव्हा कधी आपण सोशल मीडिया चाळत असतो, तेव्हा हा विचार करतो का कि जे अॅप्लिकेशन आपण वापरतोय. त्यातले किती भारतीय आहेत. आता तुम्ही म्हणाल बाकीचे काय कमी होतं का कि, भिडूसुद्धा जनरल नॉलेजचे प्रश्न विचारायला लागलय.

असो … तर आपला साधा सरळ मुद्दा म्हणजे जे सगळ्यात जास्त वापरले जाणारे अॅप आहेत ते नॉन- इंडियन आहेत. त्यात चीनचे तर भरमसाठ. पण गेल्या काही वर्षांपासून आपलं भारत सरकार या चिनी ऍप्सवर हातोडा मारतंय, ज्यामुळे भारतीयांना एक प्रकरणाची गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाल्यासारखं आहे. आणि याचाच फायदा घेतला मयंक बिदावतका आणि अप्रमेय राधाकृष्ण यांनी.

२०२० साली जेव्हा भारताने कित्येक चिनी ऍप बंद केले तेव्हा आत्मनिर्भर भारताचं उदाहरण मांडून या दोघांनी मिळून मार्च २०२० मध्ये कु (koo) हे अॅप्लिकेशन लॉन्च केले. ते ट्विटरला अल्टर्नेटीव्ह होत. आता अल्टर्नेटीव्ह ऍप्स सहसा फार काळ टिकत नाहीत. पण इथे तर कु’ने ट्विटरला तगडी टक्कर दिलीये. फक्त २ वर्षात २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी या अप्लिकेशचा वापर करायला सुरुवात केलीय.

तसं हे ॲप आहे ट्विटर सारखं पण यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म १० पेक्षा जास्त  वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये लाँच करण्यात आलय. ज्यात हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू, मराठी, बंगाली, गुजराती, मल्याळम, पंजाबी, ओरिया, आसामी, उर्दू, संस्कृत, नेपाळी, मणिपुरी, कोकणी, काश्मिरी आणि इंग्रजीचा समावेश आहे म्हणजे काय भारताच्या प्रत्येक राज्यातली व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेतून या अॅपचा वापर करू शकतो. कु अॅपच्या यशामागे हेच मोठं कारण असल्याचं समजतंय.

या पूर्णतः देशी अर्थात मेड इन इंडिया अॅपवर भारतात बाजरीची होणारी प्रत्ययेक गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या चित्रपट, क्रिकेट, कुठल्याही खेळापासून ते सण, राजकारण आणि कविता पर्यंत. हे प्लॅटफॉर्म जगातील सर्वात मोठे हिंदी मायक्रो-ब्लॉगिंग अॅप आहे.

थोड्याच वेळात या ॲपची पब्लिसिटी इतकी वाढली की अनेक मोठमोठ्या राजकारण्यांपासून बॉलिवुडची अभिनेत्री – अभिनेते सुद्धा या प्लॅटफॉर्मशी जोडली गेली.

काही दिवसांपूर्वीचं कू अॅपने एशिया पॅसिफिक (APAC) मधील सर्वात लोकप्रिय डिजिटल उत्पादनांच्या यादीत स्थान मिळवलयं. 2020 मध्ये सुद्धा भारत सरकारने आयोजित केलेल्या आत्मनिर्भर ॲप इनोवेशन चॅलेंज जिंकलं होत.

एवढेच नाही तर सध्याच्या पाच राज्यांच्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे काम या अॅपच्या माध्यमातून केलं जातयं.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.