‘मेरे पास माँ है’ ची सक्सेसफुल स्टॅटर्जी वापरली आणि बोर्नविटा मार्केटमध्ये सेट झालं

 दिवार मध्ये अमिताभ शशी कपूरला म्हणतो “मेरे पास गाडी है, बंगला है तुम्हारे पास क्या है. त्यानंतर शशी कपूर म्हणतो ‘मेरे पास माँ है’ हा एकच डायलॉग पिक्चरचं अक्ख मार्केट खाऊन जातं. आई मुलाचं नातं एवढ्या ताकतीने दिवार मध्ये दाखवलं की, लोकांना हा पिक्चर डोक्यावर घेतला. 

पुढे जाऊन तारे जमिन पर आला याच आई-मुलाच्या नात्याला हात घातला. आई-मुलाच्या नात्यातील नस पकडत बॉलिवूड मध्ये दिवार पासून ते ‘तारे जमिन पर’ पिक्चरने मार्केट मिळविलं. बॉलिवूड प्रमाणेच आई-मुलाच्या नातं जाहिरातीत सगळ्यात आधी कोणी दाखवलं असेल तर ते  बोर्नविटाने.

“माझ्या मुलाला जिंकण्याची सवय केव्हा लागेल, जेव्हा तो मला हरवेल. जर मी त्याला जिंकू दिल तर त्याला जिंकण्याची सवय लागणारच नाही. तो ज्या दिवशी मला हरवेल त्या दिवशी मी जिंकलेली असेल. फक्त आईच चांगल्या सवयी जाणून असते. त्यामुळेच मी त्याला बोर्नविटा देते

असे ढीगभर आई-मुलाच्या इंस्पायार करणाऱ्या बोर्नविटाच्या जाहिराती आपल्याला लहानपणापासून टिव्हीवर पाहायला मिळतात. हीच स्टटर्जी वापरून भारतीय बाजारात बोर्नविटाने जागा पक्की केली आहे.  

 बोर्नविटाने भारतीय मार्केटमध्ये कसं सक्सेसफुल त्याची हि कहाणी 

दूध आणि शारीरिक क्षमता असं समीकरण हे खूप वर्षांपासून जोडण्यात येत. मात्र, मुलांना दुधाची ऍलर्जीं असते. दुधाचा विषय काढला की, ते लांब पळतात. अशा किती तरी मुलांच्या आईच टेन्शन बोर्नविटामुळे संपले आहे. दुधात जर बोर्नविटा टाकून दिला तर हेच मुलं कधीही दुधाला नाही म्हणत नाहीत.

९० च्या दशकातील मुलांना चॉकलेट म्हटलं की, पारलेच किस मी आठवत. आताचा काळ थोडा वेगळा आहे. आताच्या मुलांमध्ये  कॅटबरीची क्रेज आहे. चॉकलेटसाठी जगभर फेमस असणाऱ्या कॅटबरी कंपनीचा बोर्नविटा हा प्रोडक्ट.

तशी कॅटबरीची सुरुवात इंग्लंड मधील बर्मिंघम शहरात अवघ्या दोन खोल्यात झाली. जॉन कॅटबरी यांनी बर्मिंघम मध्ये एक कॅफे सुरु केला होता. तिथे चहा, कॉफी बरोबर कोका चॉकलेट ड्रिंक विकायचे. 

१५ वर्ष कॅफे चालविल्यानंतर जॉन यांनी आपल्या भावाला सोबत घेत बर्मिंघम भागात एक फॅक्टरी सुरु केली. याच फॅक्टरी त्यांना पैसे आणि नाव मिळून दिले. पुढे जॉन यांच्या मुलांच्या हातात हा व्यवसाय गेला. रिचर्ड आणि जॉर्ज यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय हाती तर घेतलाच आणि तो जगभर पोहचविला. 

 १८७९ मध्ये कॅटबरी भावंडांनी बोर्नविला परिसरात फॅक्टरी सुरु केली. 

ही फॅक्टरी त्यांच्यासाठी लकी ठरली. ही फॅक्टरी त्यांना जगभर घेऊन गेली. इथेच कॅटबरीला ‘डेरी मिल्क’चा अविष्कार झाला आणि पोरांना पोरीला गिफ्ट देण्याची सोय झाली. मात्र, कॅटबरी बंधू यावर थांबले नाहीत. चॉकलेट मुळे लहान मुलाचे दात खराब होतात आणि हे चॉकलेट स्वास्थासाठी चांगले नसल्याचे टिका त्यांच्यावर होऊ लागली होती. 

त्यामुळे कॅडबरी भावंडानी चॉकलेट ऐवजी असे ड्रिंक पावडर बनविण्याचा विचार केला. हे पावडर चवीला चांगले असेल आणि पौष्टिक सुद्धा. १९३२ मध्ये अशा प्रकारचे पावडर तयार झाले. ग्राहकांना याची चव फार आवडली आणि जे दूध पीत नव्हते ते सुद्धा हे पावडर टाकून दूध पिऊ लागले होते. 

दुसऱ्या महायुद्धा नंतर आशिया आणि आफ्रिका देशांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण अधिक होते याचा अभ्यास करून बोर्नविटा कंपनीने आपला मार्ग तिकडे वळविला.

 १९४८ मध्ये हाच विचार करून बोर्नविटा भारतात लॉन्च केला गेला. 

बोर्नविटा भारतात आलं तेव्हा आपल्याला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होत. यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये बस्तान बसविण्यासाठी बोर्नविटाला बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. १९७२ मध्ये भारतात रेडिओ क्रांती झाली आणि याचा फायदा घेतला बोर्नविटाने. 

रेडिओवरून जाहिरात करून बाजारात हवा निर्माण केली. पुढे  ९० च्या दशकात जाहिराती अधिक भर दिला. त्यांनी बोर्नविटा ने चव आणि आरोग्याशी नाते जोडत मोठ्या प्रमाणात जाहिरात केली. ब्रॉट अप राइट, बोर्नविटा ब्राइट’ आणि ‘गुडनेस दॅट ग्रोज़ विद यू’ अशी टॅगलाईन दिल्या. 

आई-मुलाच्या नात्याला टार्गेट केलं गेलं. 

मुलाचं आरोग्य चांगलं हवं असले तर त्याला बोर्नविटा द्याच असा प्रचार कॅटबरीने फार जोरात केला. बोर्नविटाने टीव्हीवर आई-मुलाच्या जाहिरातीचा सपाटा लावला. बोर्नविटा क्वीज नावाने एक टिव्ही शो सुरु केला होता. मुलं आणि बोर्नविटा एकमेकांना जोडण्यात या टिव्ही शो मोठा वाटा होता. 

तन की शक्ती, मन की शक्ती बोर्नविटा हे अभियान बोर्नविटाकडून राबविण्यात आले. अभियान अंतर्गत २० लाख मुल बोर्नविटाशी जोडली गेली. अगोदर आईला हा प्रोडक्ट आवडावा आणि तिने मुलांना वापरायला सांगावं. असं गणित या अभियानातून मांडण्यात आलं होत. 

 उत्तर भारतात म्हणजे हिंदी पट्टातील राज्ये हे दुधाबाबत सधन आहेत. बोर्नविटाने हेच डोक्यात ठेऊन त्या अनुषंघाने मार्केटिंग केलं. २००६ मध्ये बोर्नविटाने आपले पॅकेजिंग बद्दल. त्याच बरोबर फाईव्ह स्टार मॅजिक चॉकलेट हा फ्लेवर बाजारात आणला. 

तसेच लहान मुलं बघणाऱ्या चॅनेल पोगो आणि तर चॅनलवर ते तुम्हाला टँलेन्टेड व्हायचं असेल तर बोर्नविटा प्याच असा प्रचार सुरु केला. घरात स्वतःहून मुलं बोर्नविटाची मागणी करू लागले होते. मुलं दूध प्यायला लागल्याने कितीतरी आईचं टेन्शन गेलं होत.  

 कॅडबरीचे चॉकलेट खाऊन आपल्या मुलाचे दात खराब होते म्हणणारे पालक याच कंपनीचा प्रोडक्ट असणारा बोर्नविटा बाबत मात्र वेगळं मत बोलू लागले. ६० पेक्षा अधिक देशांमध्ये कंपनी आपले प्रोडक्ट विकत आहे. बोर्नविटाचा चाहतावर्ग हा जगभर आहे.  यात युरोप, उत्तर अमेरिका, भारत, साऊथ आफ्रिका, बांग्लादेश सारख्या देशांचा समावेश आहे.   

टॅलेंट आणि आरोग्याशी संबंध जोडून बोर्नविटाने मोठी मजल मारली आहे.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.