शिवसेनेत अधुरं राहिलेलं, विदर्भ ताब्यात घेण्याचं राज ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार का…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ‘ग्रेट-भेट’ या मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता, “एकदा माझ्या बेडरुममध्ये, मी आणि उद्धव बसलेलो असताना राज आला. म्हणलं राज तुला काय पाहिजे ? तर म्हणला मला पुणे आणि नाशिक पाहिजे. उद्धव म्हणला, दिलं. तू बघ पुणे आणि नाशिक. नंतर त्याच्या डोक्यात आलं, मुंबई पाहिजे. म्हणलं मुंबईला शिवसेनेचा जन्म झाला आहे, हे जन्मठिकाण काही तुला देता येणार नाही. आठवडाभर काही नाही, मग विचारलं गेलं मराठवाडा आणि विदर्भ पाहिजे. तेव्हा मला कळलं याची चाल काही निराळी दिसते.”

इथून पुढं राज ठाकरे आणि शिवसेना नेतृत्वाचं बिनसत गेलं आणि शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 

थोडक्यात राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागं असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण होतं, विदर्भावरचा अंमल.

या किस्स्याची आत्ता आठवण येण्यामागचं कारण म्हणजे, राज ठाकरेंचा सध्या सुरु असलेला विदर्भ दौरा. अनेक वर्षांनी राज ठाकरेंनी विदर्भ दौरा केलाय, या दौऱ्यातून त्यांचं नेमकं काय लक्ष्य आहे ? राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षापुढं विदर्भात नेमकी काय आव्हानं आहेत ? हेच जाणून घेऊयात.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.