जीते तो राहूल जिंदाबाद, और हारे तो इंशाअल्लाह EVM तेरे तुकडे होंगे..


गाव गोळा करणं हा आपल्याकडं सगळ्यात हार्ड विषय. एकदा का गाव गोळा झालं न तर मग एकएक इर्साल पॉइन्ट मिळत्यात. एवढ्या गर्दीत अचानक एखाद म्हातारं पण कॉमेडी करुन जातय. हिच ताकद असत्या गर्दीची. अहो लाथाबुक्यांची भांडण सोडा बोलाबोलीवरनं जगात भांडण झाली ना तर चीन, कोरीया, रशिया, अमेरिका सगळे जाग्यावर डोकं धरून बसतील. 

आत्ता हे आत्ता का तर, कुठल्यातरी एका रात्री बोलभिडू कार्यकर्त्यांना स्वप्न पडलं, लोकांना न्याय दिला पाहीजे. लोकं काय बोलतात ते सगळ्यांना समजलं पाहीजे. 

मग आम्ही असा निर्धार केला की, 

कुठलाही विषय गाजाय लागला की महाराष्ट्रातल्या सगळ्या मिडीयाच्या कमेंटबॉक्समध्ये जायचं तिथं जे अस्सल, वेचक घावतय ते एका छताखाली भिडू लोकांना द्यायचा. 

पण कसय नारळ फुटत नव्हता, तो आज फुटला.. म्हणून “गावगोळा” या विशेष सदराखालचा हा लेख तुमच्या डोळ्यांशी टाकण्याचा निर्धार करत आहोतं. 

सुरवात झाली सकाळी दहाला, सगळे न्यूज चॅनेल कुटून कुटून LIVE अपडेट देत होते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सह्याद्रीवर अजूनही सोयाबीन लागवडीचे फायदे हाच विषय चालूय. 

असो तर, कोण काय काय म्हणतय ते सांगताव. 

जीते तो राहूल जिंदाबाद और हारे तो इंशाअल्लाह EVM तेरे तुकडे होंगे.. 

कमेंटबॉक्समधल्या ७० टक्के (डोळ्यांचा आणि मनाचा अंदाज) कमेंटमध्ये कॉंग्रेसला टार्गेट करण्यात आलं. माणसं म्हणतात आत्ता EVM वरुन गळं काढा की, दरवेळी EVM मध्येच कांड केलय म्हणून हारलो म्हणणाऱ्या कॉंग्रेसला एकंदरित लोकांनी सुमडीत घेतलय… 

पण थांबा. जिथे विरोध तिथे समर्थन.. 

सारवासारव करायला आलेले लोकं एक थेअरी मांडतायत ते म्हणताय की, हि शाहनिती आहे. मोदी की राजस्थान, MP. शंभर टक्के मोदी. देशात सरकार पाहीजे. मग मोदी आणि शहांनी काय केलय तर मुद्दाम यावेळी सेटिंग लुज ठेवलेय. म्हणजे काठावर हरायचं. लोकांना विश्वास वाटलां पाहीजे EVM वर. रक्त सांडायचं ते युद्धात. 

शब्दश: सांगायचं तर ते अस आहे, 

भाजपने तीन राज्यात कॉंग्रेसला सत्ता देऊन सरळ इव्हिएमवरील लक्ष विचलित व आपला २०१९ साठी मार्ग मोकळा केलाय !  #BanEVMInIndia

आत्ता एक जोक्स. 

पाच राज्यांमध्ये चहाच्या टपऱ्या बंद…. आलु से सोना बनाना शुरू. 

अज्जून एक सांगतो, 

१) समुद्र खवळलेला असताना त्यात अडकलेला जेव्हा न डगमगता मार्ग काढतो … किनारा गाठतो त्याचे कौतुक होते.

#राहूल_गांधी. 

२)  समुद्र खवळलेला असताना त्यात अडकलेला जेव्हा न डगमगता मार्ग काढतो … किनारा गाठतो त्याचे कौतुक होते.  

#नरेंद्र_मोदी. 

हि दोन्ही वाक्ये आळीपाळीने मोदी आणि राहूल यांच्यावर फिरवू फिरवून वापरली आहेतच. बाकी कॉंग्रेसच्या विजयाचं विश्लेषण लोकांनी खूप सुंदर केलं आहे. ते म्हणतात, 

५० निवडणूका हरलेल्या पप्पुला पाहुन कोणी मतदान दिलेलं नाही स्थानिक नेतृत्वाला पाहून मते मिळाली आहेत सत्ताविरोधी लहर होती. 

थोडक्यात अजून राहूल गांधींच्या बाजून लोक कमीच बोलतायत. इथे हवा ज्योतिरादित्य सिंधीया आणि सचिन पायलट यांची होवून राहिल्या भिडू. 

अज्जून दोन प्रकार आलटून पालटून सुरू आहेत ते म्हणजे, 

आघाडीवर असले की मोदींचा विजय आणि पिछाडीवर असले की हिंदू खतरेमें हें..

असही काहीबाही बोलत्यात लोक्स. बर या सगळ्यात एक नविन टूम निघालेय ती झाली की विषय संपवतो, म्हणजे तुम्ही तूला पाहते बघायला मोकळे,  BJP च्या माणसांकडून एक मॅसेज सुमडीत फॉरवर्ड होतोय तो असा की, 

करो राजतीलक की तयारी आ रहे हे नितीन गडकरी.

5 Comments
  1. Anil D Awachar says

    Excellent bhidu

Leave A Reply

Your email address will not be published.