अशा ५ महिला ज्यांना दाढी आहे तरिही त्या जग जिंकतायत !

आज आतंराष्ट्रीय दाढी दिवस. अस गुगल सांगत. लोकं मग सण असल्यासारखा तो दिवस साजरा करतात. दाढी म्हणल्यानंतर माणसं हे समीकरण तर फिक्सच आहे. म्हणजे हा दिवस माणसांचा. त्यातही दाढी असणाऱ्या माणसांचा. पण कोणतिच गोष्ट आत्ता ठराविक लोकांची राहत नाही. हा सण जगातल्या काही बायका देखील मोठ्या आनंदात साजरा करत असतील कारण काय तर त्यांना दाढी आहे. 

आम्ही सांगतोय अशा महिलांबद्दल ज्यांना दाढी आहे पण त्याहून अधिक वेगळी ओळख निर्माण करुन त्या जग जिंकतायत ! 

 

१) हरनाम कौर. 

Screen Shot 2018 09 01 at 8.26.18 PM
twitter

पंजाबी कुटूंबातली हरनाम सध्या ब्रिटीश नागरिक आहे.  तिच्या लग्नाच्या वेळी तिने फोटोशूट केलं होतं ते फोटोशुट अनेकांनी पाहिलं आणि ती आंतराष्ट्रीय चेहरा बनली. सर्जरी करण्याचा पर्याय तिनं स्वीकारला नाही. तिच म्हणणं इतकचं मी स्वत:वर प्रेम करते. मी जशी दिसते तशी मला आवडते. 

“I love my beard, my stretch marks and my scars.” हे तिचं वाक्य. 

२) एनालिसा हैकलमैन. 

34
TLC

TLC वरती स्ट्रेंन्ज शो दरम्यान एनालिसाच्या नवऱ्याने त्यांच्या प्रेमाची हकिकत सांगितली होती.  कोणत्यातरी विचित्र रोगामुळे तिला दाढी आहे. पण तिच्या नवऱ्याने तिच्यावर मनापासून प्रेम केल आणि तिनं देखील तितकच प्रेम केलं. त्यांची लव्हस्टोरी खास लव्हस्टोरी म्हणून अनेकदा चर्चेत असते. 

३) व्हिव्हिएन व्हिलर.

33

व्हिव्हियन व्हीलर या लिस्टमध्ये खास आहे कारण तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये करण्यात आली आहे. त्याच कारण म्हणजे तिची दाढी या दाढीची साईज आहे ११ इंच. महिलांमधील सर्वात लांब दाढी म्हणून तिची नोंद करण्यात आलेली आहे.

४) जेस्सा.

32

खरतर तिची ओळख इतकीच. ती चर्चेत आली ती व्हेनिस फ्रिक शो मधून. त्या शोमध्ये तीने आपल्या दाढीमध्ये साप लपवून ठेवला होता. तिने शो देखील जिंकला आणि लोकांच मन देखील. 

५) जेनिफर मिलर.

the bearded lady circus sideshow performer 105257

जेनिफर मिलर प्रसिद्ध आहे ती सर्कस साठी. तिची स्वत:ची सर्कस आहे आणि ती वेगवेगळे शो करते. आणि तिची सर्कस देखील प्रसिद्ध आहे.  बाकी या काय वेगळं करतायत म्हणालं तर त्या जगतायत आणि इतर महिलांच्या सुंदरतेच्या व्याख्यांना खोडून काढत आनंदात जगतायत. 

Leave A Reply

Your email address will not be published.