११८ वर्ष जुना फोटो पाहून लोकांना भीती का वाटतेय? काय आहे त्या मागच रहस्य?

भूत कोणाच्या शरीरात किंवा कुठे राहतो याची अनेक लक्षण सांगितली जातात. जस भूत आरशात दिसत नाही, ते मंदिरात प्रवेश करत नाही, कॅमेरा मध्ये त्यांचा फोटो घेता येत नाही, आपण त्याच्यातून आरपार जावू शकतो, भुताला मारल्यावर रक्त निघत नाही.

अशा अनेक गोष्टी आपण फिल्म मध्ये आणि कथांमध्ये वाचतो. 

असाच एक फोटो आहे. जो ११८ वर्ष जुना आहे. फोटो सामान्यच दिसतो. पण आपण जर त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपल्या अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही. या फोटोत असं काही आहे ज्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. कारण या फोटोत पाहिल्यानंतर हे स्वप्न आहे कि हकीकत हेच कळत नाही. आज पर्यंत आपण ज्या गोष्टी खऱ्या आहेत असं मानत आलो आहोत त्या खोट्या आहेत का?

का खरं काही वेगळ आहे.

का आपण जे फोटोमध्ये पाहत आहोत ते खर आहे.

फोटोला नीट निरखून पाहिलं कि आपल्या मनात असे प्रश्न सहज येतील. या फोटोमध्ये काही मुली आहेत ज्या हात बांधून उभ्या आहेत. हा फोटो १९९० मध्ये आयरलँड ची राजधानी बेलफास्ट मध्ये घेण्यात आला होता. यात दिसणाऱ्या मुली कपड्याच्या मिलमध्ये काम करत होत्या. सगळ्यांनी त्यावेळेस युनिफॉर्म घातला होता. आपल्याला वाटेल कि यात एवढं बोलण्यासरख काय आहे ?

पण या फोटोला नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल कि या फोटोत काय असं भयानक आहे.

हा फोटोला सगळ्यात आधी बेलफास्ट लाइव ने इंटरनेट वर पोस्ट केला होता. पोस्ट केल्यानंतर कोणाचाही हे लक्षात आलं नव्हतं कि फोटो मध्ये काहीतरी विचित्र आहे. लिंडा नावाच्या एका महिलेने केलेल्या कमेंटमुळे लोकांना त्या वर विचार करणे भाग पडले. फोटोच्या कोपऱ्यात उभी असणाऱ्या मुलीकडे लक्षकेंद्रित करत विचारलं होत कि कुणी त्या मुलीच्या खांद्यावर असणाऱ्या हाताकडे नीट बघितलं आहे का ?

आश्चर्याची गोष्ट तर हि होती कि ज्याने हा फोटो पोस्ट केला होता त्याला सुद्धा हे माहित नव्हतं. ज्यामुळे त्याला हि बघून धक्का बसला होता.

त्या मुलीच्या खांद्यावर एक हात दिसत आहे. त्याच्याकडे पाहिलं कि अस वाटत कोणी तरी तिला पकडलं आहे. पण तिच्या शेजारी कोणीच नाहीये. तिच्या मागे उभ असलेल्या मुलीने देखील हात बांधले आहेत. आता प्रश्न हा येतो कि कोण आहे ती जिने त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला आहे ? या प्रकरणाला घेऊन खूप काही बोलण्यात आले. कोणी म्हणत होते कि या फोटोमध्ये काहीतरी फेरबदल केलेले आहे. पण ज्या वेळेस हा फोटो काढला होता. त्यावेळेस टेकनॉलॉजि एवढी विकसित नव्हती कि त्यात काही बदल करता येईल. आत्ता त्या फोटोत बदल केले असतील याबद्दल ठाम मत फोटोग्राफीतील तज्ञ देखील देत नाहीत.

या फोटोला घेऊन मुख्य करून दोन प्रश्न समोर येतात, कि हा हात कुणाचा आहे. मुलीचा कि मुलाचा ? दुसरा म्हणजे त्या मुलीला याची जाणीव होती का कि कुणीतरी आपल्याला पकडलेले आहे ? पण फोटोत पाहिल्यानंतर हे लक्षात येत कि तिच्या बाजूला कुणीच उभं नाहीये.

Leave A Reply

Your email address will not be published.