आकाशात कडाडणाऱ्या विजेबाबतच्या २० आश्चर्यकारक गोष्टी

  1. विजेच्या अभ्यासाला FULUMINOLOGY असे म्हणतात.
  2. प्रत्येक वर्षी जवळ जवळ २४ हजार लोकांचा वीज पडल्याने मृत्यू होतो.
  3. प्रत्येक सेकंदाला ४० वेळा वीज कोसळते, म्हणजेच दिवसातून साधारण ३० लाख वेळा. प्रत्येक वीज हि जमिनीवर येऊन कोसळतेच असे नाही काही वेळा वीजा ढगातचं एकमेकाला धडकतात.
  4. विजेमध्ये इतकी ताकद असते कि तीन महिन्यापर्यंत एखादा १०० वोल्टचा बल्ब चालु राहू शकतो.
  5. आभाळातील एखाद्या विजेचे तापमान ३०००० डिग्री सेल्सियस असते, म्हणजेच सूर्या पेक्षा वीज ५ पटीने उष्ण असते.
  6. आकशातील वीज ही X RAY किरणांना तोड देऊ शकते.
  7. १९०२ मध्ये वीज पडल्याने आयफेल टॉवर चा वरचा भाग खराब झाला होता.
  8. वीज कोसळताना तिची लांबी चार ते पाच किलोमीटर इतकी असते आणि त्यात १० करोड वोल्टचा आणि १०००० AMPS चा करंट असतो.
  9. विजेत इतकी उष्णता असते कि या उष्णतेत एक लाख ६० हजार ब्रेड सहज भाजले जाऊ शकतात.
  10. एखादी वीज कोसळली तर एखाद्या पुरुषाच्या मारण्याची शक्यता एखाद्या स्त्री पेक्षा अधिक असते.
  11. अमेरिकेतील उथा येथे १९३९ मध्ये वीज कोसळून एकाच वेळी ८३५ जनावरांचा मृत्यू झाला होता.
  12. १९९८ मध्ये एका फुटबॉल मच दरम्यान वीज पडल्यामुळे एका टीमच्या सगळ्या खेळाडूंचा मृत्यू झाला होता. पण याच वेळी विरोधी असणाऱ्या संघाच्या केसाला देखील धक्का लागला नव्हता.
  13. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे लक्षात आले आहे कि जर अशाच पद्धतीने ग्लोबल वार्मिंग वाढत राहिले तर २१०० पर्यंत आजच्या तुलनेत अधिक प्रमाणत वीज कोसळण्यास सुरवात होईल.
  14. VENEZULA येथील MARACAIBO नदी मध्ये नेहमीच वीज कोसळत असते. एका रात्रीत १० तास म्हणजेच एकाच वर्षात २६० रात्री येथे वीज कोसळत असते.
  15. वीज सहसा दुपारच्या वेळेत कोसळते, एखाद्या माणसाच्या डोक्यावर, गळ्यावर किंवा खांद्यावर याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो.
  16. आवाजापेक्षा अधिक वेगाने प्रकाश प्रवास करतो त्यामुळे आपल्याला वीज आधी दिसते आणि नंतर आवाज येतो.
  17. STATUE OF LIBERTY वर वर्षातून ३०० वेळा वीज कोसळते.
  18. आफ्रिकेतील बोंगो नावाचा प्राणी वीज पडून जळालेले लाकूड खात.
  19. पाऊस नसताना किंवा ढगाळ वातावरण नसेल तरी देखील, विजेचे पासून आपण सुरक्षित असतो असे नाही. कारण वीज वादळाच्या मध्यापासून ३ किलोमीटरच्या अंतरा पर्यंत कोसळते.
  20. आपल्याला जि दिसते ती खाली पडणारी नव्हे तर खाली पडून परत जाणारी वीज दिसते. तिचा वेग ३२ करोड फुट प्रती सेकंद इतका असतो आणि आवाजाचा वेग ११०० फुट प्रती सेकेंद असते. वीज पडून परत जाण्याचा अवधी फक्त २ मायक्रोसेकेंद इतकाच असतो.हे ही वाचा भिडू.
Leave A Reply

Your email address will not be published.