महाराष्ट्रात 25 तर गोव्यात 18… प्रत्येक राज्यात कोणत्या वर्षी दारू प्यायली परवानगी..?

दिल्ली लिकर पॉलिसी अजूनही चर्चेत आहे. या पॉलिसीमुळे सरकारचं झालेलं नुकसान आणि अबकारी मंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर पडलेल्या धाडी बातम्यांमध्ये गाजल्या. पण याच पॉलिसीमुळे दारूचा खप देखील वाढला.

त्यातल्या प्रमुख कारणातलं एक कारण होतं ते म्हणजे दिल्लीमध्ये दारू पिण्यासाठी असणारं वय कमी करण्याचा कायदा.. 

लिकर पॉलिसीनुसार दारू पिण्यासाठी आवश्यक असणार वय हे 25 वरून 21 करण्यात आलं. त्यापूर्वी 25 वर्षांच्या आतील व्यक्तींना दारू पिताच येत नव्हती अस नव्हतं, फक्त पब, हॉटेल्स, बार अशा ठिकाणी मर्यादा येत होत्या. विशेषत: कॉलेजच्या मुलांना अशा ठिकाणी जाताना पोलीसांचा सामना करावा लागायचा. मात्र लिकर पॉलिसीमुळे 21 वर्षांपर्यन्त मर्यादा खाली खेचण्यात आली व पब, बार अशा ठिकाणी कॉलेजची मुले जावू लागली.. 

असो तर हा आपल्या लेखाचा उद्देश नाही, तर कोणत्या राज्यात कोणत्या वर्षी दारू पिण्यास परवानगी आहे हे सांगण्यासाठी आपला लेख आहे. कसय तुम्ही एखाद्या राज्यात फिरायला जाता, स्वॅगमध्ये एखाद्या बारमध्ये जाता आणि तिथून मिसरुड न फुटलेल्या तुम्हाला बाहेर काढलं तर.. 

त्यामुळं बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत..

सर्वात महत्वाचं वय म्हणजे 18.. 

18 वर्षानंतर आपण मतदान करू शकतो. पंतप्रधान कोण असावा यावर मत मांडू शकतो. लोकसभेच्या निवडणूकीत मतदान करू शकतो.पण दारू पिवू शकत नाही.  

जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, अंदामान निकोबार बेट, गोवा, पॉण्डिचेरी, राजस्थान आणि सिक्कीम या राज्यांना व केंद्रशासित प्रदेशात 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर दारू पिण्यास परवानगी आहे. 

त्यानंतरचा टप्पा येतो तो 21 वर्ष पुर्ण झाल्यानंतरचा.

आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम, कर्नाटक, मध्यप्रदेश, मेघालय, मिझोराम, ओडिसा, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि 2021 साली या यादीत सामील झालेले दिल्ली या राज्यांमध्ये वयाची 21 वर्ष पुर्ण झाल्यानंतर दारू पिण्यास कायदेशीर परवानगी आहे. 

तिसऱ्या टप्प्यात एकच राज्य येत.

2017 साली 21 वर्षांची असणारी वयोमर्यादा वाढवून या राज्याने 23 केली. हे राज्य आहे केरळ. केरळमध्ये तुम्ही गेलात तर वयाची 23 वर्ष पुर्ण केली असतील तरच तुम्हाला दारू पिता येतो.. 

आत्ता येतो लास्टचा टप्पा. तो म्हणजे 25 वर्षाचा.. 

इथलं महत्वाचं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात वयाची 25 वर्ष पूर्ण झाली असतील तरच तुम्ही दारू पिवू शकता. पण बियर किंवा वाईन प्यायची असेल तर वयाची 21 वर्ष पुर्ण झाली असतील तरी परवानगी आहे.

महाराष्ट्रासोबत पंजाब, हरियाणा, चंदिगड व दादरा व नगर हवेली या राज्य व केंद्रशासित प्रदेशात वयाची 25 वर्ष पुर्ण झाल्यानंतरच दारू पिता येते… 

तर बिहार, गुजरात यासारख्या राज्यात दारूबंदी आहे. इथे दारू मिळत नाही अस एसीत बसणारे तज्ञ सांगतात.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.