नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जाहिर झालेला भारतरत्न, त्यांच्या कुटूंबाने का नाकारला होता ?

भारतरत्न हा आपल्या देशातील सगळ्यात प्रतिष्ठेचा नागरी सन्मान आहे. या पुरस्काराने आज पर्यंत अनेकांचा गौरव झाला आहे. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर जागतिक पातळीवर देशाचे नाव पोहचविणारे, अनेक रत्न आपल्या देशात आहेत. या माणसांचे कार्य आपल्या देशाचा गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असतात तर काही देशाच्या वर्तमानात अमुलार्ग बद्दल घडवून आणतात.

सध्या भूपेन हझारिका यांच्या मुलाने भारतरत्न पुरस्कार नाकारल्यापासून या पुरस्काराच्या भौवती असणाऱ्या अनेक चर्चा रंगत आहेत.

पण हा पुरस्कार नाकारणारे तेज हजारिका हे काही पहिले व्यक्ती नाहीत.

१९५४ साली भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्या इतपत मोठे कार्य न केल्याचे सांगून पंडीत हृदयनाथ कुंजरू यांनी हा सन्मान नाकारला होता. त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी १९५८ साली भारतरत्न नाकारला. भारतरत्न पुरस्कार निवड समितीचे सदस्य असल्याचे कारण पुढे करून त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता पण नंतर १९९२ साली त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

याच वर्षी आपल्या देशाचा अभिमान आणि अनेकांची स्फूर्ती असणाऱ्या एका थोर व्यक्तीला जाहीर झालेला हा सन्मान नाकारण्यात आला होता.

आज आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक घोषणा ऐकू आल्यानंतर भारतीय असल्याचा अभिमान जाणवतो, राष्ट्रध्वजाला सलाम करण्यास हात सरसावतो आणि अपोआपच मुठी वळतात ती घोषणा म्हणजे, आपल्या प्रत्येकाच्या तोंडातून उमटणारा शब्द,

“जय हिंद”

हा शब्द ज्यांनी दिला ते म्हणजे देशाचे एक थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी नेताजींना जाहीर झालेला भारतरत्न सन्मान नाकारला होता. तसे या माणसाला भारत रत्न देणे हा भारतरत्न पुरस्काराचा सन्मान असेल. पण त्यांना जाहीर झालेला भारतरत्न त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारला होता.

तो का नाकारला हा प्रश्न आपल्याला सहाजिकच पडला असेल ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याधी त्यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराबाबत थोडी माहिती घेऊ.

पी. व्ही नरसिंह राव यांनी सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न देण्याची शिफारस केली होती. भारतरत्न हा सन्मान सगळ्यांसाठी सारखाच पण नेताजींना जाहीर झालेला सन्मान थोडा वेगळा ठरतो. तो वेगळा ठरतो याचे कारण म्हणजे त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला होता.

त्यांच्या कुटुंबांनी हा पुरस्कार त्यांना “मरणोत्तर” जाहीर झाल्याने नाकारला होता. 

त्यांच्या कुटुंबियांच्या मते हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर देणे म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू झाला असल्याचे मान्य करणे, पण त्यांचे निधन झाल्याचे मान्य करण्यास त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. तसे सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू आणि त्याबाबत असणाऱ्या अनेक शंक अजून हि मिटलेल्या नाहीत. आपल्या देशातील अनेकजण आज ही सुभाष बाबू ह्यात नसल्याचे मान्य करत नाहीत.

त्यांना दिलेल्या या मरणोत्तर पुरस्काराचे प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेले.

तिथे शासनाकडे नेताजींच्या मृत्यूचे कोणतेच ठोस कारण नव्हते, असे असताना त्यांना मरणोत्तर भारतरत्न कसा जाहीर केला गेला? असा प्रश्न विचारत अखेर भारतरत्न जाहीर झालेल्या महान व्यक्तींच्या यादीतून त्यांचे नाव काढून टाकण्यात आले.

त्यांतर पुन्हा एकदा २०११ साली माहिती अधिकारा खाली गृह मंत्रालयास याबाबतचे स्पष्टीकरण मागण्यात आले होते. या स्पष्टीकरणात देखील त्यांनी वरील कारणानेच प्रस्ताव पाठीमागे घेण्यात आल्याचे सांगितले आहे. याच वर्षी भारत पुननिर्माण संघ या संघटने मार्फत मथुरा येथून सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरवात देखील करण्यात आली होती.

सुभाष बाबू यांचे आयुष्य जसे अनेक गूढ असणारे आहे तसेच त्यांचा मृत्यू देखील. पण त्यांच्या जिवंत असण्याच्या आणि मरणाच्या वादात भारताच्या अत्तीउच्च सन्मानाची प्रतिष्ठा मात्र कधी वाढणार हाच प्रश्न निर्माण होतो. कारण भारतरत्न मिळालेल्या महान व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव असणे हा भार रत्न सन्मानाचा सन्मान आहे.  

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.