शरद पवार फक्त त्या आज्जींना भ्यायचे..!!

संदीप कदम हे साधारण १९९६ च्या सुमारास शरद पवारांचे PA म्हणून नियुक्त झाले. शरद पवार पुण्याच्या भेटीमध्ये कार्यकर्त्यांना बारामती हॉस्टेलवर भेटत असत.

संदिप कदम सांगतात त्या दिवशी बारामती हॉस्टेल परिसरात शरद पवारांना भेटण्यासाठी एकच गर्दी झाली होती. प्रत्येकजण साहेबांना भेटू इच्छित होता. त्या गर्दीत एक आज्जीबाई आल्या आणि म्हणाल्या मला शरदला भेटायचाय. इतक्या गर्दित शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने PA यांच्यासह कार्यकर्ते धास्तावले.

शरद पवारांना एकेरीत बोलवणारी ती आज्जीबाई कोण असेल, त्या खऱच साहेबांच्या ओळखीच्या असतील तर त्यांना कस विचारणार या द्विधा अवस्थेत PA पडले.

अखरे संदीप कदम यांनी त्या आज्जीबाईंना विचारलच की, 

आजी तुमचं नाव काय ? कशासंदर्भात तुम्हाला साहेबांना भेटायचं आहे ? त्यावर आज्जी म्हणाल्या मेंढेकरआजी आल्यात एवढचं सांग त्याला. 

संदीप कदम यांनी मेंढेकर आज्जी अशी लिहलेली चिठ्ठी शरद पवारांच्या कक्षात पाठवली. 

दूसऱ्याच मिनिटांना साहेबांनी आज्जीबाईंना आत बोलावून घेतलं. PA आणि संबधित अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांच काम सोडवण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. शरद पवारांना एकेरी बोलवणाऱ्या आज्जी पाहून अधिकाऱ्यांनी देखील त्याचं काम चुटकीसरशी सोडवलं.

पण सर्वांना प्रश्न पडला की या आज्जीबाई नेमक्या कोण ? 

तेव्हा चौकशी केल्यानंतर समजलं कीशरद पवार BMCC कॉलेजमध्ये असताना मेंढेकरांच्या बंगल्यामध्ये भाड्याने रहात होते. या बंगल्याच्या घरमालकिण म्हणजे मेंढेकर आज्जी. साहजिक पुण्याच्या घरमालकांचा अनुभव शरद पवारांना पण आलेला असावा. पण हक्काने इतक्या वर्षाने मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला देखील शरद या नावाने हाक फक्त पुण्यातील घरमालकच मारू शकते हे देखील खरं. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.