जग बदलेल पण मराठी शाळेत ९० वर्षे सुरु असलेली कॅम्लिन कंपास पेटीची परंपरा संपणार नाही..

शाळेच्या आठवणींपैकी एक नेहमीची आणि शाळेच्या जीवनाला पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कंपास/ जिओमेट्री बॉक्स. शाळेत भारतीय सेनेचे झेंडे कंपासमध्ये लावण्यापासून ते हिरो,हिरॉईनचे चित्र किंवा डब्ल्यू डब्ल्यू इ चे सुपरस्टार असे अनेक कारनामे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केले असेल. कंपास म्हणजे एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कॅम्लिन. पिवळ्या,केशरी काळ्या रंगाचा तो कंपास बॉक्स त्याकाळी बाळगणे म्हणजे अभिमानाची गोष्ट मानली जायची. मित्रांमध्ये उगाच भाव खाऊन जाण्यासाठी ती कॅम्लिनची कंपास बॉक्स पुरेशी असायची.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर कॅम्लिनच्या कंपासची परंपरा आहे. कॅम्लिनची पेन्सिल, कॅम्लिनची दौत वैगरे वैगरे असं बरंच काही कॅम्लिनने शालेय आणि महाविद्यालयीन पिढीला पुरवलं. पण ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसेल की कॅम्लिनचा कंपास बॉक्स तयार करण्यामागे एका मराठी माणसाचा हात आहे आणि या मराठी कुटुंबाने कॅम्लिनची हवा जगभर पोहचवली. तर आज आपण जाणून घेऊया कॅम्लिन कंपासची यशोगाथा.

1931 मध्ये दिगंबर दांडेकर यांनी आपल्या भावासोबत जीपी दांडेकर यांच्यासोबत कॅम्लिनची सुरवात केली आणि कुटुंबातच त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. काका आणि वडिलांकडून दिलीप दांडेकर यांनी हेच कोकुयो कॅम्लिन लिमिटेड कंपनीमध्ये कोकुयो कॅम्लिन लिमिटेड कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं आणि 2002 मध्ये ते कॅम्लिनचे अध्यक्ष झाले. 1979 मध्ये कार्यकारी संचालक सुद्धा ते झाले. सुरवातीला कॅम्लिनची ओळख दांडेकर अँड कंपनी अशी होती.

दिलीप दांडेकर 1 जून 2002 पासून कॅमलिन लिमिटेडचे ​​अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या अंतर्गत मे 2011 मध्ये, कोकुयो एस अँड टी कंपनी लिमिटेड, जपानच्या कोकुयो कंपनी लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी, दांडेकर कुटुंबीयांकडून कॅमलिन लिमिटेडमधील नियंत्रण भागभांडवली विकत घेतली. कंपनीचे नाव बदलून कोकुयो कॅमलिन लि. असं केले.

शालेय साहित्य त्रिकोण,कंपास, कर्कटक, पट्टी आणि स्टेशनरी साहित्य यात भरभरून असायचं आणि दुकानांमध्ये जास्तीच्या वह्या किंवा सामान घेतलं तर कॅम्लिनची कंपास त्यावर फ्री मिळायची. विद्यार्थ्यांमध्ये ही कंपास भरपूर लोकप्रिय झाली.

 भारतभर आणि जगभर ही कंपास चांगलीच हिट झाली आजही बऱ्याच मुलांकडे कॅम्लिनचाच कंपास बॉक्स आढळून येतो.,

दिलीप दांडेकर यांनी 1 जून 2002 पासून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचे बंधू सुभाष दांडेकर यांच्या कार्यकारी पदावरून निवृत्तीनंतर दिलीप दांडेकर संचालक झाले. 43 वर्षांच्या कालावधीनंतर अध्यक्ष दांडेकर यांनी इंडियन मर्चंट्स चेंबर्सचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि आता ते कॅमलिन फाइन सायन्सेस लिमिटेड (पूर्वी, कॅमलिन फाइन केमिकल्स लिमिटेड) चे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम करत आहेत आणि जून 2006 पासून त्याचे संचालक आहेत. दांडेकर यांनी संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले कोकुयो कॅमलिन लिमिटेडसाठी.

दिलीप दांडेकर इंडो स्कॉटल ऑटो पार्ट्स प्रा.लि. या कंपन्यांचे संचालक म्हणूनही काम करतात. लि., निलमॅक पॅकेजिंग इंडस्ट्रीज लि. आणि कॅमलिन इंटरनॅशनल लि. ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत, इंडियन मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.