एकेकाळचे बिझनेस पार्टनर विधानपरिषदेसाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत

विधानपरिषदेसाठी सहा पैकि चार ठिकाणी निवडणूक बिनविरोध झालीय. आता घोडेबाजार, मतदार पळवा-पळवी असलं काय आता ऐकायला येणार नाही असा जर तुम्ही विचार करत असाल तर थोडं थांबा. नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशीम या दोन ठिकाणी निवूडणूका होणार आहेत. त्यातही अकोल्याची सीट जरा इंटरेस्टिंग आहे. महाविकास आघाडीकडून सलग तीन वेळा विधानपरिषदेवर  जाणारे गोपीकिशन बाजोरिया रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने वसंत खंडेलवाल यांना तिकीट दिलंय.

अकोला-बुलढाणा-वाशीम या तीन जिल्ह्यात पसरलेली ही सीट मागच्या चार टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे .

मात्र ही सीट शिवसेनेच्या ताब्यात असण्यामागं  शिवसेनेच्या ताकदीपेक्षा गोपकिशन बाजोरिया यांचे  ‘कौशल्य’ असल्याचं दिसून आलायं.

पक्षाचे जास्त मतदान असूनसुद्धा उमेदवार निवडून येइलचं अशी ग्यारंटी या मतदारसंघात नसते. गोपीकिशन बाजोरियांनी अल्पमतात असतानाही  विजय खेचून आणलेत. त्यावेळी आघाडाची मते फुटली होती. आता महाविकास आघाडीकडून  उभा असणाऱ्या बाजोरीयांना ३ वेळा चाललेला बहुमताचा आकडा मॅनेज करण्याचा डाव त्यांच्यावरच उलटणार नाय ना याची काळजी घ्यावी लागणार आहे.

गोपीकिशन बाजोरियांना आव्हान देणारे वसंत खंडेलवाल एके काळी बाजोरियांचे बेझनेस पार्टनर होते. सराफ व्यापारी असणाऱ्या वसंत खंडेलवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत तयार झालेलं प्रोडक्ट आहे. त्यामुळे आरएसएसचं तीन जिल्ह्यात असलेलं नेटवर्क खंडेलवाल यांच्या कामात येणार आहे.

त्यात वसंत खंडेलवाल गडकरींच्या जवळचे मानले जातात त्यामुळे स्वतः गडकरी निवूडणुकीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं जातंय

आता मतदारसंघातील आकडयांचं गणित कसं आहे ते पाहू-

टोटल मतदान- ८२२

म्हणजे बहुमताचा आकडा- ४१२ 

आता महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं मतदान बघा 

काँग्रेस -१९१

शिवसेना -१२४

राष्ट्रवादी -९१

असं पक्षांचं मिळून गोपीकिशन बाजोरियांकडं ४०६चं मतदान आहे. 

भाजपचं  स्वतःचं  २४६ चा मतदान असणार आहे.

म्हणजे महाविकास आघाडीला विजयासाठी फक्त ६ तर भाजपाला तब्बल १६६. पण खरा ट्विस्ट आहे जमीनीवर चाललेल्या राजकरणाचा.  मतदारसंघाचा इतिहास पाहता या  दोन कारणांमुळं बाजोरियांना ही  निवडणूक अवघड जाऊ शकते.

महाविकास आघाडीत कुरबुरी 

मतदार संघात सगळ्यात मोठा पक्ष असूनही सीट डावल्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहे. तसेच सेनेचेच आमदार असलेल्या नितीन देशमुख आणि बाजोरिया यांच्यातही वाकडं आहे.  त्यामुळं महविकासआघाडीची मतं फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वंचित फॅक्टर

मतदारसंघात वंचितची एक गठ्ठा ८६ मते महत्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीला जिल्हा परिषदेमध्ये सभापती निवडणुकीत धूळ चारल्याने प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर आधीच नाराज आहेत.  या पराभवाचा वचपा ते आता काढणार का? हे अजूनतरी स्पष्ट नाहीए. मागच्या निवूडणुकीसारखं ते वंचितच्या सदस्यांना ‘सद्सदविवेकबुद्धीने’ मतदान करण्याचा सल्ला देतात का? यावरही निवूडणुकीचा निकाल अवलंबून आहे .

सध्यातरी बाजोरिया यांच्याकडे असणारी अधिक मतं आणि अल्पमतातही विजय खेचून आणण्याचा त्यांचा अनुभव यामुळं त्यांना निवूडणुक अवघड जाणार नाही अस दिसतंय. पण त्यांनाही महाविकासआघडीचे सगळीच मते पडतील याची खात्री नाहीए. त्यामुळेच विरोधकांची हि मते आपण आणु शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर आपण सर्व ८२२ उमेदवारांच्या संपर्कात असून निवूडणुकीत मोठा उलटफेर घडवू असा विश्वास वसंत खंडेलवाल व्यक्त करतायत. निवूडणुकीत दोन्हीही बाजुंना लागणाऱ्या अधिकच्या मतांची गरज आणि धनाढ्य उमेदवार यांमुळे नियूडणुकीत पैसा मात्र मोठ्या प्रमाणात ओतला जणार एवढं नक्कीयं .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.