सगळ्याचं मिस वर्ल्ड सक्सेसफुल ठरत नाही युक्ता मुखीचं उदाहरण डोळ्यांदेखत आहे

सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जबरदस्त चर्चा होतेय ती, हरनाझ संधू हिची. तब्बल २१ वर्षानंतर हरनाझने भारताला मिस युनिव्हर्स’ हा किताब मिळवून दिलाय. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तीन वेळाचं हा किताब भारताकडे आलाय.

सगळ्यात आधी  अभिनेत्री सुश्मिता सेन हिने १९९४ साली पहिल्यांदा हा किताब पटकावला होता, त्यांनतर लारा दत्ता हिने २००० साली हा मिस युनिव्हर्स किताब जिंकला. २००० साला नंतर आता म्हणजे २१ वर्षांनी हा किताब पुन्हा भारताने मिळवलाय. त्यामुळे हरनाझ संधू हीच देशभरातून कौतुक होतंय.

आता मिस युनिव्हर्स असो, मिस वर्ल्ड असो किंवा मिस इंडिया ‘किताब जिंकणारी महिला नेहमीच लाइमलाईट मध्ये राहते. आपली स्पर्धा जिंकल्यानंतर प्रत्येकासाठी त्या फेमस चेहरा बनलेल्या असतात. मग त्याचे माध्यमामध्ये इंटरव्युव्ह होतात, अनेक मोठं मोठे ब्रँड त्यांना आपला ब्रँड अँबॅसिटर बनवतात, कोणी तर त्यांना चित्रपटांमध्ये सुद्धा घेत. त्यांची चर्चा होते.

अर्थात काय या सुंदऱ्यांचं लाईफ सेटल होत. पण हे फेम सगळ्यांनाच मिळत असं नाही. यातल्या बऱ्याच जणींचं फेम हे काही काळापुरती मर्यादित राहत. तेवढ्यापुरतं त्यांना वाव मिळतो, मात्र नवीन कोणी चेहरा समोर आला कि, त्या फक्त एखाद्या फोटोपुरतं मर्यादित राहतात.

यातलं एक उदाहरण म्हणजे युक्ता मुखी. जिने १९९९ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. आणि त्याच वर्षी तिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा किताब सुद्धा जिंकला. त्यांनंतरची काही वर्षे ती बरीच चर्चेत होते, सगळ्यांनीच तिला पार डोक्यावर घेतलेलं, पण सध्या ती लाइमलाईटपासून दूर आहे. असंही म्हणू शकतो कि, अनेकांना ती माहित सुद्धा नसेल.

माजी मिस वर्ल्ड असणारी युक्ता हीच जन्म बंगरूळमधल्या एका सिंधी कुटुंबात झाला. पण ती वाढली दुबईमध्ये. त्यांनतर १९८६ साली युक्ताचे कुटुंब मुंबईला परतले. आईने सांताक्रूझमध्ये ग्रूमिंग सलून उघडले, तर वडील एका कपड्यांच्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर.

१९९९ साली मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर तिला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती, अनेक कंपन्यांची ती ब्रँड अँबॅसिटर बनली होती. काही दिवसातच  युक्तासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले. २००२ साली तिला ‘प्यासा’ हा पहिला चित्रपट  रिलीज झाला, ज्यात ती आफताब शिवदासानी सोबत दिसली होती. यांनतरही तिला अनेक चित्रपट मिळाले. तिने तामिळ चित्रपटातही काम केले.

पण युक्ताला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. यामागचं कारण तिची उंची असल्याचं बोललं जातं. युक्ता मुखीची उंची ६.१ फूट आहे. त्यामुळे चित्रपटात तिच्यापेक्षा जास्त उंच हिरो शोधणं हे दिग्दर्शकांसाठी मोठं टास्क होत. त्यामुळे उंची हेच युक्ताचे बॉलिवूडमधील अपयशाचे कारण बनले. अनेक चित्रपट करूनही युक्ताचे करिअर जास्त उंचीवर पोहोचू शकले नाही.

यानंतर हळूहळू तिला चित्रपट मिळणे पूर्णपणे बंद झाले. आपल्या करिअरमध्ये काही खास घडत नाही त्यामुळे युक्ता मुखीने २००८ मध्ये न्यूयॉर्कमधील बिझनेसमन प्रिन्स तुलीशी लग्न केले. दरम्यान लग्नाच्या ५ वर्षानंतर म्हणजे २०१३ मध्ये अश्या काही बातम्या समोर आल्या ज्यावर विश्वास बसणं अवघड होत.

युक्ता मुखीने तिचा पती प्रिन्स तुलीविरोधात एफआयआर दाखल केला. मुंबईतील आंबोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये तिने पतीवर हुंडाबळीसाठी छळ आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप केले होते.

एका मुलाखतीत युक्ताने सांगितलं होतं की, तिचा नवरा तिला जनावरासारखं मारायचा. चित्रपटात काम करण्याला तिच्या नवऱ्याचा आणि सासरकडच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे, तिचा नवरा तिला प्रत्येक वेळी मारायचा. शेवटी एफआरआय दाखल केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात जाऊन पोहोचलं आणि जून २०१४ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. युक्ता मुखीला एक मुलगा आहे ज्याचा ताबा युक्ताकडे आहे.

दरम्यान चित्रपटात जरी सक्सेकफूल ठरू शकली नाही तरी, युक्ता मुखीने बरीच गुंतवणूक केली आहे. मालमत्तेव्यतिरिक्त तिची  काही रेस्टॉरंट्स देखील आहेत. तिने परफ्यूम व्यवसाय आणि फॅशन उद्योगातही गुंतवणूक केली आहे. युक्ताची एकूण संपत्ती विचारलं तर २४५ मिलियन डॉलर असल्याचं बोललं जात.

दरम्यान,सध्या तिने पुन्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केलीये. २०१९ च्या गुड न्युज चित्रपटात तिने एक छोटी भूमिका साकारली होती. पण आता प्रसिद्धीपासून ती बरीच लांब आहे.

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.