छोटा शकील की मोटी गर्लफ्रेंड

मुंबईच्या डोंगरी भागात तीचं पार्लर होत.पार्लर तसं फेमस. त्याभागातल्या लग्नाच्या , कार्यक्रमाच्या महागड्या सौंदर्यप्रसाधनाच्या ऑर्डर्स तिलाच मिळायच्या. नवऱ्यापेक्षा किती तर पट जास्त कमाई तिची होती. घरसंसार दोन लहान मूल असा तिचा चौकोनी संसार चालला होता पण त्यात ती समाधानी नव्हती. तिला पॉवरचं आकर्षण होत. राजकारणात जाऊन नगरसेविका व्हायचं होत. आणि त्या नादात तीला अंडरवर्ल्डच्या वाटेवर नेऊन उभं केलं

तिचं नाव रुबिना सिराज सय्यद.

रुबिनाचा दीर आबेद हा कुप्रसिद्ध डॉन छोटा शकीलचा गँगमेम्बर होता. २००२ साली एका खुनाच्या प्रकरणात त्याला अटक झाली. त्याला मुंबईच्या आर्थररोड जेल मध्ये ठेवण्यात आलं होत. बऱ्याचदा त्याला भेटायला त्यांच जेल मध्ये जाणं व्हायचं. तेव्हाचं आबेद रुबिनाच्या मार्फत शकीलकडे निरोप पाठवायचा. शिकली सवरलेली, इंग्लिश बोलू शकणारी शहाणी बाई म्हणून तिच्यावर कोणाची शंका येत नव्हती.

रुबिना बोलण्यात खूप हुशार होती. तिच्या मधाळ बोलण्याला छोटा शकील भाळला. तिच्याबरोबर तासनतास तो फोनवर बोलायचा. रुबिनावर त्याचा विश्वास बसत गेला. त्याने तीला आपल्या गँगमध्ये सामील होणार का विचारले. रुबिनाला तेच हव होत. छोटा शकीलकडून मिळणारे पैसे आणि पॉवर वापरून राजकारणात करीयर करायचं स्वप्न ती बघू लागली.

गँग साठी ती मन लावून काम करत होती. शकीलचा डावा हात फाहीम मचमच याच्याकडून तीला ऑर्डर मिळायचे. जेलमध्ये असणाऱ्या गँगमेंबरचा खर्च पाहणे, त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा भागवणे, वकिलांकडून कोर्टाच्या कामाची व्यवस्था लावणे अशी कामे तिच्याकडे होती.

थोड्याच दिवसात तीच रुपडंच बदलून गेलं. अंगावर महागडे दागदागिने आले.  स्कुटीच्या जागी पॉश चारचाकी आली. ब्युटीशियनच्या जागी एका हिरोईनचा उदय झाला.

तिच्या भाषेत एक माजुरडे पणा आला होता. ती कोणालाही घाबरत नव्हती. सगळ्यांना माहिती होते रुबिनाच्या डोक्यावर छोटा शकीलचा हात आहे. तिच्या नावाने छोटे मोठे गुंड थरथर कपू लागले.

छोटा शकील की मोटी गर्लफ्रेंड

असं तिला अंडरवर्ल्डच्या सर्कल मध्ये ओळखलं जाऊ लागलं.

तिच्या मोठ्या व्यवहारामुळे कधी न कधी पोलिसांची तिच्यावर नजर जाणारच होती.

एका मोठ्या फिल्म प्रोड्युसरला खंडनीसाठी होणारे फोन कॉल टॅप केल्यावर तिचा सुगावा लागला. पोलिसांनी  चार महिने फिल्डिंग लावून रुबिनाला जाळ्यात पकडलं. कोर्टात तिचे गुन्हे सिद्ध झाले. तिला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. पण जतुरुंगात मध्ये गेल्यावर तिचा माज आणखीन वाढला.

जेलमध्ये आपल्या तगड्या शरीरयष्टीमुळे तिला जेल मधले पोलीस पठाण म्हणून ओळखायचे. तर तिच्या तोरयामुळे इतर जेल कैदी तिला हिरोईन म्हणायचे. तुरुंगात बसूनही शकीलच्या गँगचा रिमोट तिच्या हातात होता. शकीलच्या जादूचा परिणाम म्हणून तीचा जेल मध्येही राज्य सुरु झालं.

तिथ तिचा एकछत्री अंमल सुरु झाला. थोड्याच दिवसात सहकारी जेलकैद्यांच्यामध्ये रुबिनाने दहशत निर्माण केली. तिच्या मनाविरुद्ध वागणाऱ्याना तिचा मार खावा लागत होता. तुरुंग अधिकाऱ्यांचाही तीच्यावर कंट्रोल नव्हता. जेवण आवडले नाही तर ताट फेकून देणे असे उद्योग तिचे नेहमीचे होते.

कायम आक्रमक मूडमध्ये असणाऱ्या रुबिनाने एक दिवस गुजरात बेस्ट बेकरी केससारख्या हाय प्रोफाईल केसमध्ये नाव असणारी झहिरा शेखवर हल्ला केला. तिथून मात्र पोलिसांनी तिला वठणीवर आणला. रुबिनाची बरीच धुलाई करण्यात आली.

पाच वर्ष शिक्षा भोगून आल्यावर या पठाणी हिरोईनचा सगळा माज उतरला. राजकारण राहिलं बाजूला, कार घर याबरोबर स्वताच ब्युटीपार्लर देखील गेलं. तिच्या पतीचही काही दिवसापूर्वी निधन झालं. आज ती कुठे आहे याचा कोणालाच पत्ता नाही. असं म्हणतात तिचा आशिक छोटा शकीलने तिला आपल्यासोबत पाकिस्तानमध्ये लपवले आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.