आत्ताचे इंटरनेट आणि Web 3.0 यात काय फरक आहे..? नेट वापरायचे पैसे मिळणार का..?

मोबाईल मध्ये एखाद नवीन  डाऊनलोड केल्यावर सगळ्यात पाहिलं फोटो गॅलरी, कॉन्टॅक्ट, लोकेशनचा ऍक्सेस मागितला जातो. जर दिली नाही तर त्या पचा काहीच उपयोग होत नाही. तर दुसरं म्हणजे फोन वरून काहीही सर्च करा.  

गुगलवर एखाद्या वस्तूची माहिती सर्च करून पहा. त्यानंतर आपण ती गोष्ट सर्च करून विसरून सुद्धा जातो. परत जेव्हा फोन सुरु करण्यात येतो. तेव्हा मोबाईल, पीसीवर जी वस्तू सर्च केली होती त्या संदर्भातील माहिती दिसत असते. 

जर एखाद्या कंपनीचा मोबाईल सर्च करून पाहिला असेल तर त्याच वेळी दुसऱ्या कंपनीचे फोन तुम्हाला सजेशन म्हणू दाखविले जातात.  कंपन्यांना फोन मधील गॅलरी,कॉन्टॅक्ट वापरण्याची परवानगी देतो. त्यामुळे या कंपन्या एक प्रकारे  वापरकर्त्यांच्या आयुष्यात डोकावत असतात. यामुळे प्रायव्हसी संपुष्ठात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

आपण काय सर्च करतो हा डेटा या कंपन्या दुसऱ्या कंपन्याला विकतात. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा सुद्धा मिळवत आहेत. 

गुगल, युट्युब, फेसबुक ट्विटर सारख्या कंपन्या सेवा फ्री मध्ये का देता असतात. 

तर याच उत्तर आहे वेब ३.O

मागच्या काळात काही माहिती मिळवायची असेल तर लायब्रेरी आणि वर्तमानपत्रा शिवाय पर्याय नव्हता. माहिती मिळविण्याचा सर्वात मोठा आधार हाच होता.  त्या काळात काही जणांकडे मोबाईल, कॉम्प्युटर असले तरीही इंटरनेट उपलब्ध नव्हते. 

 २०१० नंतर देशात अनेक गोष्टी बदलत गेल्यात. 

वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW ची सुरुवात १९८९ साली झाली. तेव्हाचे इंटरनेट आताच्या इंटरनेटपेक्षा खूप वेगळे होते. कारण तेव्हा इंटरनेटवर फक्त टेक्स्ट फॉरमॅटमध्ये माहिती मिळायची. हे फक्त वाचायच्या कामाचं होत. फोटो, व्हिडीओ बघायची सोय नव्हती. 

ऑर्कुट आल्यानंतर हा काळ झपाट्याने बदलत गेला. ऑर्कुट संपल्यानंतर नंतर फेसबुक, ट्विटर युट्युब सारख्या कंपन्या आल्या. या कंपन्यांसाठी मागच्या काळात आपण फक्त प्रेक्षक होतो. मात्र आता आपण या कंपन्यासाठी कॅटेन्ट पुरविणारे झाले आहोत.       

जेव्हा आपण गुगल मॅप दाखवतात तेव्हा कुठं ट्राफिक जॅम आहे, कुठं नाही हे दाखवतात. हे सगळं  वेब २.O मुळे कळत.  

तुम्ही एखाद्याचा फोन मध्ये सेव्ह केल्यानंतर फेसबुक उघडल्यावर तुम्हाला फ्रेंड सजेशन मध्ये मिळत. people you may know मध्ये दिसायला सुरु होते. हे कशामुळे घडत तर आपण जेव्हा एखादे ॲप फोन मध्ये इन्स्टोल करतो तेव्हा गॅलरी, कॉन्टॅक्ट वापरण्याची परवानगी देतो.  या पला दिलेल्या परवानगी मुळे अशा प्रकारचे सजेशन आपल्याला दिसायला सुरुवात होते. 

आपण ऍक्सेस दिल्याने आपल्या सगळ्या घडामोडींवर या कंपन्या लक्ष ठेवून असतात. 

मोबाईल वापरणं सुलभ व्हावं म्हणून आपण पला ऍक्सेस देत असतो. आपण ऍक्सेस दिल्यानंतर त्या डेटाचा वापर करून या कंपन्या इतर कंपन्याला विकत असतात. 

वस्तू संदर्भात सजेशन देत कंपन्या आता राजकीय विषयात सुद्धा शिरकाव केला आहे. लोकांचं मत बनविण्यासाठी हे  काम करत आहेत. जर एखाद्या वापरकर्ता ठराविक विचारसणीचा फॉलोवर्स आहे हे कळल्यावर त्याला त्याच संदर्भातील फोटो, व्हिडीओ सजेशन मध्ये दाखविले जाते. हे धोकादायक असल्याचे सांगितले जाते. 

मात्र यावर नियंत्रण कोण आणणार हा प्रश्न उपस्थित राहतो. आपण जरी याची तक्रार केली तर ते ऐकणार कोण असा प्रश्न उपस्थित राहतो. 

याला उत्तर आहे वेब ३.O  

वेब ३.O ही सिस्टीम डिसेंटरलाईज असणारा आहे. यामुळे कोणा एकाची मक्तेदारी नसणार आहे. आज अनेकजण युट्युब वर काही ना काही कंटेन्ट टाकत असतात. यातून काही पैसे मिळावे असे त्यांना वाटत असते. मात्र, युट्युब काय करत तर काही काळ जाऊ देत, त्यांच्या नियमात बसण्या एवढे सबस्क्राइबर होई पर्यंत हा सगळा कंटेन्ट फ्री मध्ये वापरत असतात. 

कंटेन्ट टाकल्यावर लगेच त्याचे पैसे मिळायला हवे अशी अनेकांची अपेक्षा असते मात्र युट्युब तसं करत नाही. तसेच ट्विटर मोठ्या व्यक्तींना ट्विट टाकण्याचे पैसे देत असते. मात्र, सर्वसामान्य लोकांना ट्विटसाठी कधी पैसे दिले नाही. असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातो. 

वेब ३.O मध्ये सर्वसामान्य लोकांना सुद्धा ट्विट केल्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच एखादा व्हिडीओ पाहिल्यास त्याचे काही ना काही पैसे सुद्धा मिळणार आहेत. हेच वेब ३.O महत्वाचं वैशिष्टय असणार आहे. 

वेब ३.O हे ब्लॉक चैन टेक्नॉलॉजीवर आधारित तंत्रद्यान असणार आहे. यावरील सगळा डेटा विखुरलेला असणार आहे. त्यामुळे एखाद्या सर्व्हरवरून डेटा डिलिट केला तो दुसऱ्या सर्व्हरवर उपलब्ध असणार आहे. वेब ३.O हे कोणाचीच ओळख मागणार नाही. क्रिप टो वॉलेट प्रमाणे असणार आहे. यात एनएफटी, क्रिपचा डेटा, मेटा वर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगचा सगळा डेटा यात ठेवता येणार आहे. ओपन सोर्स असणार आहे.

यात एक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे तो म्हणजे  वेब ३.O ची गरज का पडली 

मिडल मॅन ला बाहेर काढण्यासाठी वेब ३.O तयार करण्यात आले आहे. वेब ३.O ची आयडिया पूर्ण  होण्यासाठी काही काळ लागणार आहे. जर नवीन वेब तयार करायची असेल तर डोमेन नेम विकत घ्यावं लागत. कुठल्याही वेब साईटकडून हे डोमेन नेम घेतलं तरीही शेवटी ते आयसीएएनएम या एकाच कंपनीकडे जातात.   

सगळं कण्ट्रोल आयसीएएनएमकडे असत. डोमेन नेम जेव्हा परत रिनिव करायचे असते त्यासाठी पैसे भरावे लागतात. वेब ३.O  एकदा डोमेन नेम घेतल्यावर परत पैसे भरायची गरज राहत नाही. यात एकाधिकारशाही, मक्तेदारी नसणार. ब्लॉक चेन मध्ये असल्याने त्याचा डेटा वेगवेगळ्या सर्व्हर मध्ये स्टोर असणार आहे. 

याच लोकेशन  एकाच ठिकाणी नसणार आहे. त्यामुळे हॅक होण्याची शक्यता खूप कमी आहे. सर्व्हर जगभर विखुरलेले असल्याने ते हॅक होणार नाही. येणाऱ्या काळात एनएफटी बेस डोमेन नेम असणार आहे. याचे फायदे म्हणजे सर्व्हर लेस होस्टिंग करता येणार आहे. वॉलेट मधील डेटा सुरक्षित राहणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रायव्हसी जपली जाणार आहे.

तर याचे काही तोटे सुद्धा सांगितले जात आहेत. ते म्हणजे वेब ३.O आल्यावर सायबर क्राईम वाढेल असं सांगितलं जातं. 

हे ही वाच भिडू 

     

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.