चेटकांपासून ते करणीपर्यन्त प्रत्येक गोष्टीच समाधान या गावात मिळतं.

आमच्या गावात एक मंदिर आहे. अस सांगितलं जात की इसवी सन १२०० व्या शतकात एका रात्रीत हे मंदिर बांधल. आमच्या गावात एक विहीर आहे अस सांगितल जात की स्वत: राजेमहाराजे त्या विहीरच पाणी पिण्यासाठी लांबून येत. आमच्या गावात अमुक आहे आमच्या गावात तमुक आहे. 

थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या गावात अशा खूप गोष्टी असतात ज्या जगातल्या कुठल्याच गावात नसतात अस आपणाला वाटत असतय. साहजिक पण असतय म्हणा कारण आपल्या गावाएवढं जग आपण कुठ निरखून बघत असतोय. मेरा भारत महान पण आमच्या गाव लयच महान म्हणणारा आपला स्वभाव. तर असो वरती लिहलं काय आणि आम्ही लांबड लावतोय काय..?

थेट मुद्दाला हात घालून विषय संपवून टाकूया. तर मुद्दा असाय या गावात जे आहे ते लयत लय तुमच्या गावच्या एखाद्या कोपऱ्यात, एखाद्या माळरानावर असू शकतय. पण या गावात सगळी भावकी मिळून हिच कामे करते आणि हो ते पण जागतिकरण किंवा उदारीकरणापासून नाय तर अगदी आपल्या आबा, आज्याच्या काळापासून म्हणजे थेट शे पाचशे वर्षांपासून.

गावात काय चालतं तर काळीजादू. या गावात लांबून लोक य़ेतात आणि भूतबाधा, करणी वगैरे वगैरे गोष्टींपासून मोकळं होतात. आत्ता या गावाचा संपुर्ण मॅटर सांगतो.

तस हे गाव इतकं फेमस नव्हतं पण झालं काय शिकलेला उत्पल बोरपुजारी नावाचा मुलगा या गावात गेला. त्यानं गाव बघितलं गावात पोत्यानं पसरलेल्या काळ्या बाहूल्या बघितल्या. माणसांच्या कवट्या बघितल्या, लिंबू वगैरे तर ढिगानं बघितले मग त्यानं या गावावर डॉक्युमेंटरी काढली.

डॉक्युमेंटरीचं होतं मियांग मिथ अॅण्ड लिएलिटी. 

झालं डॉक्युमेंटरी हिट झाली आणि गाव फोकसमध्ये आलं. मग सामाजिक कार्यकर्ते, अतिउत्साही माणसं आणि आमच्यासारखे स्वत:ला पत्रकार म्हणून घेणारे भिडू या गावात पोहचले. त्यांनी डेटा गोळा केला तेव्हा कळलं या गावातल्या काळ्या जादूला तर शे पाचशे वर्षाचा इतिहास आहे.

गावातली माणसं सांगतात की या गावाला मायोंग नाव पण माया या शब्दावरुन पडलय. मायोंगचा अर्थ जादू, भ्रम असा आहे. आमच्या गावात सगळे काळाजादूच करतात पण पैशासाठी आम्ही या जादूवर डिपेन्ड नसतोय. (याच गावाची नोटाबंदीचा फरक न पडलेलं गाव म्हणून स्टोरी करता येईल असा विचार याक्षणी बोलभिडू कार्यकर्त्यांच्या मनात आला)

टाईम्स ऑफ इंडियाने या गावाबद्दल एक बातमी दिली होती त्यात सांगण्यात आलं होतं की, या गावात बऱ्यापैकी माणसं आपल्या हरवलेल्या वस्तू शोधायला ( ते कुठल्या दिशेला वस्तू हरवली तिकडे जावून शोधा सांगण्याचा प्रकार), वशीकरण करायला आणि करणी करायला येत असतात. बाकी चेटूक सारखे प्रकार तर बोनसमध्ये आलेच. 

आत्ता राहता राहिले दोन मुद्दे पहिला बोलभिडू कार्यकर्त्यांना या बद्दल काय वाटतं. तर कार्यकर्ते असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. एक रिकामे चाळे करणार गाव म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करावं त्याचं कारण अस की महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मलन नावाचा कायदा देखील आहे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा वैज्ञानिक दृष्टीने सर्व गोष्टी पाहण्याचा वारसा देखील आहे.

दूसरा मुद्दा या गावात फिरायला कस जायचं.

गुवाहाटी माहित आहे न. ते तिकडे भारताच्या वरच्या कोपऱ्यात तिथे जावून मायोंगला सोडा म्हणायचं. चाळीस किलोमीटरमध्ये या गावात पोहचाल. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.