गेली १८ वर्ष हा सिक्युरिटी गार्ड शहिद जवानांच्या कुटूंबियांना पत्र लिहतोय.

पत्रास कारण की, 

एखाद्याच्या घरात दुख:त प्रसंग घडलेला असतो. देशासाठी एखादा तरुण शहिद झालेला असतो. तो देशासाठी लढला. देशासाठी लढत असताना तो गेला. शहिद झाला. याचा अभिमान असू शकतो पण घरातल्यांसाठी आपल्या घरातला एक सदस्य गेलेला असतो. एखाद्या महिलेचा नवरा, दोन चार महिन्यांच्या तान्हा बाळाचे वडिल, आयुष्यभर खस्ता खालेल्या म्हाताऱ्याचा पोरगा, कुणाचा मोठ्ठा भाऊ, कुणाचा हक्काचा मित्र गेलेला असतो. एखादा जवान शहिद होतो तेव्हा घर पोरकं होतं असत. 

चार दिवस मिडीयामध्ये शौर्याचे धडे छापून येत असतात. लोकांना देखील शूरकथा ऐकायला बऱ्या वाटतात पण नंतर त्या कुटूंबाच काय होतं ते कोणच पाहत नाही. दुर्दैवाने याच भारतात शहिद जवानांना मिळालेले पेट्रोप पंप पासून शे पाचशे हजारांवर डल्ला मारणारे देखील आहेत. सगळ्या प्रकारची लोकं आपल्या भारतात आहेत हिच आपली विशेषता. 

घरातला कर्ता माणूस गेलेला असतो. घरात दुखा:त बुडालेलं असत. हळुहळु सावरायला लागतं. लोक विसरुन जातात अशा वेळी एक पत्र त्या घरात येतं. त्यात लिहलेलं असतं, 

“आज तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल जितका गर्व वाटतो तितकाच मला वाटतो. लोक विसरतील पण मी विसरणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मुलाबद्दल अभिमान वाटणारा एक माणूस गुजरातच्या सुरतमध्ये देखील राहतोय.” 

हे पत्र असतं सुरतमध्ये राहणाऱ्या जितेंद्र सिंह यांच. जिंतेंद्र सिंह हे एका प्रायव्हेट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. गेली १८ वर्ष ते देशभरात शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांना पत्र पाठवण्याचं काम करतात. गेल्या १८ वर्षात त्यांनी तब्बल ३,८०० पत्र पाठवली आहेत.

पाठवलेल्या पत्रांच्या पोहचपावत्या, त्यांचे झेरॉक्स त्यांनी जपून ठेवली आहेत. इतकच काय तर गेल्या १८ वर्षात देशासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक सैनिकाबद्दल वर्तमानपत्रात आलेली बातमी त्यांनी जपून ठेवली आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या वर्तमानपत्राचं एकूण वजन ९ क्विंटल असल्याचं ते सांगतात. 

जिंतेंद्र सिंग सांगतात, त्याच कुटूंबाचा इतिहासच सैन्याचा. आजोबा, वडिल सैन्यात होते. त्यांनाही सैन्यात जायचं होतं पण ते शक्य झालं नाही. कारगील युद्धात शहिद होणाऱ्या सैनिकांबद्दल त्यांना वाईट वाटू लागलं व तेव्हापासून त्यांनी शहिद जवानांच्या कुटूंबियांना पत्र पाठवत राहतात. हे काम ते आजतागायत करत आहेत. 

खाजगी कंपनीत सिक्युरिट गार्डच काम करणाऱ्या त्यांना फक्त १०,००० रुपये पगार आहे. इतक्या कमी पगारातून त्यांनी पत्र व जपून ठेवलेल्या सैनिकांच्या आठवणींसाठी एक छोटी खोली बांधून ठेवली आहे. त्यांच्या मुलाच नाव हरदिप सिंग अस आहे. हरदिप सिंग यांनी २००३ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत शहिद झाले होते. त्यांच्या नावावरुन त्यांनी आपल्या मुलाचं नाव हरदिप अस ठेवलं.  

हे ही वाचा. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.