नासाने ब्रह्मांडाचं रहस्य शोधण्यासाठी सोडलेला स्पेस टेलिस्कोप आपल्या ठिकाणाला पोहचला आहे…

नासाने 30 दिवसांपूर्वी एक शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप अवकाशात सोडला होता तो 25 जानेवारी रोजी आपल्या निश्चित ठिकाणी पोहचला आहे. नासाचा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा एका महिन्यात पृथ्वीपासून जवळपास 16 लाख किलोमीटरचं अंतर कापून आपल्या फायनल स्थिर बिंदू म्हणजे लॅगरेंज पॉईंट ( L2 ) वर पोहचलेला आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने सोशल मीडियावर पोस्ट करून याबातीत माहिती दिली आहे. हा टेलिस्कोप नासा,युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीने तयार केला आहे.

आता तुम्ही म्हणाल भिडू हा लॅगरेंज पॉईंट (Lagrange point ) काय विषय आहे ?

लॅगरेंज पॉईंट असं अंतर आहे जिथं कोणत्याही वस्तूवर पृथ्वी आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव एक सारखा राहतो. यामुळे वस्तू स्थिर राहते आणि इंधनाचा होणारा अपव्यय वाचतो. नासाकडून असं सांगण्यात आलंय की हा पॉईंट पूर्णपणे स्थिर नाहीये. पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये पाच लॅगरेंज पॉईंट आहे, ज्यांना L1, L2,L3,L4 आणि L5 असं म्हणतात. लॅगरेंज पॉइंटच नाव फ्रांसचे गणितज्ञ जोसेफ लुई लॅगरेंज यांच्या नावावरून ठेवण्यात आलं.

दुसरा लॅगरेंज पॉईंट म्हणजे L2 हा पॉईंट सगळ्यात महत्वाच्या स्थानी आहे. या जागेवर टेलिस्कोपमध्ये लावलेले उपकरणं जास्त गरम होत नाही यासोबतच या पॉइंटवर गुरुत्वाकर्षण संतुलन इतर पॉइंटच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतं. या या ठिकाणी नासा याची ऑप्टिक्स आणि दुसऱ्या साधनांची पाहणी करणार आहे जिथून पुढचं काम सुरू होईल.

मागच्या वर्षी ख्रिसमसवेळी हा स्पेस टेलिस्कोप लॉन्च करण्यात आला होता.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला मागच्या वर्षी 25 डिसेंबरला एरियन रॉकेटच्या माध्यमातून फ्रेंच गुयाना मध्ये असलेल्या लॉंचिंग बेसवरून लॉन्च करण्यात आलं होतं. या टेलिस्कोपवर तब्बल 75 हजार करोड इतका खर्च आला आहे. हा जगातला सगळ्यात जास्त ताकदवान असा टेलिस्कोप आहे. याच्या क्षमतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की हा टेलिस्कोप अवकाशातून पृथ्वीवर उडणाऱ्या चिमणीलाही सहजतेने डिटेक्ट करू शकतो.

टेलिस्कोपच्या ऑप्टिक्सवर एक गोल्ड लेयर देण्यात आलेली आहे. ही लेयर इन्फ्रारेड लाईटला डिफ्लेक्ट करते त्यामुळे टेलिस्कोपमध्ये थंड वातावरण राहण्यास मदत होईल. कॅमेरा सूर्याच्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी यात टेनिस कोर्टच्या आकाराची पाच लेयर असणारी सनशील्ड लावण्यात आलेली आहे. टेलिस्कोपचा व्यास जवळपास 21 मीटर इतका आहे. 1990 मध्ये पाठवलेल्या हबल टेलिस्कोपच्या तुलनेत हा 100 पटीने शक्तिशाली आहे.

या टेलिस्कोपच्या मदतीने ब्रम्हांडाच्या सुरवातीच्या काळात बनलेल्या आकाशगंगा, उल्कापिंड आणि ग्रहांच्या रहस्यांचा शोध घेतला जाऊ शकतो. नासाने हे महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे त्यामुळे अगम्य ,गूढ वाटणाऱ्या गोष्टी कळण्यास मदत होणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.