रजनीकांत स्टाईलने फेमस झालेला नागपुराच्या डॉलीच्या टपरीवरचा चहा …

ज्यावेळेस एखादा भिडू पुण्यात येतो तेव्हा त्याला इथं आल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने आढळतात त्या म्हणजे संध्याकाळी होणारी वाहनांची गर्दी आणि दुसरी अतिमहत्वाची गोष्ट म्हणजे ठायी ठायी अमृततुल्य. अमृततुल्य म्हणजे चहाचे दुकानं. सगळीकडे पाट्या असतात की वेळेला चहा आणि चहाला वेळ आणि मग ते त्यांचं यमक तुम्ही समजून घ्या.

पण एक प्रश्न सिरियसली विचारतो चहा बनवणारे तुम्ही लय पाहिले असतील पण कधी रजनीकांत स्टाईलने चहा देणारा पाहिलाय का ? मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पहा की एक माणूस एकदम अतरंगी स्टाईलने ग्राहकांना चहा देतो. तर तो व्हिडिओ होता डॉली या गृहस्थाचा त्याच्या टपरीवर असलेली गर्दीच सांगते की तो काय वाढीव दुकानदार आहे म्हणून. पण हा पुण्याचा चहावाला नाही तर नागपूरचा चहावाला आहे.

नागपूरचा हा चहावाला आणि त्याची टपरी आता जगभरात फेमस झालीय. हा स्टायलिश चहावाला फक्त चहा स्टाईलने देत नाही तर चहा बनवण्यापासून ते ग्राहकाला वेलकम म्हणण्यापर्यंत तो एकदम जबऱ्या आहे. म्हणजे कस्टमर सुद्धा त्याचे फॅन होऊन जातात.

म्हणजे नॉर्मली आपण काय करतो की चहा आपल्या रेग्युलर रुटीन प्रमाणे देतो पण हा डॉली भाई दूध पिशवीसुद्धा एकदम खतरनाकपणे फोडतो आणि हवेतून दूध चहात टाकतो. चहा देतानासुद्धा त्याची एक विशेष स्टाईल आहे. पैसे रिटन देताना एकदम हात पकडून ग्राहकाला सुद्धा बुचकळ्यात पाडण्याची डॉलीची स्टाईल आहे.

एक स्टाईलवाला भांग आणि आपली खतरनाक स्टाईल याच्या बळावर या भिडूने आपला व्यवसाय वाढवला आहे. नागपुरात गेल्यावर बरेचं फूड vlog करणारे आवर्जून डॉलीच्या टपरीवर जातात आणि त्याच्या युनिकनेसचा मार्केटमध्ये व्हिडिओ पसरवतात. जर तुम्ही त्याचे व्हिडिओ इंटरनेटवर सर्च केले तर तुम्हाला अंदाज येईलच की नागपूरच्या कानाकोपऱ्यात तो फेमस आहे.

हा डॉली खरंतर तरुणाईमध्ये जास्त लोकप्रिय आहे कारण त्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे पण तो अगोदरपासून फेमस आहे कारण त्याचे जे रेग्युलर चहा वाले कस्टमर आहेत ते तर आधीच त्याचे फॅन्स आहेत. डॉलीला हे स्टाईल विकसित करण्याचं वेड लागलं ते साऊथच्या सिनेमापासून. म्हणजे ताकद बघून घ्या तुम्ही साऊथच्या सिनेमांची. स्वतः डॉली म्हणतो की तो हे सगळं रजनीकांत सरांच्या प्रेरणेने करतो आणि त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.

आज रजनीकांतमुळे त्याचा अंदाज आणि त्याने आपल्या अद्भुत स्टाईलने बनवलेला चहा लोकांमध्ये व्हायरल तर आहेच शिवाय फेमसही आहे. चहा वाल्यांच्या नाद करायचा नाही याचं आणखी एक उदाहरण म्हणजे हा डॉली…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.