आधीची ईडीची धाड अन मग GVK ग्रुपकडचे मुंबई एअरपोर्ट अदानींकडे

 

“ईडीने मुंबई एअरपोर्टबाबत जीव्हीके ची काय व का चौकशी केली होती. त्याचा उद्देश काय होता? याची मविआ सरकारने चौकशी करावी. सावधानता म्हणजे भ्याडपणा नव्हे”. असं आम्ही नाही तर पत्रकार राजू परुळेकर याचं म्हणण आहे.

 

हो राजू परुळेकरांनी हे ट्वीट एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. म्हणजे तसा सद्या काही  मुंबई एअरपोर्टबाबत विशेष असा दंगा नाही चालू मात्र काहीच काळापूर्वी मोठा दंगा झाला होता….मुंबई एअरपोर्टबाबतच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असलं तरी,  

नेमकं प्रकरण समजून घेण्यासाठी अगोदर तुम्हाला दोन घटना पाहाव्या लागतील. 

घटना क्र. १

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला होता. हि बातमी आहे जुलै २०२० मधली.

ईडीच्या पथकाने GVK ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचा मुलगा संजय रेड्डी आणि कंपनीचे मेन मंडळींकच्या अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यातल्या मालक रेड्डी आणि त्यांचे नातेवाईकांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील घरांवर आणि कार्यालयांवर ही कारवाई केली होती.

यासंदर्भातील एफआयआरनुसार, GVK ग्रुपवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासात ७०५  कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा तसेच बनावट करार दाखवून घोटाळा केल्याचा आरोप होता. २०१२ ते २०१८ या दरम्यान मुंबई विमानतळाचा विकास करण्याच्या नावाखाली GVK समूहाने घोटाळा केला असा त्यात उल्लेख आहे. GVK समूहाने MIAL च्या अतिरिक्त निधीपैकी ३९५ कोटी रुपये त्यांच्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवले. एमआयएएल मुंबईत असूनही, अतिरिक्त निधी हैदराबादमधील बँकांमध्ये ठेवण्यात आला होता. ह्या सगळ्या अफरातफरीसाठी बोर्ड मिटिंगचा बनावट प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दुसरीकडे बनावट करार दाखवून ३१० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला.

तसेच या एफआयआरमध्ये GVK सहित इतर ९ कंपन्यांची नावे आहेत. 

सीबीआय एफआयआरमध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या काही अधिकाऱ्यांसह काही खासगी कंपन्यांची नावेही आहेत. यापूर्वी सीबीआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जीव्हीके रेड्डी यांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील ६ ठिकाणांची झडती घेतली होती.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात एमआयएएल नावाची जॉईंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिग्ज लिमिटेड, Airport Authority of India व इतर काही विदेशी कंपन्यांनी कंपनी स्थापन केली होती. यात जीव्हीकेचे ५० टक्के शेअर्स होते, एएआयचे २६ टक्के शेअर्स होते. तर उर्वरित शेअर्समध्ये इतर कंपन्यांकडे होते.

याप्रकरणी सीबीआयनं जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी, त्यांचा मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह गैरव्यवहारात सहभागी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. शेवटी अशाप्रकारे GVK समूहाने मुंबई विमानतळावरील व्यवस्थापनाचे नियंत्रण गमावले होते. 

घटना क्र. २

अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे. अशी बातमी २०२१ च्या जुलै महिन्यातली. आपण जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला असल्याचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं होतं. जेंव्हा २०२० च्या जुलै महिन्यात  जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काढून घेण्यात आलं होतं त्याच्या दुसर्याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी ग्रुप ने जीव्हीके ग्रुप सोबत करार केला होता. आणि त्या करारानुसार, जसं कि आपण वर बोललो जीव्हीकेचे असणारा ५०.५ टक्के हिस्सा जीव्हीकेने अदानी ग्रुपच्या नावे केला.  तसेच अदानी ग्रुपने जीव्हीके व्यतिरिक्त दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांशीही करार करुन त्यांच्याकडील २३.५ टक्के वाटा आपल्या नावावर करण्याचाही करार केला होता 

मुंबई विमानतळ प्रवासी आणि मालवाहतूक करणारं देशातील दुसरं सर्वात मोठं आणि व्यस्त विमानतळ आहे. बरं या व्यतिरिक्त अदानी ग्रुपकडे असणारी भली मोठी यादी आम्ही तुम्हाला सांगतो,

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु येथील विमानतळ. 

 या विमानांचे आणि विमानतळांच खासगीकरण केल्याने आपल्यालाच फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हणत असते.

पण आता परुळेकर याचं ट्वीट असेल वा मग इतर चर्चा अशीच आहे कि, GVK समूहाच्या विरोधात झालेली कारवाई आणि त्यानंतर विमानतळाचा ताबा अदानी ग्रुप कडे हा निव्वळ योगायोग आहे कि यात काही विरोधक म्हणतात तस खर्च काळंबेरं आहे ?

का असं म्हणलं जातंय ?

ज्यावेळी, GVK समूहाच्या विरोधात सीबीआयची एंट्री झाली. जून २०२० मध्ये सीबीआयने GVK समूहाचे चेयरमन जीवीके रेड्डी, आणि त्यांचा मुलगा जीवी संजय रेड्डी यांच्या विरोधात FIR दाखल केला. सीबीआयने आरोप ठेवला की, 

मुंबई विमानतळाच्या विकासात ७०५ कोटींची हेराफेरी झाली आहे. ED ने देखील याच आधारावर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला.

यानंतर ३१ ऑगस्ट २०२० ला बातमी आली की, जीवीके समूहाने मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळामधील आपला हिस्सा अदानी समूहाला विकला आहे. अदानी यांनी यावेळी सांगितले होते, लिलाव आणि अधिग्रहण ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आणि कायदेशीर पद्धतीने झाली आहे.

सध्या इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार ही सगळी माहिती उजेडात आली होती,

भारतात एक आयोग आहे. प्रतिस्पर्धा आयोग. इंग्लिशमध्ये सांगायचं तर कॉम्पटीशन कमीशन ऑफ इंडिया (CCI). या आयोगाची जबाबदारी आहे, अशा मंजूर आणि व्यावसायिक कामांवर लगाम लावायचा. ज्यामुळे देशातील कंपन्यांच्या दरम्यान चालू असलेली स्पर्धा संपुष्टात येईल.

कोणत्याही योजनेचे हस्तांतर मोठ्या पातळीवर होत असेल तर त्यासाठी CCI ची परवानगी घ्यावी लागते. आता अदानी यांना ६ विमानतळ दिल्याला मंजूरी तर मिळालीच पण त्यासोबतच आता मुंबई विमानतळ अदानी समूहाला दिल्यावर देखील CCI ने आक्षेप घेतलेला नाही. 

यापूर्वी मुंबईचे विमानतळ हैदराबादची कंपनी GVK इंटरनॅशनल यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि इतर दुसऱ्या कंपन्यांजवळ विमानतळामध्ये भागीदारी होती, एकूणच सगळ्यांचं एकमेकांमध्ये विश्वास होता.

CCI च्या मंजुरी नंतर देखील GVK मुंबई विमानतळ अदानी समूहाला देऊ इच्छित नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव थांबवण्याचा आता GVK ने आटोकाट प्रयत्न केले. पण उपयोग शून्य !

वर्ष २०१८ च्या अखेरीस लिलाव प्रक्रियानुसार ६ विमानतळ अदानी समूहाकडे आली. यानंतर जवळपास दीड वर्षानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये अदानी समूहाने अहमदाबाद, मंगलोर आणि लखनऊ विमानतळांसाठी एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ़ इंडिया सोबत एक ‘सूट करार’ केला.

एका महिन्यात देशभरात लॉकडाऊन झाले, त्याच महिन्यात कोरोनाचे कारण सांगत फोर्स मैजूरचा हवाला दिला. सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनीची अवस्था खराब आहे, त्यामुळे ठरलेल्या वेळेवर काम करू शकत नाही

अखेरीस अदानी समूहाला ही ६ विमानतळ ५० वर्षांसाठी दिली गेली. आता २०७०-७१ सालापर्यंत अदानी समूह या विमानतळांना विकसित करण्याचं आणि देखभाल करण्याच काम करणार आहे. 

तसेच  आता देशातील सगळ्यात मोठं मुंबई विमानतळ देखील अदानी समूहाकडे आहे..त्यामुळे चर्चेत असणारी आणि समोर आलेली पार्श्वभूमी नक्की काय आहे हे स्वतः अदानी समूह च सांगू शकेल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.