लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढेच पंतप्रधान होऊ शकतात…
ब्रिटनसमोरच्या राजकीय आणि आर्थिक अडचणी संपायचं नाव घेत नाहीयेत. बोरिस जॉन्सन यांनी या वर्षी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात पक्षांतर्गत मतदान झालं आणि लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या.
आता अवघ्या ४५ दिवसांत लिझ ट्रस यांना सुद्धा पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे.
परिणामी आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होणार का याकडे लक्ष लागून राहिलंय. हे प्रकरण काही आजच नाहीये. ब्रिटनची आर्थिक परिस्थिती, बेरोजगारीची समस्या आणि त्यात लिझ ट्रस यांनी आणलेली नवी कर प्रणाली यामुळे त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचं अगदी स्पष्ट आहे. मागच्या वर्षाचा जर विचार केला तर युकेच्या चलनाची किंमत होती १$ = .७३ पाउंड स्टर्लिन आणि यावर्षी ती झालीये १$ = .८९ पाउंड स्टर्लिनचं म्हणजे त्यांच्या चलनाचं मूल्य अमेरिकेच्या डॉलरच्या मानाने घटलं आहे. याचा परिणाम ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
लिझ ट्रस यांच्या विरोधात त्यांच्यात कॉन्जर्वेटिव्ह पार्टीमधले त्यांचे राजकीय विरोधक एकत्र आले आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
त्यांच्यामते ऋषी सुनक हे ब्रिटनला इकनॉमिक क्रायसिसमधून बाहेर काढू शकतात असा त्यांना विश्वास आहे.कॉन्जर्वेटिव्ह पार्टीमधल्या काही पक्षांतर्गत बंडखोर नेत्यांना गेल्या शुक्रवारी असं लक्षात आलं की त्यांना लिझ ट्रस या पार्टी लीडर आणि पंतप्रधानपदी नको आहेत. तसंच you government poll यांच्या रिपोर्टनुसार ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात झालेल्या निवडणुकीत ६२% मतदारांना असं वाटतंय की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर १६% टक्के मतदारांना वाटतंय की त्यांनी योग्य निर्णय घेतला. आणि आत्ता आलेल्या बातमीनंतर ऋषी सुनक हा पर्याय पंतप्रधान पदासाठी पुढे असल्याचं समोर येतंय.
मागच्या महिन्यात ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी मिनी बजेट सादर केलं होतं जे सादर होऊन ३ आठवडेही पूर्ण झाले नाहीत त्यात लिझ ट्रस यांनी अर्थमंत्र्यांना पदावरून काढून टाकलं.
जेरेमी हंट हे ब्रिटनचे नुकतेच झालेले चौथे अर्थमंत्री आहेत. पहिल्यांदा बोरिस जॉन्सन यांच्या पक्षातील ऋषी सुनक यांनी जुलैमध्ये आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसरे अर्थमंत्री पदाचा कार्यभाग स्वीकारताना दिसले. बोरिस जॉन्सन यांचं सरकार गेलं आणि लिझ ट्रस यांचं सरकार आलं. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात नव्या अर्थमंत्र्यांची नेमणूक केली. आता त्यांचा पायउतार झाल्यावर जेरेमी हंट हे चौथे अर्थमंत्री म्हणून निवडण्यात आले आहेत. सध्या ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांवर प्रचंड ताण आहे, तिथली महागाई नवे उच्चांक गाठताना दिसतेय अशात त्यांच्या राजकारणात मोठे चढ उत्तर बघायला मिळत आहेत.
आता थोडं ब्रिटनच्या इतिहासात जाऊया. साल होतं १९७९ आणि ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या मार्गारेट थॅचर.
त्यांच्या अर्थव्यवस्थेत मंदी आलेली, बेरोजगारीची समस्या वाढलेली अशात त्यांनी एक आयकॉनिक स्पीच दिलं जे आजही लक्षात राहण्यासारखं आहे. This lady’s not for turning, असं आपल्या भाषणात म्हणत त्यांनी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला लिबरल म्हणजे खुलं बनवण्याचा त्यांचा विचार मांडला होता. म्हणजे त्यांनी आखलेलं धोरण आणि त्यांचा अजेंडा यापासून त्या मागे हटणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र आजच्या काळात लिझ ट्रस यांनी याच्या बरोबर विरुद्ध केलं.
निवडणूक होताना त्यांनी स्वतःला ‘मॉडर्न डे थॅचर’ म्हणवून घेतलं पण त्यांनी आखलेल्या धोरणापासून त्यांना मागे हटावं लागलं. त्यांच्यावर एवढा ताण होता की मागच्या आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केवळ ४ प्रश्नांची उत्तरं दिली.
लिझ ट्रस यांना लो टॅक्स रेट आणि हाय वेजेस हवे होते. पण पत्रकार परिषद होण्याआधी त्यांनी त्या ऋषी सुनक यांच्या प्लॅन नुसार टॅक्स रेट वाढवणार असल्याचं सांगितलं ज्यामुळे सरकारकडे पायाभूत सुविधांसाठी सरकारकडे अधिक महसूल उपलब्ध होईल. पण जर टॅक्स वाढला तर कंपनींना युकेमध्ये आकर्षक गुंतवणूक करायला कारण मिळणार नाही तसंच पोस्ट ब्रेक्झिट पिरियडनंतर युकेमध्ये कंपन्या येण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालंय. विकसित देशांमध्ये सर्वाधिक टॅक्स रेट असणाऱ्यांमध्ये ब्रिटनचा नंबर आला आहे.
युरोपमध्ये सुद्धा सर्वाधिक कॉर्पोरेट टॅक्स असणाऱ्या देशात युकेचा नंबर लागला आहे.
लिझ ट्रस यांना हव्या असलेल्या गोष्टींपेक्षाही ब्रिटनच्या जनतेला नेमकं काय हवंय हे समजण्यात त्यांना अपयश आलंय. ब्रिटनच्या जनतेला स्थैर्य हवं आहे. त्याशिवाय मिनी बजेटमध्ये मांडलेले काही मुद्दे मार्केटच्या अपेक्षेपेक्षा बरेच पुढचे होते आणि सर्व सुधारणांचा स्पीड खूप होता जो मार्केटला झेपणारा नव्हता.
२३ सप्टेंबरला ब्रिटनच्या पूर्व अर्थमंत्र्यांनी जे बजेट सादर केलं ते होतं Fresh start and put UK on high growth trajectory. हे लिझ ट्रस यांच्या धोरणानुसार आखण्यात आलं होतं. ज्यात अधिक खर्च करायची, एन्जरी बिल वर प्राईस कॅप्स लावायची आणि श्रीमंतांना टॅक्स रेट कमी करायची चर्चा होती. या काही धोरणांना ऋषी सुनक यांचा विरोध होता.
युकेमध्ये प्रचंड महागाई आहे त्यात सरकारच्या अधिक खर्च करायच्या धोरणाने यावर गंभीर परिणाम झाला.
सरकारचं खर्च करायचं धोरण नागरिकांसाठी उत्पनांचं काम करत. लोकांच्या हातात अधिक पैसे आले तर खर्च अधिक आणि महागाई अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली. एकीकडे सरकार अधिक पैसे खर्च करतंय आणि बँक ऑफ इंग्लंड खर्च कमी करण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. सरकार हे अधिक खर्च करायचं धोरण आखताना मोठं कर्ज घेताना दिसतंय. त्यामुळेही आर्थिक आघाडीवर बराच गोंधळ उडालेला दिसतोय. मोठया गुंतवणूकदारांना असा प्रश्न आहे की ब्रिटन हे घेतलेलं कर्ज फेडणार कसं हे कळत नाहीये.
२००८ च्या आर्थिक संकटानंतर ब्रिटनमध्ये गतिशून्यता आली ज्यातून ब्रिटन अजूनही व्यवस्थित बाहेर पडल नाहीये असं अभ्यासक सांगतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ब्रिटन सरकारवरचा विश्वास कमी झालाय आणि त्यांनी युके मालमत्तेच डम्पिंग सुरु केलंय. त्यामुळे लोकांनी आपले गव्हर्नमेंट बॉण्ड्स विकायला सुरुवात केली आणि त्याचा फटका ब्रिटन सरकरला बसतोय. कारण ते बॉण्ड्स सरकारकडे जमा होत आहेत आणि लोकांना पैसे देणं हे गरजेचं आहे, त्याजोगे सरकारकडे असलेला पैसा कमी होईल असं चित्र दिसतंय.
या सगळ्या कारणांनी लिझ ट्रस यांना राजीनामा द्यावा लागला आहे आणि आता नवे पंतप्रधान म्हणू अर्थशास्त्रात एक्सपर्ट असलेले आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचं नाव प्रकर्षाने पुढे येतंय