गिरीश महाजन नेहमी फडणवीसांचे संकटमोचक म्हणून कसे पुढे येतात?

जेंव्हा जेंव्हा एखादी संवेदनशील घटना हाताळायची असते तेंव्हा भाजपकडून एक नाव आवर्जून समोर केलं जात ते म्हणजे गिरीश महाजन यांचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुक मध्ये नेहमीच महाजन असतात त्यामुळे ज्या ठिकाणी इतर कोणीही जाण्याचं धाडस करत नाही अशा ठिकाणी भाजपचे संकटमोचक म्हणून पुढे सरसावतात ते म्हणजे गिरीश महाजन,नेमकं कोणत्या कारणांमुळं महाजनांना भाजपचा संकटमोचक म्हणतात जाणून घेऊयात.

नामदार गिरीश दत्तात्रय महाजन,जळगाव जिल्ह्यातील भाजपचं एक मोठं नाव. महाजनांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात १९७८ पासूनअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली.पुढे १९९२ ला महाजन हे जामनेर ग्रामपंचायतीवर निवडून गेले. १९९५ ला त्यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आजतागायत ते त्या मतदारसंघाचा नेतृत्व करतायत. २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा हे महत्वाचं खात सांभाळलं तर सध्या शिंदे – फडणवीस – अजित दादा सरकारमध्ये ते ग्रामविकास खात सांभाळत आहेत.

आता जाणून घेण्यात गिरीश महाजनांना नेमकं संकटमोचक का म्हटलं जाता.

 राज्यसभेच्या निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुळे क्वारंटाईन होते त्यामुळे ऐनवेळेला हि जबाबदारी येऊन पडली गिरीश महाजन यांच्यावर,छत्रपती संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार याला कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाविरोधात कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना तिकीट जाहीर केलं .

त्यावेळी गिरीश महाजनांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरारमधील घरी जाऊन तब्बल दोन तास चर्चा केली आणि या निवडणुकीत अशक्यप्राय वाटणारा विजय महाजनांच्या शिष्टाईमुळे सोप्पा झाला.

भाजप आणि मित्र पक्षाचे युतीच्या सरकारच्या काळातही त्यांनी अनेक प्रसंगी मध्यस्थी केली आहे.नाशिकहून निघालेल्या शेतकरी मोर्चाला तेच सामोरे गेले होते, अगदी मोर्चेकऱ्यांसोबत ते चालले आणि नेत्यांशी चर्चा करून प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न हि त्यांनी  केला,त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही त्यांनी सरकार आणि  मोर्चेकऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. 

तर कृष्णा नदीला आलेल्या पुरात देखील गिरीश महाजन हे घटनास्थळी जाऊन मदत करताना दिसले होते. 

महायुतीचे सरकार आल्यानंतरही त्यांना त्यांची संकटमोचक हि प्रतिमा वेळोवेळो जपली आहे. समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताची माहीती मिळताच सर्वप्रथम पोहोचलेले मंत्री तेच होते, तर धुळ्याजवळ महामार्गावर झालेल्या ट्रक अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोहंचणारे पहिले मंत्री हि महाजनांच.  इर्शाळवाडीच्या घटनेनं तर अख्खा महाराष्ट्र हादरून गेलेला,त्या दुर्घटनेच्यास्थळी हि  मध्यरात्री अडीच वाजता महाजन मदत  कार्यासाठी पोहोचले होते.ज्या  ठिकाणी सायकलही जात नाही, त्या ठिकाणी मध्यरात्री ते पायी जावून मदतीसाठी पोहोचले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गिरीश महाजन हे फक्त युतीचे नव्हे तर महायुतीचे संकटमोचक आहेत असं म्हणून त्यांचं कौतुक केलं होत.

इतकच काय गिरीश महाजन हे  राज्य सरकारच नव्हे तर केंद्रांतील भाजप सरकारच्या मदतीसाठी धावून गेले होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारविरूध्द आंदोलनाची घोषणा केल्यावर त्यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडविला होता.मात्र यावेळी महायुतीच्या या संकटमोचकाला यश मिळताना दिसून येत नाही.सध्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील अडून बसलेत.त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी महाजन प्रयत्नांची पराकाष्टा करतायत.त्यामुळं यावेळेस महायुतीच संकटमोचक अस्त्र फेल जातंय कि काय अशी चर्चा रंगू लागलीय.

हे ही वाच भिडू:

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.