अजित दादा म्हणतात तसं वाईन ही खरंच दारू नाही का? रेसिपी वाचा आणि ठरवा

राज्यात सध्या दारू हा विषय हॉटलिस्ट मध्ये आहे. म्हणजे सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरच हा वाद सुरू झालाय. भाजपानं या मुद्द्यावरून मद्यराष्ट्र म्हणायला सुरुवात केलीय तर राज्य सरकार सुद्धा आपली बाजू बरोबर असल्याचं लावून धरतय. त्यात आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना कानपिचक्या देताना म्हणताय,

वाईन आणि दारू मध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे.

मग भिडूच्या डोक्यात आलं की आपण वाईनची पाककृती देऊया, लोकांनी ठरवू दे वाईन दारू आहे का साधं पेय आहे ते! बरोबराय नं भिडू.

तर पाककृती सांगण्यापूर्वी सांगतो की, देवांच्या काळात पण सोमरस पिला जायचा. या सोमरसाने म्हणे, नशा यायची. आता या सोमरसाची आमच्याकडे रेसिपी नाही पण एवढं मात्र नक्की की जगाच्या प्राचीनतम संस्कृतींमध्ये नशा येणाऱ्या मद्याचे दाखले मिळतात.

आता आपण वाईन पुराणाला सुरुवात करू.

वाईन पिल्याने हृदयाचे रोग होत नाही असे संदर्भ ऑनलाईन सापडतात. पण त्याला पण काही मोजमाप असतं. उठसुठ बाटल्या तोंडाला लावल्या की त्याचे परिणाम पण लै वाईट असल्याचे संदर्भ सापडतात. जगात जास्त वाईन पिणारे लोक कोण असं म्हंटल तर ते असतात फ़्रेंच लोक. फ्रेंच वाईन आणि फ्रेंच किसचे लै दर्दी तुम्हाला जगात सापडतील.

या फ्रेंचांमध्ये हार्ट फेल्युअरच प्रमाण खूप कमी दिसतं. यालाच फ़्रेंच पॅराडॉक्स म्हणतात. रिसर्च सांगतो की ह्या फ्रेंच वाईन मध्ये लाल द्राक्षांच्या बिया वापरल्या जातात. त्यात Quercetin, Tannins आणि Proanthocyanidins हे ऍंटी ऑक्सीडेंट्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात.

त्यामुळेच कोणी ही मद्यपीने मनाला वाटेल तेव्हढी वाईन ढोसून वाईनचा दारुइतका दर्जा खालावू नये. कारण एकतर वाईनमधे अल्कोहोलचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे दहा ते बारा टक्केच असतं.

आता वाईन बनवायची कशी ?

तर साहित्य – ठिकाणावर असलेलं डोकं आणि वाचण्यासाठी कॉन्स्टंट बैठक.

कृती – वाईन शक्यतो द्राक्षांपासुन बनवली जाते. द्राक्षावर असणार्‍या यीस्टमुळे त्यापासुन वाईन बनवणे सोपे जाते. पण फक्त द्राक्षापासुनच वाईन न बनता इतर फळांपासुन वाईन बनवता येते. फक्त जरुरीप्रमाणे यीस्ट वापराव लागत. हे यीस्ट साखरेच विघटन करुन त्यापासुन कार्बनडायऑक्साईड आणि अल्कोहोल निर्माण करतात.

वाईन बनवताना जी भांडी तुम्ही वापरणार आहात ती पुर्णपणे निर्जंतुक करून घ्या. वाईन बनवताना कुठे ही धातुची भांडी वापरायची नाहीत. काच, लाकुड आणि प्लॅस्टकची भांडी चालतील.

आपण जी फ़ळे वापरणार आहोत, त्याचा रस काढा. मिक्सर मध्ये फिरवायच नाही. हाताने रस काढणार असाल तर हात धुवून घ्या. रस नायलॉनच्या फ़डक्याने पिळुन घ्या आणि गर फेकून द्या. निमुळत्या तोंडाचे काचेच जार घ्या. त्याला garaafao म्हणतात.

रस आणि साखर मिळुन हा जार पूर्ण भरा. रस आणि साखर भरल्यावर तोंडावर कापड बांधुन वर एखादा कप झाका. या प्रक्रियेत तयार होणारा कार्बन डाय ऑक्साईड बाहेर पडतो.

पुढे या रसात पोटेशियम मेटाबाय सल्फेट घाला. सोयीसाठी आपण याला KMS म्हणु. साधारणपणे एक लिटर रसाला दोन ग्रॅम पुरते. जर फ़ळे फ़ारच गोड किंवा जास्त पिकलेली असतील तर आणखी दोन ग्रॅम रस काढतानाच घाला.

यीस्टमुळे साखरेच विघटन होवुन त्यापासुन अल्कोहोल व कार्बन डाय ऑक्साईड तयार होण्याला फ़र्मेंटेशन म्हणतात. अल्कोहोल नसले तर वाईन पांचट रसापेक्षा वेगळी लागणार नाही. यामुळे रसातील साखरेचे प्रमाण अतिशय महत्वाचे ठरते. आपण नेहमी वापरतो तीच साखर वापरायची असते.

आपण जी साखर घालणार आहोत ती एकदम घालायची नाही तर अर्धी पहिल्यांदा आणि मग आठवड्याने ऊरलेली अर्धी घालायची. साखरेचा अंश संपला कि फ़र्मेंटेशन थांबते. साखर कमी पडली तर वाईन ड्राय होते. या वाईनमधे आपापल्या चवीप्रमाणे नंतर कधीही साखर घालता येते.

या नंतर यीस्ट घालायची असते. ऑल पर्पज वाईन यीस्ट नाही तर ब्रिव्हर्स यीस्ट वापरा. ते पण नाही भेटलं तर बेकर्स ड्राय यीस्ट वापरा. हि जी यीस्ट असते ती झोपलेली असते. यीस्टचे दाणे कोमट पाण्यात विरघळवुन घ्या आणि फेस आला कि ते मिश्रण रसात ओता. यीस्ट घातल्यानंतर तीन चार तासात जोसात मिश्रण फसफसायला लागते. हे साधारण आठवडाभर चालते. पुर्ण साखरेचे विघटन झाले कि यीस्टचे जिवाणु मरतात. हे जिवाणू आणि फळांचा अंश वाईनपासून वेगळ करणं आवश्यक असतं. हा गाळ हळु हळु खाली बसत जातो.

या गाळापासून वाईन वेगळी केली नाही तर तो गाळ कुजुन वाईन खराब होईल, म्हणुन वरची वाईन काढुन घ्यायची असते. असं सतत वरची वरची निवळ वाईन काढून घ्यायची. वाईन कशी पाहिजे एकदम पाण्यासारखी नितळ. या सगळ्या प्रोसेसला नाही म्हंटल तरी तीन आठवडे ते तीन महिने लागतील.

आता वाईन भारिय कशी ओळखणार ?

तर नाकाला लावून. कारण कोणतीही दारू असो येणारा वास हा एक महत्वाचा घटक असतो. हा वास वापरलेली फळे आणि मसाले, अल्कोहोलचे प्रमाण आणि दारूच्या गोडव्यावर ठरतो. वाईन पिण्यापुर्वी ती ग्लासात घोळवुन तिचा वास घेण्याची प्रथा आहे. या वासाला bouquet म्हणतात. ती पिताना तोंडातून आवाज आला पाहिजे “आहहहहह”

आता सगळ्यातलं अल्कोहोलचं प्रमाण सांगतो…

बियरमध्ये ३ ते ३० टक्के अल्कहोल असतं. लाईट बियरमध्ये चार आणि स्ट्राँग बियरमध्ये ८ टक्के अल्कहोल असतं. वाईनमध्ये ९ ते १८ टक्के अल्कोहलच प्रमाण असतं. व्हिस्कीत अल्कहोलचं प्रमाण अधिक असतं. यात अल्कहोलचं प्रमाण ३० ते ६५ टक्के असते.व्हिस्कीत सरासरी ४३ टक्के अल्कहोल असतं. व्हिस्की दोन प्रकारची असते. एक म्हणजे माल्ट व्हिस्की आणि दुसरी ग्रेन व्हिस्की.

आता हे वाचून आम्हाला कमेंट करून सांगा की वाईन म्हणजे दारू आहे का ते ?

हे ही वाच भिडू

2 Comments
  1. Satej says

    भडव्याला सांग::*मुत* विकायला

  2. Pavan says

    The process you have mentioned in your post is very raw rather ancient. Actual process if far different than peoples think. Overall good post but if Wine is not liquor then how come whisky and other products are different than wine. I mean even whisky contains more than 40 percent alcohol people still dilute it before drink at least in india. Even beer contains less alcohol than wine. Does that mean they should permit beer also to be sold in general stores.

Leave A Reply

Your email address will not be published.