Jio चे ग्राहक कमी होतायेत तरी कंपनी खुश, मालक खुश कारण कंपनीचा खरा गेम वेगळाच

२०११ मधली गोष्ट आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सुट्टीसाठी म्हणून घरी आली होती. पण सुट्टीत कोर्स वर्क सबमिट करण्याची वेळ आली तेंव्हा इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे तिला सबमिशन वेळेवर करता येत नव्हते. 

मग काय पप्पा श्रीमंत म्हणल्यावर प्रॉब्लेमचं सोल्युशन हमखास निघणार. मुलीच्या अडचणीवर विचार केला. मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री मारली आणि जिओचा जन्म झाला..

गावा-गावांमध्ये डिजिटल क्रांती झाली. सर्वांकडे जिओचे फोन आले. 

२०१६ मध्ये जेंव्हा जिओ लॉंच झालं सगळं मार्केटची हवाच बदलली. इतर कंपन्याही मार्केटमध्ये होत्या पण १ मिनिटाच्या कॉलसाठी लोकांना ५८ पैसे मोजावे लागत होते. मग लोकांनी जिओ ला पसंद दिली. जिओने सुरुवातीला फुकट अनलिमिटेड डेटाची सवय लावली. नंतर हळूहळू रिचार्ज पॅकेज लॉन्च केले आणि टप्याटप्याने महागही केले. जिओने अगदी पद्धतशीर मार्केटिंग गेम खेळला.

पण…….जिओने गेल्या फक्त ६ महिन्यात ४ कोटी सबस्क्राइबर्स गमावलेत.

रिलायन्स जिओचे एकूण ४४ कोटी सबस्क्राइबर्स होते. तर एअरटेलचे ३५ कोटी, VI चे २७ कोटी आणि बीएसएनल चे ११ कोटी सबस्क्राइबर्स आहेत. जिओच्या ४४ कोटींमधले ४ कोटी ग्राहक कमी झालेत. ही संख्या व्होडाफोन-आयडिया सोडणाऱ्या ग्राहकांपेक्षा पाचपट अधिक आहे. 

पण स्टोरी इथेच संपत नाही तर…

 खरा गेम हा आहे की जिओचे सबस्क्राइबर्स कितीही कमी होऊ देत पण कंपनीला त्याचा फायदाच होतोय…कसा ? 

होय जिओचे कितीही ग्राहक कमी होऊ देत पण हि कंपनीसाठी गुड न्यूज मानली जातेय. 

कोटींच्या संख्येने ग्राहक कमी होत असले तरीही अंबानी खुश आहेत.  कारण जिओचे असेच ग्राहक कमी होत आहेत जे जिओचे ऍक्टिव्ह युजर्स नाहीत. त्यांच्याकडून कंपनीला काहीच रेव्हेन्यू मिळत नाही.

म्हणजेच असे काही ग्राहक ज्यांच्याकडे जिओचं सिम तर आहे पण ते रेग्युलर रिचार्ज करत नाहीत. असेच ग्राहक सध्या कमी होतायेत.

पण कंपनीचे ऍक्टिव्ह सबस्क्राईबर्स दिवसेंदिवस वाढतच चाललेत.

ऍक्टिव्ह सबस्क्राइबर्स मार्केटमध्ये जिओने जुलै २०२१ मध्ये एअरटेलला मागे टाकलं होतं. तेव्हापासून जिओच्या ऍक्टिव्ह सबस्क्राइबर्सचा मार्केट शेअर सातत्याने वाढत आहे.

  • जिओचा सबस्क्रायबर रेट सध्या ९४ % टक्के इतका आहे.
  • एकूण जिओचे सबस्क्राइबर्स ४० कोटी २ लाख इतके आहेत.
  • त्यातले ३७ कोटी ८ लाख ऍक्टिव्ह सबस्क्राइबर्स आहेत.

तर एअरटेलचा सबस्क्रायबर रेट ९८ टक्के इतका आहे. एकूण सबस्क्राइबर्स ३५ कोटी ८ लाख आहेत. त्यातले ३५ कोटी १ लाख ऍक्टिव्ह सबस्क्राइबर्स आहेत.

तसेच वोडाफोन-आयडियाचे सबस्क्राइबर रेट ८५ टक्के आहे. त्यांचे एकूण २६ कोटी ३ लाख सबस्क्रायबर आहेत आणि ऍक्टिव्ह सबस्क्राइबर्स २२ कोटी ५ लाख इतके आहेत.

गेल्या काही काळामध्ये एअरटेल,जिओ, वोडाफोन- आयडिया या सर्व कंपनीने आपले रिचार्जचे दर महाग केले आहेत. तरीदेखील त्यांचा सबस्क्राइबर्स रेट देखील वरचेवर वाढत चाललाय. 

यावरून हे स्पष्ट होतं की ग्राहकांनी सुद्धा आता महागडे रिचार्ज मान्य केले आहेत.

या सगळ्यामध्ये रिलायन्स जिओ हे वरचेवर आपले सबस्क्राइबर्स वाढवत, मार्केट मधला लिडर बनलाय. त्यानंतर एअरटेल चा नंबर येतो. वोडाफोनचं बघायला गेलं तर त्यांचे सबस्क्राइबर्स वरचेवर कमी होत चालले आहेत.

तर मार्केट लीडर असलेला रिलायन्स जिओ “एव्हरेज रेवेन्यू पर यूजर ARPU” वर काम करतंय. त्यासाठी कंपनी वरचेवर आपल्या ऍक्टिव्ह सबस्क्राइबर्सची संख्या वाढवण्यावर फोकस करत आहे.

असंही सुरुवातीपासूनच जिओ कंपनीचं लक्ष्य राहिलंय की, देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, गावात, शहरांत इंटरनेट सुविधा पोहोचण्याचं आहे. आधीच कंपनीने 2G मोबाईल द्वारे गावागावांमध्ये एन्ट्री मारली. आता जिओ 5g होण्यासाठी देखील पूर्णपणे तयार आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.