वाजपेयी जेव्हा इंदिरा गांधीच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवतात.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध होते. स्वपक्षीय लोकांबरोबरच विरोधी पक्षातील लोकांसोबत देखील त्यांचे मैत्री होती.

कॉंग्रेसच्या आणि भाजपच्या विचारसरणीत फरक असला किंवा हे दोन कट्टर विरोधी पक्ष असले तरी देखील अटलबिहारी वाजपेयी यांना तेव्हाचे पंतप्रधान नेहरूंच्या प्रती खूप आदर होता. नेहरुना सुद्धा हा युवा नेता आवडायचा. असं म्हणतात की नेहरूंनी एकदा एका परदेशी शिष्टमंडळाला वाजपेयींची ओळख भारताचा भावी पंतप्रधान अशी करून दिली होती.

पण जेव्हा नेहरूंची मुलगी म्हणजेच इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा या दोघांचे संसदेत आणि संसदेच्या बाहेरही राजकीय मुद्द्यावरून अनेकदा खटके उडायचे.

इंदिरा गांधी या हुशार आणि तितक्याच कडक स्वभावाच्या होत्या. त्यांच्यावर टीका करण कधीच कुणाला सहज शक्य झाल नाही, आणि केलीच तरी त्याचे तोडीस तोड उत्तर मिळत असे. पण इंदिरा गांधी यांच्यावर परखडपणे एक नेता टीका करू शकत होता, ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.

१९७० च्या काळात भाजप नव्हती, या पक्षाचे नाव तेव्हा जनसंघ होते. याच जनसंघाचे वाजपेयी खासदार होते.

२६ फेब्रुवारी १९७० चा दिवस इंदिरा गांधींनी संसदेत एक भाषण दिले. या भाषणात त्यांनी जनसंघाच्या राष्ट्रीयत्वाचा मुद्दा मांडला आणि जनसंघासारख्या पक्षाला संपवायला पाच मिनट लागणार नाहीत असे विधान त्यांनी केले.

सहाजिकच हे विधान वाजपेयींना आवडले नाही.मग या टीकेवर उत्तर देताना वाजपेयी म्हणाले,

“पंतप्रधान महोदयांनी जनसंघाला पाच मिनटात संपवण्याची भाषा वापरली, भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाच्या पंतप्रधानास हे बोलण शोभत नाही. जनसंघाला ५ मिनटात संपवायचं राहूच द्या, इंदिरा गांधी त्यांचे केस देखील ५ मिनटात नीट करू शकत नाहीत”

याच त्यांच्या भाषणात त्यांनी नेहरूंचा उल्लेख करत, इंदिरा गांधींवर टीका करतांना ते म्हणाले,

‘जब नेहरूजी गुस्सा होते थे, तो वो कम से कम अच्छा भाषण दिया करते थे. हम उनकी चुटकी लेते थे. लेकिन हम इंदिराजी के साथ ऐसा नहीं कर सकते, क्योंकि वो खुद गुस्सा हो जाती हैं.’

या सगळ्या टिकेच कारण होत जनसंघाच्या राष्ट्रीयत्वाची संकल्पना. यावर देखील वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना चोख प्रतिउत्तर दिले होते. वाजपेयी यांच्यामते जनसंघाची भारताच्या राष्ट्रीयत्वाची संकल्पना फक्त मुस्लीम लोकांशी निगडीत नसून ती ५२ करोड भारतीयांशी संबंधित होती.

इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यातील राजकीय द्वंद्व हे काय नवीन नव्हते. मिळेल त्या व्यासपीठावर एकमेकांवर टीकेची झोड उठवण्याची संधी ते सोडत नसतं.

अशीच एक टीका  इंदिरा गांधी सरकारवर अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. त्यांनी बोलताना कॉंग्रेस सरकारला गारुडयाची उपमा देत, गारुडी जसा नेहमी आपल्या सापाला डब्यात बंद ठेवतो, त्याचप्रमाणे कॉंग्रेस सरकार देखील समस्या डब्यात झाकून ठेवते, कारण कॉंग्रेसला वाटते कि प्रश्न झाकून डब्यात ठेवले कि ते अपोआप सुटतात.

अशा पद्धतीच्या राजकीय टीका आणि मतभेद या दोन मोठ्या नेत्यांमध्ये नेहमीच होत राहिले पण एकमेकांच्या बद्दलचा आदरभाव कधी कमी झाला नाही.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.