बजाजची पोरं स्वतःचा गाड्यांचा कारखाना असूनही कॉलेजला बसने जातात?
कॉलेज जीवनात प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते ती महणजे आपल्याकडे एखांदी दोनचाकी बाईक असावी . तरुणाईत गाडी विषयी एक वेगळाच आकर्षण आपल्याला असतं. अनेकांना कॉलेजात दाखला घेतल्या घरातल्याच हातात गाडीची चावी मिळते . तर अनेकांची निराशा होते.
कोणाला घरातलीच जुनी गाडी दिली जाते तर कोणाला ती हि मिळत नाही . मग एखाद्याने आई वडीलांजवळ खूपच लावून धारलं तर चांगलं तासभर बाप जुन्या दिवसात आपण कशी फाटकी पँट घालून शिक्षण पूर्ण केले वैगेरे आणि तुम्ही किती नशीबवान आहात अशा ठोस शब्दात कान उघडणी करतो .
अशा वेळेस मनाची फार घालमेल होते . एकतर कॉलेजात उठून दिसायचं असतं गाडीवाल्याला पटकन पोरगी पटते हा एक समाज मनात असतोच , बर आपणही तेव्हा कमवत नसतो त्यामुळे अनेकांच ही बाईकचा स्वप्न अपूर्णच राहतं . मग हा गडी चेहेरा पडूनच कॉलेज करतो . कोणी बुलेटवरून त्याच्या प्रेयसीबरोबर कट मारून गेला कि ह्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते .
भिडूनो आज तुम्हाला हे सांगण्याचे कारण असे कि असा तथाकथित अत्याचार झालेले तुम्ही एकटे नाही आहेत . तुम्हाला जर मी सांगितले कि एक गाड्या बनवणाऱ्या कंपनी मालकाने त्यांच्या मुलाला गाडी दिली नाही तर तुम्हाला हे पटेल का ?
हो भावांनो हे खर आहे . ही कहाणी आहे बजाज उद्योग समूहाच्या राहुल बजाज यांची. त्याच झालं असं कि राहुल बजाज नुकतेच हार्वर्ड मधून शिकून भारतात आले होते.
सुरवातीच्या काळात त्यांना मुंबई मध्ये मुकुल उद्योग समूहात ट्रेनिंग साठी काही काळ पाठवण्यात आले. राहुल बजाज यांना त्याकाळात रोज कंबाला हिल पासून कुर्ल्याला रोज कामानिमित जावा लागत. राहुल बजाजनी वडिलांकडे एक कार ची मागतली. वडिलांनी स्पष्ट नकार दिला. कमलनयन बजाज हे एक यशस्वी उद्योगपती तर होतेच पण ते लोकसभेचे खासदार ही होते. आपल्या वडिलांचा शिस्तप्रिय स्वभाव राहुल बजाज जाणून होते त्यामुळे पुढे काही बोलण्याचा धाडस त्यांनी केला नाही . वडील नाही म्हणाल्यावर आपण करतो तेच राहुल बजाजानी केलं, ते आई कडे गेले. तिला विचारलं,
“कार राहू दे कमीतकमी मी स्कुटर तरी घेऊन जाऊ का?”
तर आई ने बस ने जाण्यास सांगितले . तरुण राहुल खूपच निराश झाले. आपण स्वतः जगाला स्कुटर विकतो आपला तोच व्यवसाय आहे तरी आपल्याला गाडी मिळत नाही ,हि गोष्ट त्यांच्या मनाला लागून गेली .त्यानंतर बराच हट्ट केल्यावर त्यांना अखेर स्कुटर कामावर घेऊन जाण्याची परवानगी मिळाली .
हाच किस्सा बजाज घराण्यात परत घडला तो राहुल बजाज आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत .
संजीव बजाज हे राहुल बजाज यांचे धाकटे चिरंजीव. शिक्षण घेत असतानाच ते टाटामोटर्स मध्ये अनुभवासाठी काम करत होते. ते बजाज मध्ये ही करू शकले असते पण बजाज मध्ये आपल्याला मालक असल्याने वेगळी वागणूक मिळेल हा त्यामागचा विचार होता.
याच काळात संजीव हे शेफाली नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडले. नंतर त्यांचे तिच्याशीच लग्न झाले तर ती मुंबईला राहत असत. महिन्यातून दोन गुरुवारी संजीव हे शेफालीला भेटण्यास मुंबईला जात. आता गर्लफ्रेंडला इम्प्रेस करावंसं प्रत्येकाला वाटत तसं संजीवना वाटलं आणि ते सहाजिकचं आहे. त्यासाठी त्यांनी वडिलांकडे कारची मागणी केली.
वडिलांनी साफ नकार दिला व ट्रेनने जाण्याचा सल्ला दिला. संजीव त्याकाळात ट्रेनने फिरत.
बजाज उद्योग समूह राजस्थान मध्ये सुरू झाला ती एक छोटीशी सुरवात होती.
कापूस अणि कापड व्यापारा पासून सुरू झालेला हा समूह एके दिवशी गाड्या बनवेल असा कोणालाच वाटले नव्हते. असा ही म्हंटल जाता की जमनालाल बजाज यांनी गांधीना आफ्रिकेतून भारतात आणले. त्याकाळी जमनालाल बजाज यांना गांधींचा पाचवा पुत्र ही म्हंटले जात. गांधीना इतक्या जवळून अनुभवल्यामुळे. स्वावलंबन, साधेपणा, सत्य, बंधुभाव ही मूल्य त्यांनी अंगीकारली होती. हीच मूल्य त्यांनी आपल्या कुटुंबात ही रुजवली. त्याचाच प्रतिक आज बजाज समूहाच्या यशात सामावलेले आहे.
ह्या कुटुंबात जोवर व्यक्ती स्वावलंबी होत नाही तोपर्यंत बाकीचे लाड केले जात नाहीत. अचानकच व्यवसाय हातात आल्यावर मुलानी उथळपणे वागू नये याची काळजी घेतली जाते.
खरंतर बजाज देशातील आघाडीचे उद्योजक आहेत. ते गाडीच काय तर विमान ही वापरू शकतात पण असलेले पैसा व साधनांचा वापर योग्य रीतीने झाला पाहिजे ही त्यामागची भावना.
बजाज उद्योगसमूहाची ही साधेपणाची परंपरा जपणारे राहुल बजाज काल आपल्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त झाले.
हे ही वाच भिडू.
- असा होता गांधीजींचा पाचवा मुलगा, बजाज.
- झुकवल्याशिवाय सुरु न होणारा आमच्या बापाचा घोडा.
- भारतीयांच्या हातात आलेलं पहिलं रॉकेट यामाहा RX100 होतं !