गेल नावाच भूत बाटलीत बंद करायला कोणाला जमलेलं नाही.

हे आयपीएल सुरु झालं तरी ख्रिस गेल मैदानात उतरला नव्हता. प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला वापरलंच नव्हतं. सगळीकडे चर्चा सुरु होती कि तो आता ४१ वर्षांचा झाला. त्याचं क्रिकेट संपलं.

पण काल त्याला रॉयल चॅलेंजर विरोधात संधी मिळाली आणि त्याने त्याचं सोनं केलं. अतिशय अवघड पीच वर गेलने अक्षरशः धुमाकूळ घातला. आपली फिफ्टी झाल्यावर त्याने बॅट कडे इशारा केला. त्यावर लिहिलं होतं,

the boss

तो युनिव्हर्सल बॉस आहे. त्याच्यासारखा बॉलचा कर्दनकाळ कधी क्रिकेटने पहिलाच नाही. आपल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या बॉलला सिक्स मारून सुरवात करणारा तो जनावर. स्वतःला सिक्स मशीन म्हणवून घेतो. सगळ जग आपल्या जर्सी वर एक आकडी दोन आकडी नंबर लिहित होतं तेव्हा हे जनावर ३३३ नंबरची जर्सी घालत होतं. त्याचा सगळा कारभारच वेगळा.

गेलसारखं रंगीत आयुष्य कोणत्याच क्रिकेटरला लाभल नाही. पोरी त्याच्याकडे लोहचुंबकप्रमाणे अॅटरॅक्ट होतात. दारू पार्टी गर्लफ्रेंड सगळ्या पद्धतीचा नशा त्याने केलाय यापुढे देखील करत राहील. बऱ्याचदा त्यामुळे गोत्यात देखील आलाय. पण कधी सुधरला नाही. लोकांच त्याच्यावरच प्रेमसुद्धा कधी झालं नाही. पैसा त्याच्याकडे पाण्यासारखा वाहतो. ही गोष्ट खरी आहे की घरात बेडरूममध्ये पोरीना डान्स करण्यासाठी स्ट्रीप पोल उभा केलाय.

पण सुरवातीपासून हेच ऐश्वर्य होतं असं नाही.

जन्मला जमैकाची राजधानी किंग्स्टनमध्ये. सबिना पार्क नावाच्या स्टेडियमपासून अगदीजवळच त्याच घर होतं. अजूनही ते तिथच आहे. साध पत्र्याच छप्पर असलेल घर. आईवडील आणि पाच बहीण भाऊ या घरात राहायचे. झोपायला जागा नाही म्हणून भावंडामध्ये कायम मारामारी चालायची. आई बरीच वांड होती. दिसेल त्या गोष्टीने ती त्याला फोकून काढायची, तिच्यामुळे हे जनावर तसं काबूत असायचं.

107532284 gayle house tf

त्याला अंगातील रग जिरवायसाठी एकचं ऑप्शन दिसत होता. क्रिकेट. आजूबाजूच्या मुलांच्या मानाने उंची जास्त होती. ताकद पण जास्त. त्या लुकास ग्राउंडवर जाऊन मोठे मोठे सिक्स मारणे एवढ त्याला जमायचं. त्या ग्राउंडने त्याला बदलून टाकलं. आजही तो आपण माणसात आलो याच क्रेडीट त्या ग्राउंडला देतो. शाळा सुरु व्हायच्या अगोदर, शाळा सुटल्यावर, कधी कधी शाळा सुरु असताना देखील त्याच तिथे बॅट बडवणे सुरु असायचं.

घरात व्यवस्थित जेवण मिळायचं नाही. पण शाळेत असतानाच त्याच्या खेळण्याची एवढी हवा झाली की लोक त्याला स्वतःहून पैसे देऊ लागले. सिक्स मारणे हा त्याला तेव्हा पासूनच छंद लागला. लवकरच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये संधी मिळाली. वीस वर्षाचा झाला तेव्हा वेस्टइंडीजकडून खेळू लागला होता. क्लाईव्ह लोईडस व्हिव्ह रिचर्डस, ब्रायन लारा अशा  दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये ख्रिस गेल हे सुद्धा नाव झळकू लागले.

त्याच करीयर काही सांगण्यासारखी गोष्ट नाही. आपल्या समोरच ते घडल आहे. सुरवातीला साधासुधा शामळू दिसणारा गेल विरुद्ध टीमच्या बॉलरला पिटाई करताना बॉस बनला. कायम हसतमुख चेहरा, धिप्पाड उंची, तसेच केस आणि बेधुंद शैली यामुळे वेस्ट इंडियन पब्लिकबरोबर पूर्ण जगभरात फेमस झाला.

त्याचं ते बेलगाम वागण, त्याची स्टाईल हे खर तर जमैकन संस्कृतीच्या विरुद्ध नाही पण बाकीच्यांना ते पचायला जड जाते. विचार न करता भपार्या मारण्यामुळे तो भरपूरदा गंडला देखील आहे. पण ट्वेंटी२० असो की टेस्ट असो आपण पाहिलेल्या काळात गेल सारखा कर्दनकाळ दुसरा पहिला नाही.

शेगावच्या गजानन महाराज कचोरीचा आशीर्वादामुळे हे राक्षस आता चाळीस वर्षांच्या पार पोहचलं आहे.

कित्येक विक्रम केले, कित्येक मोडून टाकले. मिडियाला शिळ्या भाकरीची किंमत दिली नाही, बॉलरची धुलाई करताना तलवार फिरली. आता मात्र त्याच्या रिटायरमेंटच्या वावड्या उठतात. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्ड बरोबर भांडण संपली नाहीत त्यामुळे कट्ट्यावरच बसवण्यात आलंय. अख्खा बोर्ड विकत घेईल एवढा पैसा त्याच्याकडे आहे.पण त्यांना हे भूत आपल्या जवळ नकोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याच्यासाठी संपलय पण वेगवेगळ्या स्थानिक टीमसाठी खेळण मात्र त्याने थांबवल नाही.

बाकीचे खेळाडू पस्तीस वर्षांचे झाले तरी दम टाकू लागले आहेत अशात ४१ वर्षांच्या या खेळाडूने काल मारलेली फिफ्टी दाखवून देत आहे

गेल नावाच भूत बाटलीत बंद करण कोणाला जमलेलं नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.