विमानात दारू पिवून राडा. पुर्वी रामराव आदिक आत्ता भगवंत मान, ठिकाण एकच जर्मनी..

पंजाबचे मुख्यमंत्री आणि दारू हे समीकरण जगजाहीर आहे. ट्विटर, फेसबुकवर त्यांचे अनेक झोंबकाळा झाल्याचे व्हिडीओ पहायला मिळतात. भगवंत मान यांनी देखील आपण कधीच दारू पित नाही वगैरे सारखा साळसुदपणाचा आव आणला नाही. पण अट्टल दारूड्याप्रमाणे अधूनमधून मी दारू सोडली अशी घोषणा मात्र करण्यास ते विसरत नसतात.. 

त्यामुळे आत्ता आलेली बातमी आणि गाजत असलेला मुद्दा पुरावा नसूनही अस असू शकतो ही शक्यता गृहित धरण्यास पुरेसा ठरतोय. झालय अस की पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी भागवंत मान यांच्याविरोधात ट्विट करत एकामागून एक दावे केलेत.. 

त्यांनी एका मिडीया रिपोर्टस् च्या हवाल्याने सांगितलंय की, 

सहप्रवाशांच्या हवाल्यातून आलेल्या या मिडीया रिपोर्टस् नुसार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दारुच्या नशेत असल्याकारणाने त्यांना लुफ्तान्सा फ्लाईटमधून उतरवण्यात आलं. त्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला.

या रिपोर्टस् नुसार सांगण्यात आलय की परकीय गुंतवणूकीसाठी भगवंत मान 11 सप्टेंबर रोजी जर्मनीला गेले होते. तिथून ते 18 सप्टेंबरला परतले. परतीच्या या प्रवासात त्यांनी इतकी दारू प्यायली होती की त्यांना चालता देखील येत नव्हते. त्यामुळे त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आलं व त्यानंतरच विमानाने उड्डाण घेतली. या सर्व प्रकारामुळे भगवंत मान यांना दिल्लीत येण्यास उशीर झाला..  

आत्ता या प्रकरणात इंडियन नरैटिव्ह या वेबसाईटने कोणत्याही पुरावा दिलेला नाही. त्यांच्याकडे एकमेव पुरावा आहे तो म्हणजे सहप्रवाशांचा दावा, दूसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार झाला तो जर्मनीत.. 

आत्ता झालेल्या प्रकरणावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप होतीलच.. 

पण असाच एक किस्सा महाराष्ट्राच्या बाबतीत देखील झाला होता, ते योगायोगाने ते ठिकाण देखील जर्मनीच होतं.. 

महाराष्ट्रातल्या त्या उपमुख्यमंत्र्यांच नाव होतं, रामराव आदिक… 

रामराव आदिक राज्याचे उपमुख्यमंत्री होते तर वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री असताना आदिक जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी विमानात दारू पिवून त्यांनी राडा घातला व हि बातमी इंडिया टुडेमध्ये आली. त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता.. 

आज ज्याप्रमाणे इंडियन्स नेरेटिव्हमध्ये प्रसंग छापून आला आहे तशाचप्रकारे मिडीयाच्या हवाल्यानेच हा प्रकार उघडकीस आला होता… 

यात सांगण्यात आलं होतं की प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विमानप्रवासादरम्यान आदिकांना वाईन पिली होती. ती त्यांना झेपली नाही. त्यानंतर स्वत:वरच नियंत्रण गमावून त्यांनी एअरहोस्टेज सोबत गैरवर्तन देखील केलं. पुढे विमानतळावरून त्यांना व्हिलचेअरवरून बाहेर आणण्यात आलं.. 

रामराव आदिक यांच्या दुर्दैवाने मोहम्मद युनुस या ट्रेड फेअर ऑथोरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष त्या दिवशी त्यांची दिल्लीला जाणारी फ्लाईट लेट असल्यामुळे हॅनोव्हर एअरपोर्टवर उपस्थित होते. त्यांनी तो प्रकार पाहिला व भारतात परतताच ही बातमी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कानावर घातली. संपूर्ण भारतात या लाजीरवाण्या बातमीमुळे खळबळ उडाली. महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली. कॉंग्रेसवर प्रचंड टीका होऊ लागली.

मात्र मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी रामराव आदिक यांच्या पाठीशी राहायचं ठरवलं.

रामराम आदिक यांच्या बचावासाठी त्यावेळच्या १४ मंत्र्यानी पत्रक काढून त्यांची पाठराखण केली. त्यांनी तसं काही केलंच नाही असा दावाही त्यांनी केला. हे सगळ भाजप व विरोधीपक्षाने रचलेलं कुभांड आहे अस सांगितल गेलं. आदिक यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही

पण  वृत्तपत्रांचा दबावच एवढा होता की आदिकांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

रामराव आदिक यांनी विमानात जे मद्य दिलं होतं ते भेसळयुक्त होतं त्यामुळं आपल्याला त्रास झाला असा खुलासा दिला व राजीनामा देताना यापुढे कधीही दारूला स्पर्श देखील करणार नाही असं जाहीर केलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.